(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मालिकेबद्दल बोलताना हंसल मेहता म्हणाले, “स्कॅम 2010 ही महत्त्वाकांक्षा, प्रभाव आणि त्यातून येणाऱ्या अहंकाराची कथा आहे. विश्वासावर उभारलेले भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक साम्राज्य कसे तयार झाले — आणि जेव्हा तो विश्वास संपला तेव्हा काय घडले, हे यात दाखवले आहे. साम्राज्याच्या उदयाची आणि त्याला अजेय मानणाऱ्या व्यक्तीची ही रोचक कहाणी आहे.”
View this post on Instagram
अपलॉज एंटरटेनमेंटचे चीफ कंटेंट ऑफिसर दीपक सेगल म्हणाले, “स्कॅम आमच्यासाठी केवळ फ्रँचायझी राहिली नाही. स्कॅमच्या यशामुळे आमच्यावर मोठी जबाबदारी आली आहे, कारण प्रेक्षकांच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. स्कॅम 1992 भारतीय स्ट्रीमिंग इंडस्ट्रीला आपला आवाज मिळत असताना आली आणि ती भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी मालिका ठरली. स्कॅम 1992 च्या यशामुळे आम्हाला अँथॉलॉजी तयार करण्याचा आत्मविश्वास मिळाला, ज्यात महत्त्वाकांक्षा, पैसा, सत्ता आणि मानवी स्वभाव यांचा संघर्ष दाखवला जातो. स्कॅम 2010 मध्ये आम्ही ही महत्त्वाकांक्षा आणखी पुढे नेत आहोत. या सीझनचे विशेष आकर्षण म्हणजे हंसल मेहता पुन्हा दिग्दर्शन करत आहेत. सुरुवातीपासूनच स्कॅमच्या डीएनएमध्ये हंसल महत्त्वाचे राहिले आहेत आणि गुंतागुंतीच्या वास्तव घटनांना मानवी स्पर्श देऊन रोचक कथा बनवण्याची त्यांची क्षमता ही फ्रँचायझी लोकप्रिय होण्याचे एक मोठे कारण आहे.”
मुख्य भूमिकेत सिद्धार्थ बोडके म्हणाले, “या पात्राच्या व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंती आणि शोचा स्केल मला खूप भावला. त्याची आवड, सत्ता, दोष, उदय आणि शेवटी झालेला पतन हे सर्व त्याला साकारण्यासाठी अत्यंत रोचक बनवतात. हा अनुभव माझ्यासाठी रोमांचक ठरला असून, हंसल मेहता यांसारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली असा बहुआयामी पात्र साकारण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद झाला.”
बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010 सध्या प्रॉडक्शन प्रक्रियेत असून लवकरच सोनी लिव्हवर स्ट्रीम होणार आहे.





