Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eetha : आधी विरोध आता मान्यता! ‘ईठा’ सिनेमाच्या नावाच्या वादाला पूर्णविराम? स्वतः विठाबाईंच्या लेकीने उठवला आवाज

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाच्या नावावर विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबाने सुरुवातीला आक्षेप घेतला होता. चित्रपटाचे नाव 'विठाबाई नारायणगावकर' असे ठेवावे, अशी त्यांची मागणी होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2026 | 02:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमाचे नाव ‘ईठा’ वरून ‘विठाबाई नारायणगावकर’ असे ठेवण्यात यावे.
  • विठाबाईंच्या लेकीने या चर्चेत उडी घेतली.
  • विधानानंतर सिनेमाचे नाव ‘ईठा’ या प्रकरणाला पूर्णविराम लागला आहे.
टीझरमधील छोटासा क्लिप Viral होतो आणि संपूर्ण देशभरात श्रद्धा कपूरच्या आगामी सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचते. ‘ईठा’ सिनेमाचा टीझर तर भेटीला आलाच आहे त्याचबरोबर या सिनेमाच्या नावाला स्वतः विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबाकडून विरोध होता. त्यांचे म्हणणे होते की “सिनेमासाठी आमच्यासह कोणतीही चर्चा करण्यात आली. जर चर्चा झाली असती तर कदाचित विठाबाईंच्या आयुष्यातील अनेक महत्वाचे पैलू तुम्हाला तुमच्या सिनेमात दाखवता आले असते.” विठाबाईंच्या कुटुंबीयांनी सिनेमाच्या नावावर आक्षेप नोंदवला होता. त्यांची अशी इच्छा आहे की, सिनेमाचे नाव ‘ईठा’ वरून ‘विठाबाई नारायणगावकर’ असे ठेवण्यात यावे, जेणेकरून त्यांचे मूळ नारायणगावही जपता येईल.

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर

अशामध्ये विठाबाईंच्या लेकीने या चर्चेत उडी घेतली आहे. मंगला बनसोडे-करवडीकर या विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, “‘ईठा’ या चित्रपटाच्या नावाबाबत आमची कोणतीही हरकत नाही. तमाशाच्या प्रयोगांदरम्यान गावोगावी लोक माझी आई विठाबाई नारायणगावकर यांना ‘ईठा’ या नावानेच ओळखत आणि हाक मारत असत. त्यामुळे चित्रपटासाठी निवडलेले हे शीर्षक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी समर्पक आहे.” मंगला यांच्या या विधानानंतर सिनेमाचे नाव ‘ईठा’ या प्रकरणाला पूर्णविराम लागला आहे.

कोण आहेत मंगला बनसोडे-करवडीकर?

मंगला बनसोडे-करवडीकर या विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या असून त्यांचा जन्म पुण्यातील नारायणगाव येथे झाला. त्या देखील तमाशा कलावंती आहेत. ढोलकी फडाच्या तमाशात त्यांनी आजवर गायन, नृत्य तसेच अभिनय केले आहे. विठाबाईंच्या कुटुंबाने ‘ईठा’ या सिनेमाच्या नावावर जो आक्षेप घेतला होता, तो त्यांनी योग्य कारण देत मोडीस काढला आहे.

Lock Upp: लॉक अप सीझन २ ला मिळाली पहिली Wild Card स्पर्धक, होणार डबल धमाका; ‘भाभीजी’ करणार एंट्री?

‘ईठा’ सिनेमा!

‘ईठा’ (Eetha) हा आगामी बॉलिवूड बायोgraphical म्युझिकल ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. लक्ष्मण उतेकर यांनी याचे दिग्दर्शन केले असून, दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्स (Maddock Films) ने याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील लावणी आणि तमाशा क्षेत्रातील दिग्गज लोककलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या संघर्षमय आणि थक्क करणाऱ्या आयुष्यावर आधारित आहे.

Web Title: Mangala bansode karvadikar supported the name of the film eetha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Lavni
  • Shraddha Kapoor

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.