
फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणाली मंजरी फडणीस?
शेअर केल्या गेलेल्या या पोस्टमध्ये मंजरी फडणीस जोरजोरात रडत आहेत. तसेच तिने या पोस्टमध्ये तिच्या सोसोयटीच्या आवारात घडलेली एक क्रूर घटना सांगितली आहे. ती म्हणते की तिच्या सोसायटीमध्ये Mikey नावाचा श्वान राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो सापडत नव्हता. शेवटी, तो सोसायटीच्या आवारातच सापडला. तो जवळजवळ मृत अवस्थेत होता. त्याला काही क्रूर लोकांनी मारलं. त्याच्या नाका-तोंडातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्याला एका गोणपाटीत भरून दूर फेकण्यात आले.
ही सगळी भयाण घटना सांगताना मंजरी ढसाढसा रडत होती. तिने हल्ला करणाऱ्या क्रूर माणसांवर कारवाई करण्याची मागणीही शासनाला केली आहे, तसेच या संबंधित काही तरी कायदा असावा.
शेअर केलेल्या पोस्टखाली कॅप्शन देण्यात आले आहे. नमूद करण्यात आले आहे की, “आमच्या मिकीची निर्घृण हत्या करण्यात आली… आणि आता आम्ही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहोत. कोणत्याही सोसायटीत, कोणत्याही प्राण्यासोबत अशी घटना पुन्हा कधीही घडू नये. प्राण्यांना इजा करण्याचा विचार करणाऱ्यांमध्ये कायद्याची भीती असली पाहिजे. प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात अधिक कठोर कायद्यांची गरज आहे. या लढ्यात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल झेवियर बर्नार्ड सॅंटियागो यांचे मनःपूर्वक आभार. तसेच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेन्द्र नागरकर यांचेही आम्ही अत्यंत ऋणी आहोत. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. संकल्प (संकेत) कदम यांनी मिकीसाठी निडरपणे आणि धैर्याने लढा दिला, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आमच्या सोसायटीतील मिकीवर प्रेम करणाऱ्या आणि न्यायासाठी अथकपणे आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या सर्व रहिवाशांचेही मनःपूर्वक आभार. विशेषतः रंजना केंट, केशव धनराज, मार्सिया, ममता, नेहा सिंग, गैती सिद्दीकी आणि इतर अनेक जणांचे. मिकीला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”