Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज

Miranda Warning Teaser Launch: आदिनाथ कोठारे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार. फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणारा ‘मिरांडा वॉर्निंग’ २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 21, 2026 | 09:08 AM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Miranda Warning : मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा रहस्य आणि थराराची मेजवानी पाहायला मिळणार आहे. फार्महाऊसवर घडलेल्या खुनाच्या घटनेचा शोध घेणारा ‘मिरांडा वॉर्निंग’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा रंजक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यातून चित्रपटातील रहस्याची झलक पाहायला मिळते. दमदार कलाकारांची फळी आणि खुनाच्या तपासाभोवती फिरणारं कथानक यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

आदिनाथ कोठारे साकारणार पोलिस अधिकाऱ्याची भूमिका

‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत जान्हवी किल्लेकर, सुरेश विश्वकर्मा, पायल जाधव, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, एकनाथ गीते आणि त्रिशा कमलाकर असे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. फार्महाऊसवर घडलेल्या खुनानंतर सुरू होणारा तपास, संशयाची वर्तुळं आणि गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याला करावा लागणारा शोध, यांची झलक टीझरमधून पाहायला मिळते.

सचिन धोत्रे यांचं निर्मिती आणि दिग्दर्शन

सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज यांच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाचं निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी त्यांनी २०२३ मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘मिरांडा वॉर्निंग’साठी रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी लेखन केलं आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रचे कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

Abir Marathi Film Unveils New Poster: सौंदर्याच्या पलीकडील स्त्रीमनाचा वेध घेणारा ‘अबीर’ १८ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

खुनाच्या तपासात उलगडणार रहस्याचे नवे पदर

फार्महाऊसवर घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर तपासाला सुरुवात होते. या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण होतात, संशयाची दिशा बदलते आणि प्रत्येक नव्या धाग्यासोबत रहस्याचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. अखेर खरा गुन्हेगार कोण, पोलिस अधिकारी त्याच्यापर्यंत कसा पोहोचणार आणि या प्रकरणामागचं सत्य काय, याची उत्सुकता चित्रपटाच्या टीझरमुळे निर्माण झाली आहे.

सस्पेन्स आणि थ्रिलरची सांगड घालणाऱ्या ‘मिरांडा वॉर्निंग’मधून प्रेक्षकांना खुनाच्या तपासाचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या रहस्यमय कथानकातील प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २७ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

Urmila Kanetkar: आता ‘उर्मिला कानेटकर’! आदिनाथ कोठारेपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने बदललं युजरनेम; पोस्टने वेधलं लक्ष

Web Title: Miranda warning teaser adinath kothare marathi movie ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • adinath kothare
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Urmila Kanetkar: आता ‘उर्मिला कानेटकर’! आदिनाथ कोठारेपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने बदललं युजरनेम; पोस्टने वेधलं लक्ष
1

Urmila Kanetkar: आता ‘उर्मिला कानेटकर’! आदिनाथ कोठारेपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने बदललं युजरनेम; पोस्टने वेधलं लक्ष

Dhanush-Mammootty Movie: धनुष-ममूटीच्या चाहत्यांसाठी खास भेट! ‘ओम: चैप्टर 1’मधील ‘वीझा वीरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
2

Dhanush-Mammootty Movie: धनुष-ममूटीच्या चाहत्यांसाठी खास भेट! ‘ओम: चैप्टर 1’मधील ‘वीझा वीरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री
3

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री

Isha Koppikar: नवरात्रीत अभिनेत्रीने जपली अनोखी परंपरा; तृतीयपंथींना घरी बोलावून केली अर्धनारीश्वराची पूजा, VIDEO व्हायरल!
4

Isha Koppikar: नवरात्रीत अभिनेत्रीने जपली अनोखी परंपरा; तृतीयपंथींना घरी बोलावून केली अर्धनारीश्वराची पूजा, VIDEO व्हायरल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.