Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित

New Marathi Song: रॅपर स्वॅगर बॉय आणि मेक्सिकन आर्टिस्ट फ्रीबोट यांचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित झालं आहे. मराठी, हिंदी आणि स्पॅनिश भाषांचा संगम असलेल्या या गाण्याची खासियत जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 11, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र आणि मेक्सिकोच्या संगीताचा अनोखा संगम
  • ‘महाराष्ट्राच्या संगीताला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न’
  • ‘हे गाणं माझ्यासाठी स्वप्नवत आहे’; स्वॅगर बॉयची भावना
New Marathi Song: संगीताला भाषा, प्रांत आणि देशाच्या सीमा नसतात, याचा प्रत्यय देणारं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘माझ्या सोन्या’ या गाण्यामुळे लोकप्रिय झालेला मराठमोळा रॅपर स्वॅगर बॉय आणि मेक्सिकोचा इलेक्ट्रॉनिक संगीत कलाकार फ्रीबोट (FREEBOT) यांचं ‘नाच ना’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. मराठी, हिंदी आणि स्पॅनिश या तीन भाषांचा संगम असलेल्या या गाण्यात महाराष्ट्रातील टेक ट्रायबल संगीतशैली आणि मेक्सिकन इलेक्ट्रॉनिक संगीताचा अनोखा मेळ पाहायला मिळतो. या आंतरराष्ट्रीय सांगीतिक सहकार्यामुळे सोशल मीडियावरही गाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र आणि मेक्सिकोच्या संगीताचा अनोखा संगम

‘वर्ल्ड ऑफ वाईब्स’ या रेकॉर्ड लेबलच्या माध्यमातून ‘नाच ना’ हे गाणं सादर करण्यात आलं आहे. कोल्हापूरचे निर्माता-दिग्दर्शक रॉक कच्ची यांनी या गाण्याची निर्मिती केली असून, झाहिद सय्यद यांनी दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री एकता, अभिनेता रॉक कच्ची आणि रॅपर स्वॅगर बॉय झळकले आहेत.

महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या संगीतशैलीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. स्वॅगर बॉयची रॅप शैली, फ्रीबोटच्या इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव आणि तीन भाषांचा वापर यामुळे ‘नाच ना’ हे गाणं वेगळं ठरत आहे.

कसं आकाराला आलं ‘नाच ना’ गाणं?

‘नाच ना’ या गाण्याची संकल्पना फ्रीबोट यांच्या भारत दौऱ्यादरम्यान आकाराला आली. ‘वर्ल्ड ऑफ वाईब्स’च्या माध्यमातून महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या टेक ट्रायबल संगीतशैलीवर आधारित काहीतरी वेगळं करण्याचा विचार पुढे आला. या संगीतावर स्वॅगर बॉयची शैली खुलून येईल, असा विश्वास रॉक कच्ची यांना वाटला. त्यानंतर अवघ्या एक-दोन दिवसांत स्वॅगर बॉयने हे गाणं तयार केलं.

या गाण्यासाठी काही मोठ्या म्युझिक लेबल्सकडूनही रस दाखवण्यात आला होता. मात्र, गाण्याची बीट बदलून ते हिंदीमध्ये सादर करण्याच्या सूचना आल्याने ‘वर्ल्ड ऑफ वाईब्स’ने त्याची मराठी ओळख कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रायोजकांकडून नकार मिळाल्यानंतर रॉक कच्ची आणि त्यांच्या टीमने स्वतःची गुंतवणूक करून गाण्याची निर्मिती आणि म्युझिक व्हिडीओ पूर्ण केला.

या प्रकल्पात रॉक कच्ची यांनी सेकंडरी प्रोड्युसर, लेखक आणि सहदिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. यापूर्वी स्वॅगर बॉय आणि वाय डी यांच्या ‘माझ्या सोन्या’ या गाण्याच्या व्हिडीओसाठीही झाहिद सय्यद यांनी काम केलं होतं.


‘महाराष्ट्राच्या संगीताला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न’

‘नाच ना’ या गाण्याविषयी बोलताना निर्माता-दिग्दर्शक रॉक कच्ची म्हणाले, “‘तांबडी चांबडी’ या गाण्यानंतर मी रॅपर स्वॅगर बॉय आणि मेक्सिकन आर्टिस्ट फ्रीबोट यांना घेऊन ‘नाच ना’ हे गाणं केलं आहे. हे केवळ एक गाणं नसून महाराष्ट्राच्या प्रादेशिक संगीताला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वॅगर बॉयचं संगीत, गीतलेखन आणि गायन यांसोबत फ्रीबोटच्या मेक्सिकन इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव या गाण्यात अनुभवायला मिळेल.”

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या सांगीतिक संस्कृतीला आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक संगीतविश्वाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी भाषा आणि स्थानिक संगीताचा अभिमान जपत जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा संदेश ‘नाच ना’ या गाण्यातून देण्यात आला आहे. हे गाणं डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

‘हे गाणं माझ्यासाठी स्वप्नवत आहे’; स्वॅगर बॉयची भावना

‘माझ्या सोन्या’ या गाण्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर स्वॅगर बॉय आता ‘नाच ना’ हे नवं गाणं घेऊन आला आहे. या गाण्याच्या निर्मितीप्रक्रियेविषयी बोलताना तो म्हणाला, “‘माझ्या सोन्या’ या गाण्याला तुम्ही खूप छान सपोर्ट केलात. आता मी तुमच्यासाठी महाराष्ट्रीयन आणि मेक्सिकन स्टाइलमधलं मराठी गाणं घेऊन आलो आहे. रॉक दादाचे आभार की त्यांनी या गाण्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मेक्सिकन आर्टिस्ट भारतात आला असताना रॉक दादाने त्याच्यासोबत गाणं करण्याचा विचार मांडला आणि फ्रीबोटही यासाठी तयार झाला.”

स्वॅगर बॉयने पुढे सांगितलं की, ‘नाच ना’ या गाण्याचं शूटिंग पुण्यात करण्यात आलं आहे. “माझ्यासाठी हे गाणं स्वप्नवत आहे. सोशल मीडियावरही सध्या गाणं ट्रेंडिंगला आहे. माझ्या सर्व गाण्यांना प्रेक्षकांचं असंच प्रेम मिळू दे. तुम्ही छान-छान रील व्हिडीओ बनवा आणि आम्हाला टॅग करायला विसरू नका,” असं आवाहनही त्याने चाहत्यांना केलं आहे.

महाराष्ट्रातील संगीतशैलीला मेक्सिकन इलेक्ट्रॉनिक संगीताची जोड देणारं ‘नाच ना’ हे गाणं प्रादेशिक संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा एक वेगळा प्रयत्न ठरत आहे.

Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम ३’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! दुसऱ्या शनिवारी ‘सिंघम अगेन’चा रेकॉर्ड मोडला?

Web Title: New marathi song nach na swagger boy freebot maharashtra mexico

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • entertainment
  • New Song

संबंधित बातम्या

Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ
1

Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता
2

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज
3

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज

Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम ३’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! दुसऱ्या शनिवारी ‘सिंघम अगेन’चा रेकॉर्ड मोडला?
4

Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम ३’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! दुसऱ्या शनिवारी ‘सिंघम अगेन’चा रेकॉर्ड मोडला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.