
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
कियाराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात दिसत आहे. एका फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पूलचा आनंद घेताना दिसते, तर दुसऱ्या फोटोमध्ये गुलाबी स्वेटर घालून सनबाथिंग करताना दिसत आहे. याशिवाय मेकअप करतानाचा आणि सनग्लासेस घालून सेल्फी घेतानाचा फोटोही तिने शेअर केला आहे.
या फोटोंमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांचा एकत्रित सेल्फीही पाहायला मिळतो. दोघांनीही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून, आरशासमोर घेतलेल्या या सेल्फीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
कियाराने या फोटोंच्या माध्यमातून मुलगी सरायासोबत घालवलेल्या खास क्षणांचीही झलक दाखवली आहे. एका फोटोमध्ये वाळूवर कुटुंबाच्या पावलांचे ठसे दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये सरायाचे वाळूने माखलेले छोटे पाय पाहायला मिळतात. या फोटोंमधून कुटुंबासोबतचा आनंदी वेळ घालवतानाचे क्षण कियाराने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
कियाराच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव
कियाराच्या या फोटोंवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी तिच्या फिटनेसचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या चेहऱ्यावरील चमक लक्षात घेतली. एका चाहत्याने ‘मामा ग्लो’ असे म्हणत तिच्या चेहऱ्यावरील तेजाचे कौतुक केले. तर दुसऱ्या चाहत्याने ‘मामा अडवाणींचा ग्लो बघा’ अशी कमेंट केली.
काही चाहत्यांनी सिद्धार्थ आणि कियाराला त्यांची मुलगी सरायाची आणखी एक झलक दाखवण्याची विनंतीही केली आहे. सध्या या जोडप्याच्या कौटुंबिक सुट्टीतील फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.