Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UK च्या मातीत आकार घेतोय मराठी माणसाचा सिनेमा! अभिनेता पुष्कर जोगचा ‘अंतराल’; चित्रीकरणाला सुरुवात

मराठी अभिनेता पुष्कर जोग याने त्याच्या आगामी हिंदी चित्रपट 'अंतराल'च्या चित्रीकरणाला युनायटेड किंगडममध्ये सुरुवात केली आहे. हॉरर आणि रोमँटिक ड्रामाचा संगम असलेल्या या ब्रिटिश-भारतीय क्रॉसओव्हर चित्रपटाची घोषणा त्याने सोशल मीडियावर केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 10, 2026 | 04:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता पुष्कर जोग सध्या युनायटेड किंगडममध्ये त्याच्या आगामी ‘अंतराल’ या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हॉरर आणि रोमँटिक ड्रामाचा संगम असलेल्या या ब्रिटिश-भारतीय क्रॉसओव्हर चित्रपटाची माहिती पुष्करने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सेटवरील क्लॅपबोर्डचा फोटो पोस्ट करत त्याने या नव्या प्रवासाची अधिकृत घोषणा केली. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत पुष्करने लिहिले की, ‘अंतराल’ हा त्याचा पुढील हिंदी हॉरर-रोमँटिक ड्रामा चित्रपट असून त्याचे चित्रीकरण युनायटेड किंगडममध्ये होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनिसा बट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या घोषणेनंतर चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Rajpal Yadav : राजपाल यादवला आणखीन एक धक्का! चेक बाउंस केसप्रकरणाला नवे वळण; पुन्हा एकदा जावे लागणार जेलमध्ये?

या चित्रपटाची निर्मिती गुसबम्प्स एंटरटेनमेंटने केली असून, ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्माते तेजा सलादी यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. तर निखिल रानडे यांनी छायांकन केले आहे. प्रेम, रहस्य आणि थरार यांचा मिलाफ असलेल्या या कथेमुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

विविध धाटणीच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जाणारा पुष्कर जोग नेहमीच वेगळे विषय आणि आव्हानात्मक भूमिका स्वीकारतो. ‘अंतराल’ हा त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असून, या चित्रपटातून तो एका नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे.पुष्करच्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा होताच चाहते आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सध्या यूकेमध्ये सुरू असून, येत्या काही आठवड्यांत कलाकार, कथा आणि प्रदर्शनासंदर्भातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Rajesh Sharma Health Update : किडा नाही तर ‘या’ कारणामुळे अभिनेत्याची खालावली होती तब्येत!

यंदाच्या Cannes मध्ये झळकला होता अभिनेता!

मराठी अभिनेता यंदाच्या Cannes Film Festival मुळे जास्त चर्चेत आला होता. पुष्कर जोगने cannes च्या रेड कार्पेटवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. सूटबूटमध्ये त्याने एंट्री घेतली होती. अशामध्ये त्याच्या नवा सिनेमा पाहण्यासाठी पुष्करच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Pushkar jog antaral shooting started in uk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • pushkar jog
  • United Kingdom

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Pushkar Jog: पुष्कर जोग पुन्हा थिरकवणार! ‘हाये रे हाये’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला डान्सिंग स्टारचा हटके अंदाज
2

Pushkar Jog: पुष्कर जोग पुन्हा थिरकवणार! ‘हाये रे हाये’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला डान्सिंग स्टारचा हटके अंदाज

Prince Harry: ब्रिटिश राजघराण्यात मोठा ट्विस्ट; 6 वर्षांनंतर प्रिन्स हॅरी-मेगनचे ब्रिटनमध्ये पुनरागमन; मुलांसाठीही मोठा निर्णय
3

Prince Harry: ब्रिटिश राजघराण्यात मोठा ट्विस्ट; 6 वर्षांनंतर प्रिन्स हॅरी-मेगनचे ब्रिटनमध्ये पुनरागमन; मुलांसाठीही मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.