Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : 100 कोटींच्या नजीकच! ‘जेवढं ओतलं तेवढं परत कमावलं’ 12 दिवसांत केली मोठी कमाई

Raja Shivaji : Riteish Deshmukh दिग्दर्शित ‘Raja Shivaji’ हा ऐतिहासिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 13, 2026 | 08:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमा आता १०० कोटींच्या क्लबच्या अगदी जवळ पोहोचला
  • नेट कमाई ८०.९ कोटी रुपयांवर पोहोचली
  • येत्या काही दिवसांत हा सिनेमा आणखी मोठा विक्रम करू शकतो
Raja Shivaji : Riteish Deshmukh दिग्दर्शित ‘Raja Shivaji’ हा ऐतिहासिक चित्रपट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत हा सिनेमा आता १०० कोटींच्या क्लबच्या अगदी जवळ पोहोचला आहे. याआधी ‘Sairat’ चित्रपटाने जवळपास 100 कोटींची कमाई करत विक्रम केला होता. मात्र आता अनेक वर्षांनंतर ‘Raja Shivaji’ मराठी सिनेसृष्टीतील १०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रदर्शनाच्या १२ व्या दिवशी चित्रपटाने सुमारे ३ कोटी रुपयांची कमाई केली. ‘ब्लॉकबस्टर ट्यूसडे’ ऑफरमुळे तिकीट दर कमी करण्यात आल्याने प्रेक्षकांची गर्दी वाढल्याचे पाहायला मिळाले. त्याआधी ११ व्या दिवशी चित्रपटाने २.८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आतापर्यंत ‘Raja Shivaji’ची भारतीय बॉक्स ऑफिसवरील नेट कमाई ८०.९ कोटी रुपयांवर पोहोचली असून ‘Sairat’नंतर ८० कोटींचा टप्पा पार करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. तर ग्रॉस कलेक्शनचा आकडा ९५.४६ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

The Maharashtra Files सिनेमाचा Music Launch सोहळा! ‘तेरी आंख्या का काजल’ गर्लचं मराठमोळं गाणं

कमाईचा तपशील पाहता, पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ५७.७ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आठव्या दिवशी ३.५ कोटी, नवव्या दिवशी ६.३ कोटी, दहाव्या दिवशी ७.६ कोटी, अकराव्या दिवशी २.८ कोटी आणि बाराव्या दिवशी ३ कोटी रुपयांची कमाई झाली. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसांत हा सिनेमा आणखी मोठा विक्रम करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या चित्रपटामुळे Riteish Deshmukh याने मराठी चित्रपटसृष्टीत सलग चौथं यश मिळवलं आहे. याआधी ‘Lai Bhaari’, ‘Mauli’ आणि ‘Ved’ हे त्याचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते. दिग्दर्शक म्हणूनही हा त्याचा सलग दुसरा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, जवळपास ७५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने अवघ्या १२ दिवसांतच आपला खर्च वसूल करत नफ्यात प्रवेश केला आहे. आतापर्यंत चित्रपटाने ५.९ कोटी रुपयांचा नफा कमावत ७.८६ टक्के ROI नोंदवला आहे.

Suna Yeti Ghara : जबरदस्त! मनोरंजनाचं वादळ; दोन घरांचा वाद मिटेल का? रक्ताचं नातं जिंकेल का? Promo Released

भव्य सेट्स, दमदार अभिनय, प्रभावी कथा आणि प्रेक्षकांकडून मिळणारे प्रचंड प्रेम यामुळे ‘Raja Shivaji’ सध्या मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरत आहे.

Web Title: Raja shivaji movie 12 days box office collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • latest movies
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

के. सी. बोकाडिया यांचा सिनेमा येतोय! ‘Teesri Begum’ सिनेमा ‘या’ तारेखपासून होतोय लाँच, कोणता OTT? जाणून घ्या
1

के. सी. बोकाडिया यांचा सिनेमा येतोय! ‘Teesri Begum’ सिनेमा ‘या’ तारेखपासून होतोय लाँच, कोणता OTT? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.