Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपहरण, रहस्य आणि थराराचा जबरदस्त संगम; ‘बोल बोल राणी’ चा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा

रहस्य, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला ‘बोल बोल राणी’ हा मराठी चित्रपट 10 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटाचे आकर्षण ठरत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 16, 2026 | 07:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगू लागली आहे.
  • टीझर ही त्याची फक्त छोटीशी झलक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
  • 10 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या थरारपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर प्रयोग करण्याचा ट्रेंड वाढत असताना आता रहस्य, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड निर्मित या चित्रपटात सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता कमालीची वाढली असून, सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगू लागली आहे.

Marathi Serial Update : मालिकांच्या वेळापत्रकात मोठा बदल! ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ची वेळ बदलली; कोणती मालिका घेणार निरोप?

चित्रपटाची कथा एका महिलेभोवती फिरणाऱ्या गूढ घटनांवर आधारित असून, अपहरण, रहस्य आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला हा प्रवास प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्याचे संकेत टीझरमधून मिळतात. प्रभावी पार्श्वसंगीत, वेधक दृश्यरचना आणि थरारक ॲक्शन सिक्वेन्समुळे चित्रपटाचे वातावरण अधिकच गहिरे झाले आहे.

चित्रपटातील संवाद आणि कथानकाची मांडणीही विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. प्रत्येक दृश्यामागे एखादे रहस्य दडले असल्याची भावना निर्माण होत असल्याने प्रेक्षकांमध्ये पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम राहते. त्यामुळे हा चित्रपट सस्पेन्सप्रेमींसाठी एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सिड विंचुरकर यांच्या मते, ‘बोल बोल राणी’ हा केवळ सस्पेन्सपट नसून मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि संघर्ष यांचे विविध पैलू उलगडणारा थरारपट आहे. आजच्या प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्याच्या उद्देशाने ही कथा साकारण्यात आली असून, टीझर ही त्याची फक्त छोटीशी झलक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या चित्रपटाची निर्मिती अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली यांनी केली आहे. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी हे सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली असून, 10 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या थरारपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Web Title: Trailer out for sai tamhankars latest movie bol bol rani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • latest movies
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव
1

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.