
फोटो सौजन्य - Social Media
मालिका क्षेत्रातील ‘हा’ चेहरा झळकणार ‘लग्नपंचमी’ या नाटकात!
मालिका क्षेत्रात प्रसिद्ध असणारा चेहरा, अभिनेत्री विदुला चौगुले आता अमृताच्या जागी दिसणार आहे. अमृताने आजवर साकारलेल्या पात्राला विदुला न्याय देऊ शकेल का? असा प्रश्न अमृताच्या चाहत्यांना नक्कीच पडला आहे. परंतु, विदुलाला या मंचावर पाहण्यासाठी प्रेक्षकमंडळी आतुरली आहे, हेही तितकेच खरे! विदुला ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून लोकप्रिय झाली. पुढे ती विविध सिनेमांमध्ये झळकली. परंतु, नुकताच जगासमोर आलेला सिनेमा ‘सुपर डुपर’ मध्ये विदुला सिनेमाच्या मुख्य भूमिकेत झळकली होती, तसेच ती या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकरची सहकलाकार होती.
अमृताची पूर्णपणे Exit नाही!
अमृता खानविलकर जरी ‘लग्नपंचमी’ या नाटकातून Exit घेत आहे. तरी ती पूर्णपणे या नाटकातून तुटली जाणार नाहीये. याचे कारण गेल्या 100 पेक्षा जास्त प्रयोगांमध्ये, अमृताने मुख्य अभिनेत्रीची धुरा सांभाळली. याचबरोबर ती ‘लग्नपंचमी’ या मालिकेची निर्माती आहे. त्यामुळे, निर्माती म्हणून ती नेहमीच ‘लग्नपंचमी’ या नाटकाशी जोडली असणार आहे. माध्यमांशी संवाद साधताना अमृता सांगते की, “‘लग्नपंचमी’ या नाटकामुळे नाटकात काम करण्याचे माझे स्वप्न अखेर पूर्ण झाले. रंगभूमीने मला प्रेम, समाधान… अगदी सगळं काही दिलं. अशात माझ्या सहकालाकरांसह काम करण्याचा अनुभवही काही ओरच होता. मी प्रेक्षकांची कायम ऋणी राहील.”
‘या’ कारणामुळे घेतली Exit!
अमृता खानविलकर फक्त मराठी सिनेक्षेत्रात झळकली नसून हिंदी सिनेक्षेत्रातही तिने तिच्या अभिनयाचा डंका गाजवला आहे. अमृता आता ‘चिरंजीवी हनुमान’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे. एकावेळी नाटक आणि सिनेमा दोन्ही हाताळणे शक्य नसल्यामुळे तिने ‘लग्नपंचमी’ या नाटकातून माघार घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर अभिनेत्री ‘श्री रामभूमी’ या चित्रपटातही झळकणार आहे.