Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devkhel Web Series: अभिनय, फॅशन आणि कलाकृतींचा परिपूर्ण संगम, प्राजक्ता माळीचा ‘देवखेळ’ प्रवास

अभिनेत्री प्राजक्ता माळी झी 5 वरील बहुचर्चित वेबसीरिज ‘देवखेळ’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली असून, तिच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 04, 2026 | 01:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनय, फॅशन आणि आपल्या उत्तम कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिच्या प्रत्येक भूमिकेतून वेगळेपण जपणारी प्राजक्ता सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच ती झी 5 वरील बहुचर्चित वेबसीरिज ‘देवखेळ’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली असून, तिच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.‘देवखेळ’मधील तिची भूमिका भावनिक, ताकदीची आणि कथेला पुढे नेणारी असल्याचं प्रेक्षकांकडून सांगितलं जात आहे. सोशल मीडियावरही तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होत असून, प्राजक्ता माळी पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वात आपली वेगळी छाप पाडताना दिसत आहे.

ZEE5 वर प्रदर्शित झालेली देवखेळ ही वेब मालिका तिच्या रोमहर्षक कथानक आणि स्थानिक संस्कृतीशी जोडलेल्या मांडणीमुळे सातत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. कोकणच्या वातावरणनिर्मिती करणाऱ्या पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका रहस्य, लोककथा आणि मानसशास्त्रीय नाट्य यांचा सुरेख संगम आहे यात शंका नाही.

देवखेळ सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अनुभव देते. प्रदर्शित झाल्यापासून देवखेळला समीक्षकांकडूनही मोठे कौतुक मिळत असून तिचे बहुपदरी लेखन, प्रभावी अभिनय आणि प्रादेशिक परंपरा व श्नेत्रदीपक सादरीकरण यासाठी विशेष दाद मिळत आहे. प्रेक्षकांनाही या वेब मालिकेचा रोचक विषय, उत्कंठावर्धक मांडणी आणि स्थानिक लोककथेचे वास्तवदर्शी चित्रण विशेष भावले असून, सध्या चर्चेत असलेल्या मराठी OTT मालिकांपैकी ही एक ठरली आहे.

प्राजक्ता माळी ही तिच्या बहुमुखी अभिनयासाठी आणि विविध शैली व माध्यमांमध्ये सहजतेने वावरण्यासाठी ओळखली जाते. कलाकारांसाठी केवळ व्यावसायिक यश नव्हे तर भावनिक आणि कलात्मक समाधान देणारे प्रकल्प मिळणे ही दुर्मिळ आणि समाधानकारक गोष्ट असते. देवखेळमुळे प्राजक्ताला परंपरा आणि तर्कशुद्ध विचार यांचा समतोल साधणाऱ्या कथानकाचा भाग होण्याची संधी मिळाली. या मालिकेमुळे तिला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि बौद्धिकदृष्ट्या गुंतवून ठेवणाऱ्या कथेमध्ये काम करण्याचा अनुभव मिळाला, ज्यामुळे अर्थपूर्ण आणि विविध कथाकथनाची निवड करणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख अधिक दृढ झाली.

Dhurandhar ने 59 दिवसात विकली 4 कोटी तिकिटे; आमिर, शाहरुख आणि सलमानला मागे टाकत मोडले 15 चित्रपटांचे रेकॉर्ड

याबाबत प्राजक्ता माळी म्हणाली “२०२५ हे वर्ष माझ्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या खूप सुंदर आणि समाधानकारक ठरले. मला अनेक प्रतिभावान कलाकार, दिग्दर्शक आणि टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे माझी सर्जनशीलता कायम जिवंत राहिली. त्याच काळात आम्ही ‘देवखेळ’चे चित्रीकरण केले आणि या प्रकल्पाचा भाग होऊन मला खूप आनंद झाला. ही माझी पहिली वेब सिरीज नसली तरी तिची वेगळी आणि बहुपदरी कथा तिला विशेष बनवते. ‘देवखेळ’च्या प्रदर्शानामुळे २०२६ ची सुरुवात खूप सकारात्मक झाली आहे, असे मला वाटते. प्रेक्षक या मालिकेशी नक्कीच जोडले जातील, आणि वर्षभर या मालिकेला मिळणारे प्रेम आणि कौतुक असेच कायम राहील, अशी मला आशा आहे”

‘अपोकॅलिप्टो’ अभिनेता Gerardo Taracena यांचे धक्कादायक निधन; वयाच्या 55 व्या वर्षी अभिनेत्याने घेतला चाहत्यांचा निरोप

Web Title: A perfect blend of acting fashion and artistry prajakta malis journey in devkhel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Ankush Choudhary
  • prajakta mali
  • Web Series

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.