Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Aai Tuljabhavani Serial: कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवरात्रोत्सव विशेष भागात AI आणि VFX तंत्रज्ञानातून देवीचे भव्य रूप साकारले आहे. जाणून घ्या खास वैशिष्ट्ये.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 12, 2026 | 08:30 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aai Tuljabhavani Serial:  कलर्स मराठीवरील लोकप्रिय ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सध्या नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. मालिकेत बालशौर्याचा नवा प्रवास उलगडणारी ‘तुळजाची बालसेना’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवरात्रोत्सवाच्या विशेष भागात आई तुळजाभवानी आपल्या भक्तांना धैर्य, एकजूट आणि संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, यंदा AI आणि VFX तंत्रज्ञानाच्या मदतीने देवीचे दिव्य, तेजस्वी आणि भव्य रूप साकारण्यात आले आहे.

असुरिकेच्या मायावी शक्तीचे बालसेनेसमोर आव्हान

असुरिकेशी झालेल्या संघर्षात पद्मावर हल्ला झाल्यानंतर बालटोळी घाबरली आहे. ‘असुरांशी लढणं आपलं काम नाही,’ असं म्हणत ही बालसेना हतबल झालेली दिसते. दुसरीकडे, महादेवांच्या लीलेने गुहेत बंदिस्त असलेली असुरिका ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे पुन्हा प्रकट झाली आहे. त्यामुळे बालरूपातील तुळजाई आणि तिच्या बालसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

असुरिकेने रचलेल्या मायावी लीलेत भव्य मायावी महाल, कपटी मायाजाळ आणि दैवी शक्तींचा थरार पाहायला मिळणार आहे. या संकटाचा सामना करताना तुळजाई आणि तिची बालसेना कोणती युक्ती लढवणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. अत्याधुनिक VFX तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारलेला हा कथाभाग प्रेक्षकांना पौराणिक विश्वाचा भव्य अनुभव देणार आहे.

AI तंत्रज्ञानातून साकारले आई तुळजाभवानीचे दिव्य रूप

यंदाच्या नवरात्रोत्सवात मालिकेत आई तुळजाभवानीचे तेजस्वी आणि अलौकिक रूप पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पारंपरिक आभूषणांनी सजलेली देवी, तिच्या हातातील शंख, कमळ, गदा, त्रिशूळ, तलवार आणि सुदर्शन चक्र यांची भव्यता या विशेष सादरीकरणातून अधोरेखित करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष चित्रीकरणाला AI तंत्रज्ञानाची जोड देऊन देवीचे रूप साकारण्यात आले आहे. दिव्य प्रकाशकिरणांनी उजळलेली आणि प्रसन्न मुद्रेने खुललेली देवीची प्रतिमा प्रेक्षकांना जणू प्रत्यक्ष गाभाऱ्यात उभे राहून दर्शन घेत असल्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करते.

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित

देवीचे भव्य रूप साकारण्यासाठी टीमने घेतले तीन दिवस

मालिकेचे VFX दिग्दर्शक प्रदीप भगत यांच्या मार्गदर्शनाखाली VFX आणि AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हे विशेष सादरीकरण तयार करण्यात आले आहे. देवीच्या रूपातील बारकावे आणि तिच्या आयुधांची भव्यता ३६० अंशांतून दाखवण्यासाठी टीमला एकूण तीन दिवस लागले.

AI तंत्रज्ञान प्रत्येक वेळी नवीन आणि वेगळी प्रतिमा तयार करत असल्याने देवीच्या रूपात एकसंधता राखणे आणि त्यातील मूळ दैवी भाव कायम ठेवणे हे टीमसमोर मोठे आव्हान होते. त्यासाठी प्रत्यक्ष चित्रीकरण, पारंपरिक 3D तंत्रज्ञान, VFX आणि AI यांचा एकत्रित वापर करण्यात आला.

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी

कधी आणि कुठे पाहता येणार ‘आई तुळजाभवानी’?

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत भक्ती, बालशौर्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. देवीचे भव्य रूप आणि असुरिकेच्या मायावी शक्तींशी होणारा संघर्ष अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका ‘आई तुळजाभवानी’, रात्री ८.५० वाजता, फक्त कलर्स मराठीवर.

Web Title: Aai tuljabhavani serial ai vfx navratri special ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Colours Marathi
  • entertainment
  • Marathi Serial
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Exclusive: ‘महिलेने सुपरवुमन होण्याची गरज नाही, स्वतःवर प्रेम…’, अदिती सारंगधरने दुर्गेच्या नवरुपांची व्यक्त केली संकल्पना
1

Exclusive: ‘महिलेने सुपरवुमन होण्याची गरज नाही, स्वतःवर प्रेम…’, अदिती सारंगधरने दुर्गेच्या नवरुपांची व्यक्त केली संकल्पना

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!
3

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित
4

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.