Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘महिलेने सुपरवुमन होण्याची गरज नाही, स्वतःवर प्रेम…’, अदिती सारंगधरने दुर्गेच्या नवरुपांची व्यक्त केली संकल्पना

Exclusive: झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिकेत तेजस्विनी भूमिका साकारणारी चतुःरस्र अभिनेत्री अदिती सारंगधरने नवराष्ट्रसह महिलांच्या शक्तीविषयी नवरात्रीच्या निमित्ताने खास गप्पा मारल्या आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 12, 2026 | 07:45 AM
Exclusive: अदितीने दुर्गेच्या नवरुपांची मनातील संकल्पना केली व्यक्त

Exclusive: अदितीने दुर्गेच्या नवरुपांची मनातील संकल्पना केली व्यक्त

Follow Us
Follow Us:

Exclusive: झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ या मालिकेत सध्या जय आणि शरू एकमेकांच्या प्रेमात पडल्याची जाणीव होत आहे आणि यामुळे सर्वात जास्त परिणाम होणार आहे तो म्हणजे जयची आई तेजस्विनीवर. ही भूमिका अदिती सारंगधर साकारत असून आई म्हणून ती नक्की या आहे आणि नवरात्रीच्या निमित्ताने आईमधील देवीचे रुप, महिलांनी नक्की स्वतःला कसं आजच्या जगात शक्तीशाली ठेवावं आणि आपल्यातील शक्ती कशी ओळखावी याबाबत अदितीने ‘नवराष्ट्र’शी खास गप्पा मारल्या आहेत. 

नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो. तुझ्या मते एका स्त्रीमध्ये या शक्तींचे प्रतिबिंब कसे दिसते? असं विचारल्यावर नेहमीप्रमाणे खूप विषयांचा अभ्यास असल्यामुळे अदितीने आपले परखड मत मांडले, ती म्हणाली, ‘ज्या देवींना आपण विविध नावांनी पूजतो, तिची अनेक रूपं असतात आणि देवीची ही सर्व रुपं सौम्य, लाघवी, रागीट स्त्री मध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या रुपात नक्कीच दर्शन दिसतात. देवीची ही रुपं म्हणजे स्त्रीच्या भावना आणि या भावना वेळोवेळी बाहेर येणं गरजेचे आहे.’ 

पुढे अदिती म्हणाली की, ‘नवदुर्गा म्हणजे ९ रसाच्या नऊ भावना. अनेकदा या भावना महिला एक्स्प्रेस करायला कचरतात. पण मनातून ती मोकळी होणं गरजेचे आहे. पारंपरिक खेळांमध्ये खेळला जाणारा भोंडला, गरबा, दांडिया हे सर्व या भावना व्यक्त करण्यासाठी आहे. या सर्व रूपांंमध्ये तिच्या भावना दडलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी महिलांसाठी घराचा उंबरठा ओलांडणं हे त्रासदायक होतं आणि या कोणत्या तरी मार्गाने तिने घराबाहेर येण्यासाठी सण निर्माण झाले. मेंटल हेल्थ आता खूप जागरूकपणाने बोलतो पण आधी ती संकल्पना नव्हती. पूर्वी जेव्हा बायका घरात बांधल्या गेल्या होत्या. हा काही तासांचा आनंद मिळाला की वर्षभर त्या हा आनंद घेऊन जगत होत्या. माझ्यासाठी ही नऊ देवीची ९ रुपं अशाच पद्धतीने प्रतिबिंबित होतात’

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

आई ही आपल्या मुलांसाठी दुर्गेसारखी शक्तिशाली आणि अन्नपूर्णेसारखी मायेची असते. देवीच्या या रूपांकडे तू कसे पाहतेस? असं म्हटल्यावर अदिती पटकन म्हणाली की, ‘आताच्या आई या अत्यंत रड्या आहेत असं मला वाटतं. कारण पूर्वी इतकी मूल सांभाळली जायची, पण हे अर्थात वाईट अर्थाने नाही. धावपळीच्या जगात आपण एकच मूल जन्माला घालतो आणि त्यामुळे प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी नेहमी पझेसिव्ह असते.’ 

यापुढे जाऊन अदिती असंही म्हणाली की, ‘जर योग्य वयात लग्न आणि मूल झालं नाही तर भावनांचा विश्वकल्लोळ होतो असं मला वाटतं आणि त्यामुळे हा समतोल साधताना नक्कीच दमछाक होते. माझ्यातल्या दुर्गेला असं वाटतं की सनई चौघडे मालिकेतील तेजस्विनी भूमिका साकारताना, जय, गौतम आणि साक्षी ही माझी मूलं आहेत आणि ती त्यानुसार वागत आहे. सोसायटीच्या दृष्टीने चुकीचं असेल पण आईच्या दृष्टीने ते नक्कीच चुकीचं नाही. 

‘आई म्हणून जगताना ही सर्व रुपं पहावी लागतात. प्रत्येक आई ही मुलाच्या बाबतीत पझेसिव्ह असते आणि सासू होणार हे लक्षात आल्यावर आनंद होतोच पण आपला मुलगा आपल्यापासून दूर जाणार हे फिलींग नक्कीच वेगळं आहे. पण प्रत्येक आईची इनसिक्युरीटीचं प्रमाण वेगवेगळं असतं. व्यक्त होण्याची पद्धतही वेगळी आहे. मी जेव्हा तेजस्विनी ही भूमिका साकारत आहे तर मला आई म्हणून ती तिच्या जागी योग्य वाटते. लोकांना ती चुकीची वाटत असली तरीही आईच्या दृष्टीने मात्र ती अत्यंत योग्य आहे. दुर्गेचं तिचं रुप कोणतं आहे ते लवकरच कळेल.’

 आजच्या काळातील स्त्रीसमोर घर आणि करिअर यांचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान आहे. त्याबद्दल तुझं मत काय? या प्रश्नावर अदिती म्हणाली की, ‘सनई चौघडेचं शूट ८-१० दिवसच शूट करते. मी मुलासाठी जो वेळ आहे तो त्याला योग्य पद्धतीने देते. कारण तो सध्या माझं प्राधान्य आहे. आता कामासाठी स्वतःला खूप जास्त प्रमाणात त्रास देऊ शकत नाही. स्वयंपाक करायला आवडतो म्हणून तो करायला जर आता जमत नसेल तर ते करण्याची आता गरज नाही वाटत. 

मला सुपरवुमन बनायचं आहे या टॅगमागे स्वतःकडे दुर्लक्ष करणं हे खूपच चुकीचं आहे असं मला वाटतं. जास्तीत जास्त वेळ नवरा आणि मुलगा देण्याचा प्रयत्न करते. माझा आनंद कशात आहे हे आता जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे जर माझ्याकडे पर्याय आहेत, तर घर आणि करिअर सांभाळताना चिडचिड कमी करणं, डाएट करणं, स्वतःकडे लक्ष देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी लागणारे पर्याय मी निवडणं जास्त गरजेचे आहे असं मला वाटतं.’

‘सनई चौघडे’मुळे पुन्हा बहरली मेघना एरंडे जोशी-अदिती सारंगधर यांची कॉलेजमधील मैत्री

स्त्रीने स्वतःसाठी जगणे आणि स्वतःच्या स्वप्नांना प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे? यावर अदिती पटकन म्हणाली की, ‘मला हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं वाटतं. पूर्वीच्या काळातली माणसं ग्रेट होती. पण ते जगले म्हणून आपण जगायला पाहिजे असं मला अजिबात नाही वाटत. आपण आपल्याला जे हवं ते करायला मोकळे आहोत. प्रत्येक महिलेने स्वतःसाठी जगणं आणि स्वतःच्या स्वप्नांना बळकटी द्यायलाच हवी.’ 

या नवरात्रीत महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तुम्हाला कोणता संदेश द्यावासा वाटतो? ‘मला प्रत्येक महिलेला हेच सांगावं वाटतं की, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर प्रेम करायला शिकलात तर तुम्ही सर्वांना योग्य पद्धतीने सांभाळू शकता. तुम्ही जर स्वतः त्रासात असाल तर दुसऱ्यांनाही आनंदी नाही ठेऊ शकत. कुठल्यातरी व्याधींच्या रूपात आपल्या भावना बाहेर निघतात. भावनांचा निचरा न झाल्यास हे आजार होतात. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आणि नको असणाऱ्या गोष्टींना बाहेर काढून या नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक महिलेने स्वतःची काळजी ही घ्यायलाच हवी असं मी आवर्जून सांगेन’

एका शब्दात तुझ्यासाठी मातृत्व म्हणजे काय? – Irreplaceable, मातृत्व हे कधीच पैशाने विकत घेता येत नाही.  आईची जागा दुसरी कोणीच कधीच घेऊ शकत नाही असं मला वाटतं. अदितीने आपली मतं परखडपणे आणि स्पष्ट मांडत नवरात्रीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि सनई चौघडे आवर्जून बघा हे सांगायलाही ती विसरली नाही. 

Web Title: Zee marathi sanai chaughade fame actress aditi sarangdhar shared thought on navaratri and women exclusive dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 07:45 AM

Topics:  

  • Navratri 2026
  • zee marathi

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी
1

Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!
2

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!

Kolhapur Ekvira Devi: कोल्हापुरात ‘तांदळाची देवी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री एकवीरा देवीचा इतिहास!
3

Kolhapur Ekvira Devi: कोल्हापुरात ‘तांदळाची देवी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री एकवीरा देवीचा इतिहास!

Navratri 2026: घटस्थापनेच्या वेळी धान्य पेरण्याची परंपरा का? नऊ दिवसांनी काय करावे हे जाणून घ्या…
4

Navratri 2026: घटस्थापनेच्या वेळी धान्य पेरण्याची परंपरा का? नऊ दिवसांनी काय करावे हे जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.