Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Star Pravah च्या ‘Anandi’साठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला; दोन दिग्गज कलाकारांचं पुनरागमन, प्रोमोला २ मिलियन व्ह्यूज

या मालिकेतून मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार म्हणजेच अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आनंदी मालिकेच्या निमित्ताने दोघेही बऱ्याच काळानंतर मालिका विश्वात पुनरागमन करणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 07, 2026 | 01:12 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाहवर लवकर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंदी ही नवीन मालिका प्रसारित होण्यासाठी सज्ज झाली असून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकाच्या पहिल्या प्रोमोला अवघ्या काही तासांत २ मिलियन पेक्षा जास्त व्हूज मिळालेत. या मालिकेतून मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार म्हणजेच अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आनंदी मालिकेच्या निमित्ताने दोघेही बऱ्याच काळानंतर मालिका विश्वात पुनरागमन करणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आनंदीच्या आजोबांची म्हणजेच आत्माराम जाधव ही व्यक्तिरेखा साकारणार असून समीर धर्माधिकारी प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची भूमिका साकारणार आहेत.

या भूमिकेविषयी सांगताना समीर धर्माधिकारी म्हणाले, ‘स्टार प्रवाहसोबतची माझी ही पहिली मालिका. जवळपास ७ वर्षांनंतर पुन्हा मालिका करतोय. प्रचंड उत्सुकता आहे. मालिकेची टीम खूप छान आहे. वेगळा विषय हाताळला जातोय. युगंधर ही व्यक्तिरेखा मी साकारणार आहे. युगंधरला कामापेक्षा महत्त्वाचं काही नाही. काम म्हणजे धर्म त्याच्यासाठी. गावातील माणसांसाठी युगंधरचा शब्द हा अंतिम असतो. याचं कारण म्हणजे एक काळ असा होता जेव्हा गावातले लोक बेरोजगार होते. त्यावेळी घरटी प्रत्येकाला त्याने त्याच्या मिलमध्ये काम दिलं. त्यामुळे कित्येक संसार तरले, घरं तरली. आजही लोक त्याला देव मानतात. प्रेक्षकांना ही मालिका आणि माझी भूमिका नक्की आवडेल याची खात्री आहे.’

स्टार प्रवाहवरील आनंदी या मालिकेत Arun Nalawade आत्माराम जाधव उर्फ आबा ही भूमिका साकारणार आहेत. आबा इचलकरंजीत आपल्या तीन नातींसोबत राहतात. त्यांच्या मुलगी वसुधा आणि जावई यांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्या धक्क्यातून सावरत आबांनी तीन नातींची जबाबदारी उचलली आणि उतारवयातही मेहनत करून त्यांना सांभाळत आहेत. ते युगंधरच्या मिलमध्ये काम करतात.आनंदीला दृष्टी नसली तरी आबांनी आयुष्य बघायचा दृष्टिकोन तिला दिला. आबांचं एकच स्वप्न आहे ते म्हणजे तिघी नातींनी शिकावं, स्वत:च्या पायावर उभं रहावं आणि त्यांचं चांगल्या घरात लग्न व्हावं. या मालिकेच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे जवळपास तीन वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरामगन करणार आहेत.

बाई घरही चालवते आणि बॉक्स ऑफिसही! अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चित्रपटाचे 50 दिवस पूर्ण

याविषयी सांगताना अरुण नलावडे म्हणाले, ‘खूप वेगळी भूमिका आहे. अश्या पद्धतीच्या भूमिका खूप कमी मिळतात. आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या तीन नातींच्या आजोबांची भूमिका मी साकारणार आहे. या तिन्ही मुली खूप गोड आहेत. माझा स्वभाव तसा मितभाषी आहे. मात्र या तिन्ही गुणी अभिनेत्रींसोबत छान गट्टी जमलीय. खूप आदराने त्या सर्वांशीच वागतात. तिघींचे स्वभाव वेगळे आहेत. नवं काहीतरी शिकण्याची त्यांची सतत धडपड सुरु असते. त्यामुळे मी देखिल बऱ्याच नव्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतोय. स्टार प्रवाह वाहिनी मालिकेची गोष्ट खूप छान पद्धतीने पुढे नेईल याची खात्री आहे.’

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट; समीर-अर्पिताच्या आयुष्यात येणार लग्नाचं नवं वळण

Web Title: Audience excitement peaks for star pravah anandi two veteran actors return as promo crosses 2 million views

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण
1

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य
2

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?
3

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?

The India Story Review: दमदार विषय, पण कमकुवत स्क्रीनप्लेमुळे फिका पडला श्रेयस तळपदेचा चित्रपट
4

The India Story Review: दमदार विषय, पण कमकुवत स्क्रीनप्लेमुळे फिका पडला श्रेयस तळपदेचा चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.