Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Jadhav:’ही’ भूमिका साकारताना भरत जाधव यांनाही आलं होतं टेन्शन; पहिल्या कोर्टरूम सीनचा सांगितला अनुभव

Bharat Jadhav: विनोदी अभिनेता भरत जाधव यांनी ‘कोण यशवंत पानसरे?’ या वेबसीरिजमध्ये पहिल्यांदाच वकिलाची भूमिका साकारली आहे. कोर्टरूममधील अभिनयाची आव्हानं आणि भूमिकेचा अनुभव त्यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 27, 2026 | 04:50 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bharat Jadhav: मराठी मनोरंजनविश्वात आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते भरत जाधव आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नेहमी विनोदी भूमिकांमध्ये दिसणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच वकिलाची भूमिका साकारली आहे. त्यांची ‘कोण यशवंत पानसरे?’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली असून, यातील त्यांच्या नव्या भूमिकेची चर्चा होत आहे. नेहमी विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भरत जाधव यांना यावेळी कोर्टरूममधील अभिनयाची वेगळी शैली आत्मसात करावी लागली. या भूमिकेचा अनुभव, वकिलाची देहबोली साकारताना आलेली आव्हानं आणि भूमिकेसाठी केलेली तयारी याबद्दल त्यांनी ‘नवराष्ट्र’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

‘विनोद करणं हेदेखील एक सिरियस काम आहे’

विनोदी भूमिका साकारत असलो, तरी आपण नेहमी निर्मात्याचं म्हणणं ऐकून घेतो, असं भरत जाधव यांनी स्पष्ट केलं. स्वतःच्या पद्धतीनेच विनोद सादर करण्यापेक्षा कथेची गरज समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

याबद्दल बोलताना ते म्हणाले की, विनोद करणं हेही एक गंभीर काम आहे. एखाद्याने अचानक चार विनोद सांगायला सांगितले, तर ते सहज शक्य होत नाही. मात्र, एखाद्या गोष्टीतून विनोद निर्माण करणं आणि त्या विनोदाच्या माध्यमातून कथा पुढे नेणं, हे नेहमीच आव्हानात्मक असतं.

वेगळ्या प्रकारची भूमिका साकारताना सुरुवातीला काही गोष्टींबाबत प्रश्न पडतात, असंही त्यांनी सांगितलं. विशेषतः इंग्रजी भाषेचा वापर हा आपल्यासाठी अडचणीचा भाग असल्याचं त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केलं.

स्क्रिप्टमधील प्रत्येक एपिसोडचा ट्विस्ट भावला

वकिलाची भूमिका स्वीकारण्यामागचं कारण सांगताना भरत जाधव यांनी कथेचा उल्लेख केला. निर्मात्यांनी जेव्हा त्यांना गोष्ट ऐकवली, तेव्हाच ती त्यांना आवडली होती. संपूर्ण स्क्रिप्ट वाचल्यानंतर प्रत्येक एपिसोडमध्ये वेगळा ट्विस्ट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

भूमिका आवडली असली, तरी वकिलाची भूमिका पहिल्यांदाच साकारत असल्यामुळे ती योग्य पद्धतीने साकारली जात आहे की नाही, याची त्यांना सतत काळजी वाटत होती. वकिलाच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी देहबोली आणि उभं राहण्याची विशिष्ट पद्धत असते. त्यामुळे आपण ती भूमिका योग्य प्रकारे करत आहोत ना, असा प्रश्न ते वारंवार विचारायचे.

‘वकिलाच्या भूमिकेत इमोशनल होऊन चालत नाही’

कोर्टरूममधील दृश्यांबद्दल बोलताना भरत जाधव यांनी वकिलाच्या अभिनयातील बारकावे उलगडले. त्यांच्या मते, कोर्टरूममध्ये वकिलाची हालचाल मर्यादित असते. काही पावलं चालणं, न्यायाधीशांसमोर किंवा आरोपीच्या दिशेने जाऊन आपली बाजू मांडणं, यावर त्या भूमिकेचा मोठा भाग अवलंबून असतो.

इतर भूमिकांमध्ये भावनिक अभिनयाला वाव असतो; मात्र वकिलाच्या भूमिकेत ठामपणे आपली बाजू मांडणं महत्त्वाचं असतं. समोरचा वकील अचानक एखादा प्रश्न उपस्थित करतो किंवा वेगळा मुद्दा मांडतो, तेव्हा त्याला उत्तर देताना अभिनयातही बारकावे आवश्यक असतात, असं त्यांनी सांगितलं.

वकिलाची भूमिका साकारताना अभिनय अतिशयोक्त न होता सहज आणि संयत असावा, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे या भूमिकेत किती हालचाल करायची, कशा पद्धतीने बोलायचं आणि आपली बाजू कशी मांडायची, याकडे त्यांना विशेष लक्ष द्यावं लागलं.

Pushkar Shrotri: ‘कोण यशवंत पानसरे?’मधील वकिलाची भूमिका ठरली खास; अभिनेत्याने सांगितला व्यक्तिरेखेच्या तयारीचा अनुभव

पहिल्या सीनवेळी भरत जाधव यांनाही वाटलं टेन्शन!

कोर्टरूममधील पहिल्या सीनचा अनुभव सांगताना भरत जाधव यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली. पडद्यावर अनेकदा कोर्टरूममधील दृश्यं पाहिली होती; मात्र प्रत्यक्षात वकिलाची भूमिका साकारताना उभं राहणं, चालणं आणि संवाद म्हणणं यांचा अंदाज घेणं त्यांच्यासाठी नवीन होतं.

पहिल्या सीनमध्ये ते भरत जाधव म्हणूनच थोडे अस्वस्थ होते. पहिलं वाक्य बोलताना आणि पुढचे संवाद म्हणताना त्यांना टेन्शन येत होतं. कुठे उभं राहायचं, किती चालायचं आणि नेमकं कुठे थांबायचं, याबाबत त्यांना स्पष्ट सूचना द्याव्या लागत होत्या. सीनच्या वेळी त्यांना कुठपर्यंत जायचं, कुठे थांबून संवाद म्हणायचे, हे सांगितलं जायचं. असं त्यांनी सांगितले.

नेहमी विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या भरत जाधव यांच्यासाठी वकिलाची ही भूमिका अभिनयाच्या दृष्टीने नवा अनुभव ठरली आहे. भूमिकेतील संयम, देहबोली आणि संवादफेक यांचा मेळ साधत त्यांनी या वेगळ्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

Sai Pallavi Movie: साई पल्लवीचा नवा अवतार पाहिलात का? ‘ओम: चैप्टर 1’मध्ये IPS नित्या रेड्डीची भूमिका

Web Title: Bharat jadhav first time lawyer role kon yashwant pansare series shares experience ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Bharat Jadhav
  • entertainment
  • Web Series

संबंधित बातम्या

Dhurandhar: खाडी देशांत रिलीज नाही, ‘A’ प्रमाणपत्राची मर्यादा; तरीही रणवीर सिंहच्या चित्रपटाची चर्चा, जाणून घ्या ७ कारणं
1

Dhurandhar: खाडी देशांत रिलीज नाही, ‘A’ प्रमाणपत्राची मर्यादा; तरीही रणवीर सिंहच्या चित्रपटाची चर्चा, जाणून घ्या ७ कारणं

Pushkar Shrotri: ‘कोण यशवंत पानसरे?’मधील वकिलाची भूमिका ठरली खास; अभिनेत्याने सांगितला व्यक्तिरेखेच्या तयारीचा अनुभव
2

Pushkar Shrotri: ‘कोण यशवंत पानसरे?’मधील वकिलाची भूमिका ठरली खास; अभिनेत्याने सांगितला व्यक्तिरेखेच्या तयारीचा अनुभव

Sai Pallavi Movie: साई पल्लवीचा नवा अवतार पाहिलात का? ‘ओम: चैप्टर 1’मध्ये IPS नित्या रेड्डीची भूमिका
3

Sai Pallavi Movie: साई पल्लवीचा नवा अवतार पाहिलात का? ‘ओम: चैप्टर 1’मध्ये IPS नित्या रेड्डीची भूमिका

B.P. Singh Passes Away: मनोरंजनविश्वावर शोककळा! ‘CID’चे निर्माते बी.पी. सिंह यांचं निधन, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

B.P. Singh Passes Away: मनोरंजनविश्वावर शोककळा! ‘CID’चे निर्माते बी.पी. सिंह यांचं निधन, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.