
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या प्रचंड हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये राकेश आणि रुचिता यांच्यात जोरदार वाद झाल्याचं स्पष्ट दिसून आले आहे. या भांडणामुळे घरातील वातावरण अक्षरशः तापलं असून, इतर स्पर्धकांसाठी मध्यस्थी करणंही कठीण झालं आहे. ‘बिग बॉस’ने दिलेल्या टास्कदरम्यान या दोघांमध्ये भांडण होताना दिसले आहे. आता आजच्या भागात या दोघांची भांडणं आणखी वाढताना दिसणार आहे.
नेमकं काय घडलं?
नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दिसतं आहे की, एका टास्कदरम्यान किंवा चर्चेच्या वेळी राकेश आणि रुचिता यांच्यात शाब्दिक वादाला सुरुवात होताना दिसत आहे. पाहता पाहता या वादाचे मोठ्या भांडणात रूपांतरित होते. आणि राकेशच्या आक्रमक बोलण्याला रुचिताने तितक्याच ठामपणे प्रत्युत्तर दिल्यामुळे घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले दिसून आले आहे.
दोघांनीही आक्रमक झाल्याचे दिसून येत असून, त्यांच्या वादात इतर घरातील सदस्यही ओढले जातात. आणि ते हा वाद थांबण्याचा प्रयत्न करत आहेत. या राड्यामुळे घरातील समीकरणं बदलण्याची शक्यता असून, कोण कोणाची बाजू मांडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधले आहे. या प्रकरणात बिग बॉस काही कठोर निर्णय घेणार का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. हा वाद नेमका कशामुळे झाला आणि त्याचे परिणाम घरात कसे दिसून येणार, हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे.
Box Office: Mardaani 3 ची पहिल्या मंगळवारीही कमाईत घसरण, जाणून घ्या चित्रपटाचे Collection
प्रोमोमध्ये काय म्हणाले रुचिता आणि राकेश
शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की रुचिता राकेशला म्हणते, “खेळायचं तर खेळ, नाहीतर जा घरी!” यावर राकेश तिला फाटकारून म्हणतो, “फालतू…” मग पुन्हा रुचिता म्हणते, “तू फालतू रे…” मग दोघांच्या भांडणात अनुश्री रुचिताला समजावताना म्हणते, “तू कशाला तुझ्या तोंडाने बोलतेयस?” या नंतर रुचिता पुन्हा राकेशला “अरे, हा एक नंबरचा नाटकी माणूस आहे!” असे म्हणते. आणि राकेश रागात तिला “चूप बस…! ही राहील किंवा मी राहील या घरात… दॅट्स इट!”. असं म्हणताना दिसला आहे.