Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत खलबतं

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनी करणाच्या चर्चा होत्या, अजित पवार यांचीच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 04, 2026 | 01:49 PM
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत खलबतं
Follow Us
Close
Follow Us:
  • 28 जानेवारीला अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
  • दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चा
  • आज शरद पवार- जय पवार आणि पार्थ पवारांमध्ये चर्चा
Baramati News:  राज्याच्या राजकीय वर्तुळातून  एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक सुरू आहे. गेल्या ८-१० दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यावरून राजकारणही चांगलंच रंगलं होतं. पण आज पार्थ पवार आणि जय पवारांसोबत आज काय खलबतं सुरू आहेत. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवार आणि पवार कुटुंबीयांची एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, यामध्ये राजकीय आणि कौटुंबिक विषयांवर खलबते झाल्याची चर्चा आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विश्वस्त पदावर पार्थ पवार की जय पवार यांची निवड करायची, तसेच अजित पवारांच्या स्मारकाबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते.

याशिवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेवरही या बैठकीत खल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या अंत्यविधीच्या ठिकाणाची पाहणी देखील केली. या बैठकीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी, बारामतीतील या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांच्या रिक्त पदांवर आता घरातील सदस्यांची वर्णी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी भूषवलेल्या विविध महत्त्वाच्या संस्थांच्या अध्यक्ष आणि संचालक पदांवर आता पवार कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती होणार असल्याचे निश्चित झाले आहे. विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अजित पवार हे माळेगाव साखर कारखाना, विद्या प्रतिष्ठान, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन, रयत शिक्षण संस्था आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांचे नेतृत्व करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील काही महत्त्वाची पदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात येणार आहेत. तर पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे कोणत्या जबाबदाऱ्या दिल्या जातात, याकडे राजकीय आणि सहकार वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?
विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या पवार कुटुंब आणि विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या माळेगाव साखर कारखाना, विद्या प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अशा संस्थांच्या जबाबदाऱ्या कुटुंबात वाटून घेतल्या जाणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. मात्र, पार्थ पवार यांना दोन वर्षांच्या उर्वरित कालावधीऐवजी ६ वर्षांच्या पूर्ण टर्म असलेल्या जागेवर राज्यसभेवर पाठवण्याचे नियोजन सुरू आहे.

बैठकीनंतर शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांवरही चर्चा केल्याचे समजते. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्याकडे काही महत्त्वाची पदे सोपवून पार्थ आणि जय पवार यांच्याकडे युवा नेतृत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Baramati politics sharad pawar held discussions with parth and jay pawar at the vidya pratishthan office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • Baramati Politics
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • parth pawar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Palghar News :  खोटे मृत्यू दाखले , ग्रामपंचायतची खोटी कागदपत्र, खोट्या सह्या करून परस्पर विक्री
1

Palghar News : खोटे मृत्यू दाखले , ग्रामपंचायतची खोटी कागदपत्र, खोट्या सह्या करून परस्पर विक्री

फलटणच्या श्रीराम कारखान्याबाबत मोठा निर्णय; जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द होणार? 18 मे रोजी फैसला
2

फलटणच्या श्रीराम कारखान्याबाबत मोठा निर्णय; जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द होणार? 18 मे रोजी फैसला

Buy vs Rent: घर घेणं फायद्याचं की भाड्याने राहणं? काय आहे रिअल इस्टेटचा 1% Rule, जो वाचवू शकतो तुमचे लाखो रुपये!
3

Buy vs Rent: घर घेणं फायद्याचं की भाड्याने राहणं? काय आहे रिअल इस्टेटचा 1% Rule, जो वाचवू शकतो तुमचे लाखो रुपये!

कमी किमतीचा EMI तुमच्यासाठी ठरु शकतो तोट्याचा, TV किंवा Phone खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
4

कमी किमतीचा EMI तुमच्यासाठी ठरु शकतो तोट्याचा, TV किंवा Phone खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.