Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश

Independence Day Special: ‘कमळी’ची विजया बाबर आणि ‘ज्योती’ची पूर्वा कौशिक यांनी स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला. ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही’, असं दोघींनी म्हटलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 11, 2026 | 11:56 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Independence Day Special: स्वातंत्र्य म्हणजे केवळ मोकळेपणाने जगण्याचा अधिकार नव्हे, तर स्वतःचे विचार मांडण्याचे धैर्य, आपल्या स्वप्नांसाठी उभे राहण्याची ताकद आणि त्यासोबत आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणेही आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून पडद्यावर साकारल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखांचा प्रेक्षकांच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर मोठा प्रभाव पडतो. आपल्या आवडत्या कलाकारांच्या भूमिका पाहताना प्रेक्षक त्यांच्या संघर्षाशी, विचारांशी आणि स्वप्नांशी जोडले जातात.

‘कमळी’ने दिला आत्मविश्वासाचा संदेश

‘कमळी’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून अभिनेत्री विजया बाबरने आपल्या हक्कांसाठी, स्वप्नांसाठी आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्यासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या मुलीची कहाणी प्रेक्षकांसमोर आणली आहे. तिच्या व्यक्तिरेखेने तरुण-तरुणींसोबतच शाळकरी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना प्रेरणा दिली आहे.

स्वातंत्र्याचा अर्थ सांगताना विजया बाबर म्हणाली, “स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही भीतीशिवाय मनमोकळेपणे जगणे. एक कलाकार म्हणून मी कोणत्याही एका बाजूची व्याख्या न करता मानवी भावना जशा आहेत, तशा प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करते.”

डिजिटल क्रांतीमुळे आज प्रत्येक सामान्य व्यक्तीला स्वतःचे विचार मांडण्याची आणि पुढे जाण्याची समान संधी मिळाल्याचंही विजयाने सांगितलं. शिक्षणापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांनाही डिजिटल माध्यमातून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळत असल्याचं ती म्हणाली.

‘आजचा भारत आपल्या संस्कृतीवर अधिक अभिमान बाळगतोय’

विजया पुढे म्हणाली की, आज चित्रपट आणि मालिकांमध्ये केवळ काल्पनिक कथांपेक्षा आपल्या घरातील, आपल्या मातीशी जोडलेल्या आणि वास्तविक आयुष्यातील कथा अधिक पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कलाकारांसोबत प्रेक्षकही घडत आहेत, हे चित्र आशादायी असल्याचं तिने सांगितलं.

आजची स्त्री कणखर आणि अभ्यासू असण्यासोबतच भावनाशीलही आहे आणि या दोन्ही बाजू महत्त्वाच्या असल्याचं विजयाने नमूद केलं. नवीन पिढीने कितीही प्रगती केली तरी आपल्या माणसांचा आदर करावा, जबाबदारीचं भान ठेवावं आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जावं, असंही तिने सांगितलं.

Crime Patrol 2026: ‘क्राईम पेट्रोल’च्या नव्या सीझनमध्ये अजय देवगणची एन्ट्री; थरारक केसेसचा प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

‘ज्योती’च्या मते स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचं मत मांडण्याचं धैर्य

‘दीपज्योती’ मालिकेतील ‘ज्योती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हीदेखील आपल्या विचारांवर ठाम राहणारी आणि आपल्या माणसांसाठी लढणारी व्यक्तिरेखा साकारत आहे.

पूर्वाच्या मते, गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांच्या आयुष्यात झालेला मोठा सकारात्मक बदल म्हणजे स्वतःचं मत मांडण्याचा वाढलेला आत्मविश्वास. ती म्हणाली, “माणसं हल्ली बोलायला लागली आहेत. स्वतःचं मत मांडण्यासाठी बिनधास्तपणे व्यक्त व्हायला लागली आहेत. हा लोकशाहीचाच एक भाग आहे आणि सध्याच्या काळात हा खूप मोठा आणि गरजेचा सकारात्मक बदल आहे.”

सोशल मीडियामुळे आजच्या पिढीला विविध विषयांवर व्यक्त होण्याची आणि चर्चा करण्याची संधी मिळत असल्याचंही पूर्वाने सांगितलं. लोकशाही, राजकारण, शिक्षण, रोजगार यांसारख्या विषयांवर आपलं मत मांडण्यासोबतच आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांची माहिती मिळण्यासही सोशल मीडिया मदत करत असल्याचं ती म्हणाली.

‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही’

स्वातंत्र्याची स्वतःची व्याख्या सांगताना पूर्वा म्हणाली, “माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे मला माझं मत स्पष्टपणे मांडता येणं. मी थोडीशी बंडखोर वृत्तीची मुलगी आहे आणि माझ्या भूमिकांमधूनही माझी ही बंडखोरी दाखवण्याचा प्रयत्न करते.”

मात्र, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नसल्याचं ती स्पष्ट करते. स्वातंत्र्यासोबत जबाबदारी आणि जागरूकताही तितकीच महत्त्वाची असल्याचं पूर्वाने सांगितलं.

नवीन पिढी आपल्या स्वप्नांबद्दल आणि मतांबद्दल ठाम आहे, ही सकारात्मक बाब असल्याचं ती म्हणाली. मात्र, स्वतःच्या अधिकारांसाठी बोलताना आपल्या शब्दांमुळे किंवा कृतीमुळे इतरांचा अपमान होणार नाही, याची जाणीवही असायला हवी, असं पूर्वाने नमूद केलं.

Madhuri Dixit Comeback : २४ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘धकधक गर्ल’च्या रिअॅलिटी शोची घोषणा

स्वातंत्र्यासोबत जबाबदारीची जाणीवही महत्त्वाची

विजया बाबर आणि पूर्वा कौशिक यांच्या विचारांमधून स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ समोर येतो. स्वतःच्या विचारांसाठी आणि स्वप्नांसाठी ठामपणे उभं राहताना इतरांचा आदर, सामाजिक जबाबदारी आणि जागरूकता जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

त्यामुळे स्वातंत्र्यदिन हा केवळ स्वातंत्र्य साजरा करण्याचा दिवस नसून, स्वातंत्र्याचा योग्य अर्थ समजून घेऊन तो जबाबदारीने अमलात आणण्याची आठवण करून देणारा दिवस आहे.

Web Title: Independence day special vijaya babar purva kaushik freedom message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Independence Day
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.