Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याच्या भूतकाळातील मोठं सत्य उलगडणार आहे. स्वामींच्या लीलेमुळे मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार असून मार्तंडचं आव्हानही कायम आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 25, 2026 | 02:50 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Jai Jai Swami Samarth:  कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कथानक निर्णायक वळणावर पोहोचलं आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी सावळ्याच्या आयुष्यातील एका गूढ अध्यायाचा उलगडा होणार आहे. आजवर त्याला त्रास देणारी अस्पष्ट दृश्यं आणि भूतकाळाबद्दलचे प्रश्न आता त्याच्यासमोर स्पष्ट होणार आहेत. विशेष म्हणजे, या सत्याचा उलगडा स्वामींच्या लीलेमुळे होणार असल्याचं मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

गणपती विसर्जनावेळी सावळ्याला दिसणार भूतकाळ

सावळ्याला आतापर्यंत आपल्या भूतकाळातील काही अस्पष्ट दृश्यं वारंवार दिसत होती. मात्र गणपती विसर्जनाच्या वेळी एक महत्त्वाचा क्षण घडणार आहे. बाप्पाची मूर्ती सावळ्याच्या छातीला स्पर्श करताच त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा तीच दृश्यं उमटतील. यावेळी मात्र ही दृश्यं अस्पष्ट नसून त्याचा भूतकाळ त्याच्यासमोर स्पष्टपणे उभा राहणार आहे.

या प्रसंगात सावळ्याला त्याचे खरे आई-वडील, त्यांच्यासोबत घडलेली भयंकर घटना आणि त्या घटनेमागचा चेहरा दिसणार आहे. या चेहऱ्याची ओळख होताच सावळ्याला मोठा धक्का बसणार आहे.

स्वामींच्या लीलेमागे नेमका काय हेतू?

सावळ्याला त्याचं सत्य कळावं आणि त्याच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी, यासाठी स्वामींच्या लीलेतून अनेक घटना घडत असल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. सावळ्याला इराच्या सहवासात आणण्यापासून ते त्याच्यातील माणुसकी जागी करण्यापर्यंतच्या घटनांमागे स्वामींचा एक मोठा हेतू असल्याचं कथानकातून समोर येत आहे.

मात्र आता सावळ्याच्या भूतकाळातील सर्वात मोठं गुपित उलगडणार आहे. हे सत्य समोर आल्यानंतर सावळ्याच्या मनात सूडाची भावना पुन्हा जागी होणार का, की स्वामींच्या शिकवणीमुळे तो त्या भावनेवर मात करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मार्तंडच्या आव्हानामुळे अक्कलकोटमध्ये खळबळ

दरम्यान, मालिकेतील दुसऱ्या बाजूला मार्तंडने स्वामी स्थानाला दिलेल्या आव्हानामुळे सेवेकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. स्वामींच्या भक्तीला आणि प्रचितीला थेट आव्हान देत त्याने अक्कलकोटमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

मार्तंडने स्वामी स्थानातील दिवा विझवून स्वामींच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं आहे. या घटनेमुळे कपिलाचा विश्वास डळमळताना दिसत आहे, तर सुंदरा मात्र स्वामींवरील श्रद्धेवर ठाम राहून सर्वांना धीर देताना दिसणार आहे.

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग

बाप्पाचं विसर्जन आणि स्वामींचं आगमन

एकीकडे मार्तंडचं आव्हान, दुसरीकडे बाप्पाचं विसर्जन आणि त्याच वेळी सावळ्याच्या भूतकाळाचा होणारा उलगडा, अशा अनेक घटना एकाच वेळी घडणार आहेत. स्वामींनी विसर्जनाच्या वेळी येण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आगमनानंतर कथानकाला आणखी कोणतं वळण मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.

सावळ्याच्या आयुष्यातील हे सत्य समोर आल्यानंतर त्याच्या पुढील प्रवासाची दिशा काय असेल, मार्तंडच्या आव्हानाला स्वामी कसा प्रतिसाद देतील आणि या सगळ्या घटनांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे, हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.

‘जय जय स्वामी समर्थ – उत्सव बाप्पाचा, लीला स्वामींची’ ही मालिका दररोज रात्री ८:१० वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Web Title: Jai jai swami samarth serial sawalya truth ganpati visarjan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
1

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग
2

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग

Pooja Meri Jaan: प्रेम नाकारलं अन् आयुष्यच बदललं; मृणाल ठाकूरच्या ‘पूजा मेरी जान’ची गूढ कथा काय?
3

Pooja Meri Jaan: प्रेम नाकारलं अन् आयुष्यच बदललं; मृणाल ठाकूरच्या ‘पूजा मेरी जान’ची गूढ कथा काय?

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
4

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.