
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Tu Hi Re Maza Mitwa Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील अर्णव आणि ईश्वरीची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. कथानकात सातत्याने येणारे ट्विस्ट आणि दोघांच्या नात्यातील चढ-उतार यामुळे मालिकेची क्रेझ कायम आहे. आता मालिकेत पुन्हा एकदा एक रंजक वळण पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाहने नुकताच मालिकेचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून, या प्रोमोमध्ये अर्णव आणि ईश्वरी एकाच हॉटेलमध्ये काम करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे, दोघेही विवाहित असूनही एकमेकांना अनोळखी असल्याचं भासवताना दिसत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या नात्यात प्रेमाची लपाछपी सुरू होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रोमोमध्ये अर्णव एका रेस्टॉरंटमध्ये जातो. त्याचवेळी त्याला एक ओळखीचा आवाज ऐकू येतो. आत गेल्यावर त्याला ईश्वरी गाणं गाताना दिसते. ईश्वरीला पाहून अर्णवला मोठा धक्का बसतो.
इतक्यात हॉटेलचा मालक तिथे येतो आणि दोघांची एकमेकांशी ओळख करून देतो. यावेळी अर्णव आणि ईश्वरी दोघेही एकमेकांना ओळखत नसल्याचं दाखवतात. दोघेही हॉटेलमध्ये नव्याने जॉईन झालेले असल्याचं समोर येतं.
ईश्वरीने ‘राजेशिर्के’ऐवजी सांगितलं ‘देसाई’ आडनाव
एकमेकांची ओळख करून देताना ईश्वरी स्वतःचं आडनाव ‘राजेशिर्के’ न सांगता ‘देसाई’ असं सांगते. ईश्वरीच्या या वागण्याने अर्णवला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ही गोष्ट त्याला चांगलीच खटकते.
मालक तिथून गेल्यानंतर अर्णव ईश्वरीला ती इथे काय करत असल्याचं विचारतो. त्यावर ईश्वरी सांगते की तिला सिंगर म्हणून नोकरी मिळाली आहे. त्यानंतर ती अर्णवला तो इथे काय करतोय, असा प्रश्न विचारते.
ईश्वरीच्या प्रश्नावर अर्णव सांगतो की तो सीनियर मॅनेजर म्हणून हॉटेलमध्ये जॉईन झाला आहे. त्यानंतर अर्णव तिला या हॉटेलच्या पॉलिसीनुसार नवरा-बायकोला एकत्र काम करण्याची परवानगी नसल्याचं सांगतो.
यावर ईश्वरी हळू आवाजात सांगते की तिने हॉटेलमध्ये स्वतःला सिंगल असल्याचं सांगितलं आहे, त्यामुळे तिला ही नोकरी मिळाली. एवढंच नाही तर भविष्यातही लग्न करण्याचा विचार नसल्याचं तिने सांगितल्याचं ती स्पष्ट करते. ईश्वरीचं हे बोलणं ऐकून अर्णव तिच्याकडे शॉक होऊन पाहताना दिसतो.
नव्या प्रोमोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव
‘तू ही रे माझा मितवा’च्या या नव्या प्रोमोने सोशल मीडियावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अर्णव आणि ईश्वरीचा नवा लुक आणि त्यांच्यातील अनोखी लपाछपी प्रेक्षकांना आवडल्याचं कमेंट्समधून दिसत आहे.
आता एकाच हॉटेलमध्ये काम करताना अर्णव आणि ईश्वरी आपलं नातं किती दिवस लपवून ठेवणार? ईश्वरीने आपलं आडनाव का बदललं? आणि या सगळ्यामुळे त्यांच्या नात्यात आणखी कोणता ट्विस्ट येणार? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.
Pooja Meri Jaan: प्रेम नाकारलं अन् आयुष्यच बदललं; मृणाल ठाकूरच्या ‘पूजा मेरी जान’ची गूढ कथा काय?