Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Jay Swami Samarth : स्वामी समर्थांच्या कृपेने गायत्री बनून गंगा येणार, गोवर्धनला मिळणार कर्मांची शिक्षा!

जय जय स्वामी समर्थ मालिकेत गंगा, गायत्री आणि गोवर्धन यांच्या आयुष्याशी जोडलेले मोठे रहस्य उलगडण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने गंगा आणि अंबरीश अक्कलकोटपर्यंत पोहोचतात, जिथे त्यांना गायत्रीशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे मिळतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 06, 2026 | 06:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • गंगा आणि गायत्री यांच्यातील नात्याचा उलगडा होत असतानाच कथानक अधिक उत्कंठावर्धक बनत आहे.
  • सत्य स्वीकारण्याऐवजी तो आपल्या पापांच्या ओझ्याखाली दबत जातो.
  • जय जय स्वामी समर्थ ही मालिका दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते.
जय जय स्वामी समर्थ मालिकेत आता गंगा, गायत्री आणि गोवर्धन यांच्या आयुष्याशी जोडलेले मोठे रहस्य उलगडण्याच्या मार्गावर आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने गंगा आणि अंबरीश अनेक अडथळ्यांवर मात करत अक्कलकोटपर्यंत पोहोचले असून, त्यांच्या शोधयात्रेला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मिळालेल्या संकेतांमधून गंगाचा संबंध ‘गायत्री’ नावाच्या महिलेबरोबर असल्याचे स्पष्ट होते. या गूढाचा उलगडा करण्यासाठी दोघे एका रहस्यमय पडक्या घरात पोहोचतात, जिथे त्यांच्या आयुष्याला हादरवून टाकणारे सत्य दडलेले असते.

Deool Band 2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’ च्या संपूर्ण टीमचे कौतुक! ठरला सुपरहिट

घरातील आगीच्या खुणा, विचित्र अनुभव आणि स्वप्नांत दिसणाऱ्या घटनांमुळे गंगा अस्वस्थ होते. त्याचवेळी स्वामी समर्थ सूचित करतात की आता भूतकाळातील रहस्य समोर येण्याची आणि गोवर्धनच्या कर्मांचा हिशोब चुकता होण्याची वेळ आली आहे. गंगा आणि गायत्री यांच्यातील नात्याचा उलगडा होत असतानाच कथानक अधिक उत्कंठावर्धक बनत आहे.

दुसरीकडे, मार्तंडच्या प्रभावाखाली आलेला गोवर्धन स्वामी समर्थांना विषारी लाडू देऊन त्यांचा जीव घेण्याचा कट रचतो. प्रायश्चित्ताच्या नावाखाली तो स्वामींच्या समोर येतो, मात्र स्वामी त्याला स्वतःचा गुन्हा कबूल करण्याची अखेरची संधी देतात. तरीही सत्य स्वीकारण्याऐवजी तो आपल्या पापांच्या ओझ्याखाली दबत जातो.

“कोडं सुटायची वेळ झाली… केलेली कर्म फिटायची वेळ झाली,” या स्वामी समर्थांच्या शब्दांनी गोवर्धन हादरून जातो. आता गंगा गायत्रीपर्यंत पोहोचेल का, गोवर्धन आपल्या गुन्ह्याची कबुली देईल का आणि भूतकाळातील नेमके कोणते धक्कादायक सत्य समोर येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

भूषण प्रधानच्या आयुष्यातील ‘स्वप्नसुंदरी’ कोण? २४ जुलैला उलगडणार रहस्य; टीझरने वाढवली उत्सुकता

सत्य आणि असत्याच्या संघर्षाला नवे वळण देणारे हे भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहेत. जय जय स्वामी समर्थ ही मालिका दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते.

Web Title: Jay jay swami samarth by the grace of swami samarth the ganga will arrive in the form of gayatri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • serial update
  • Shree Swami Samarth

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.