Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jhanvi Tambat Exclusive: पहिला पाडवा, पहिली दिवाळी अन् प्रेमाची कबुली! जान्हवी तांबटने सांगितले छवीच्या आयुष्यात काय घडणार?

Jhanvi Tambat Exclusive:अभिनेत्री जान्हवी तांबटने दिवाळीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत छवी-अनिकेतच्या पहिल्या दिवाळीची खास झलक दिली. छवी व्यक्त करणार प्रेमाची कबुली? जेसिकाच्या कारस्थानामुळे मालिकेत येणार मोठं वळण.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 10, 2026 | 03:26 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jhanvi Tambat Exclusive:  मालिकेमध्ये छवीसाठी हा दिवाळसण खास असणार आहे कारण ऑफकोर्स तो पहिला दिवाळसण आहे. आणि अनिकेतवर छवीचं प्रचंड प्रेम आहे. त्याच्यामुळे तिच्यासाठी हा सण खूप जास्त स्पेशल आहे. पाडवा नवरा-बायकोच्या नात्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो किंवा महत्त्वाचा सण म्हणू शकतो. छवीसाठी हा सण खूप जास्त खास आहे. आणखी एका गोष्टीसाठी खास आहे कारण छवी तिच्या मनातली गोष्ट फिरंग्याला सांगण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच खास आहे.

मालिकेतील कथानकात दिवाळीच्या निमित्ताने कोणते भावनिक किंवा रंजक वळण पाहायला मिळणार आहे?

दिवाळीमध्ये खूप मोठे रंजक वळण येणार आहे. कारण कुठेतरी अनिकेतलासुद्धा छवीबद्दल काही गोष्टी जाणवायला लागल्या आहेत, काही फीलिंग्स वाटायला लागल्या आहेत. त्याचा मनोमन विचार सुरू आहे की छवीला त्याच्या मनातल्या फीलिंग्स सांगाव्यात किंवा नाही सांगाव्यात आता ह्या द्विधा मनःस्थितीमध्ये तो आहे.
पण, या सगळ्या गोष्टींमध्ये जेसिका नावाचं एक वादळ असणार आहे. आणि ती दिवाळीमध्ये का काय कारस्थान करणार आहे, छवीला खरंच तिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत की नाही? हे एक मोठं वळण कदाचित तुम्हाला पाहायला मिळू शकतं.

मालिकेच्या सेटवर दिवाळीचा माहौल कसा असतो?

कमाल, खूप कमाल! म्हणजे जवळजवळ आता चार दिवस झाले आम्ही दिवाळीचं शूट करतोय आणि ट्रस्ट मी. दिवाळीचा सण आहे, दिवाळीचं वातावरण आहे, सेट खूप छान सजवला आहे आणि सगळेच आर्टिस्ट आहेत सेटवर. म्हणजे याच अशा सीन्सला सगळं कुटुंब एकत्र असतं आणि आम्ही सगळे जेव्हा एकत्र असतो तेव्हा धमाल, मज्जा-मस्ती सगळं सुरू असतं. त्यामुळे आता दिवाळीचा माहौल अक्षरशः घरासारखा आहे. म्हणजे मला माझ्या गावी जायला मिळणार नाहीये, जस्ट बिकॉझ एकाच दिवसाची सुट्टी आहे. पण ती कमी कुठेच मला भासत नाहीये. एवढा आम्ही सेटवर सगळेजण मज्जा करतोय. कोणी बनवलेला फराळ घेऊन येतंय किंवा कोणाला कोणी छान छान गिफ्ट्स वाटतंय. सो असं मस्त आणि छान, खूप सुंदर माहौल सुरू आहे अख्ख्या सेटवर दिवाळीचा.

Ranbir Kapoor Ramayana Armour: सोनं-चांदी नाही, बांबू-रबरपासून बनवलं रणबीर कपूरचं कवच; १५ कारागिरांची साडेतीन वर्षांची मेहनत!

मालिकेतील तुमच्या व्यक्तिरेखेला दिवाळीच्या निमित्ताने इच्छा मागण्याची संधी मिळाली, तर ती काय असेल?
ओके, मालिकेमध्ये जर छवीला एक इच्छा मागण्याची संधी मिळाली तर डेफिनेटली, छवी कायमच देवाकडे मागत असते की तिच्या सगळ्या कुटुंबाला सुरक्षित ठेव आणि तिच्या कुटुंबाला काही होता कामा नये. आणि त्याचबरोबर आता आणखी एक इच्छा छवी मागेल की तिच्या मनातली गोष्ट लवकरात लवकर तिच्या अनिकेतला कळू दे आणि त्याने पण तिचं प्रेम एक्सेप्ट करू दे.

प्रेक्षकांना यंदाच्या दिवाळीत मालिकेकडून कोणतं खास सरप्राईज मिळणार आहे?

सरप्राइजेस तर आहेतच. म्हणजे छवी आणि अनिकेत मधली केमिस्ट्री बघायला मिळणार आहे लोकांना. अनिकेतला पण आता काहीतरी वाटतंय, तर त्याचं काय होणार आहे? तो सांगणार आहे की नाही छवीला? आणि छवी पण तिच्या मनातलं सांगणार आहे की नाही? या गोष्टी आहेत, या दोन्ही गोष्टी असणार आहेत. त्यामुळे सरप्राईज तर आहेतच. आणि हा, आणखी एक सरप्राईज आहे, जे आपलं टायटल आहे ‘मी जिंकून घेईन सारं’. अशी काहीतरी मुव्हमेंट घडणार आहे मात्र सिरीयलमध्ये. तर ती काय असणार आहे, ही तर एपिसोड्स पाहिल्यावरच तुम्हाला बघायला मिळेल. आणि ऑफकोर्स ते सरप्राईज आहे, त्यामुळे ते तुम्हाला नक्की आवडेल.

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण

दोघांचाही आवडता दिवाळी पदार्थ कोणता?

दोघांनाही आम्हाला चकली प्रचंड आवडते. सो एनी टाईम, एनीव्हेअर चकली ही असतेच.

पहिला पाडवा आणि दिवाळी सण आहे मालिकेत दोघांचा, काय सांगाल?

दोघांचाही पहिला दिवाळी सण आहे, पाडवा आहे. पाडवा हा तर नवरा-बायकोच्या नात्यातला नात्याचाच दिवस असतो. म्हणजे हा एकमेव सण असा आहे की जिथे नवरा-बायको यांच्यातलं नातं खूप छान खुलून निघतं किंवा त्या दिवशी एकमेकांकडनं मिळालेल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा अगदी आयुष्यभर जपून ठेवल्या जातात. मग काहीही असो, मग एक छोटी चिठ्ठी असो, एक छोटा चॉकलेट असो किंवा मग एखादा सोन्याचा दागिना असो, हे सगळंच अगदी आयुष्यभर जपून ठेवलं जातं. ती गोष्ट खास असते, नवऱ्यासाठी सुद्धा आणि बायकोसाठी सुद्धा.त्यामुळे पहिला पाडवा आणि हा दिवाळी सण दोघांसाठी पण खूप स्पेशल आहे. छवीसाठी तर खूप स्पेशल आहे कारण छवीने ठरवलंय, ती या दिवाळीच्या सणामध्ये तिच्या मनातली फीलिंग अनिकेतला सांगणारच आहे. त्यामुळे ती त्या संधीची आणि त्या योग्य वेळेची वाट बघतीये. आणि आय ॲम शुअर अनिकेतच्या मनात पण असंच काहीतरी गोष्ट असणार आहे. सो, हे तर तुम्हाला एपिसोड्स बघितल्यावरच कळेल.

Web Title: Jhanvi tambat exclusive interview chhavi aniket diwali special marathi serial twist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • entertainment
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Ranbir Kapoor Ramayana Armour: सोनं-चांदी नाही, बांबू-रबरपासून बनवलं रणबीर कपूरचं कवच; १५ कारागिरांची साडेतीन वर्षांची मेहनत!
1

Ranbir Kapoor Ramayana Armour: सोनं-चांदी नाही, बांबू-रबरपासून बनवलं रणबीर कपूरचं कवच; १५ कारागिरांची साडेतीन वर्षांची मेहनत!

Pallavi Joshi-Vivek Agnihotri: अभिनेत्री पल्लवी जोशींच्या घरी रॉकेटमुळे सोफ्याला आग; विवेक अग्निहोत्रींनची पोस्ट चर्चेत, काय घडलं?
2

Pallavi Joshi-Vivek Agnihotri: अभिनेत्री पल्लवी जोशींच्या घरी रॉकेटमुळे सोफ्याला आग; विवेक अग्निहोत्रींनची पोस्ट चर्चेत, काय घडलं?

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!
3

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण
4

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.