Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranbir Kapoor Ramayana Armour: सोनं-चांदी नाही, बांबू-रबरपासून बनवलं रणबीर कपूरचं कवच; १५ कारागिरांची साडेतीन वर्षांची मेहनत!

Ranbir Kapoor Ramayana Armour: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मधील चिलखत आसामच्या छोट्या गावात तयार करण्यात आलं. १५ कारागिरांनी बांबू, वेत आणि रबर वापरून साडेतीन वर्षांत ३० ते ३५ चिलखते बनवली.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 10, 2026 | 02:55 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ranbir Kapoor Ramayana Armour:मोठ्या पडद्यावर एखादा भव्य चित्रपट पाहताना प्रेक्षकांचे लक्ष कलाकार, त्यांचे पोशाख आणि भव्य सेटवर केंद्रित होते. मात्र, या सगळ्यामागे अनेक अनोळखी हातांची मेहनत असते. नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण: राइज ऑफ अ लेजेंड’ या चित्रपटासाठीही अशाच काही कारागिरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरसाठी खास चिलखत तयार करण्याचे काम आसाममधील एका छोट्या गावातील १५ कारागिरांनी केले. विशेष म्हणजे, हे चिलखत कोणत्या चित्रपटासाठी तयार केले जात आहे, याची त्यांना सुरुवातीला कल्पनाही नव्हती.

आसामच्या छोट्या गावात तयार झालं रणबीरचं चिलखत

आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील जेनिया बंगालीपारा या गावात जयनाल अब्दिन आणि त्यांच्या टीमने रणबीर कपूरसाठी हे खास चिलखत तयार केले. त्यांच्या टीममध्ये एकूण १५ कारागीर होते. बांबूच्या पट्ट्या, वेत आणि रबर यांचा वापर करून त्यांनी हे चिलखत हाताने तयार केले. या संपूर्ण कामासाठी जवळपास साडेतीन वर्षांचा कालावधी लागला.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जयनाल अब्दिन यांनी या कामाचा अनुभव सांगितला. हा प्रकल्प त्यांच्यापर्यंत थेट चित्रपटाच्या निर्मिती टीमकडून आला नव्हता. सुरुवातीला ‘ग्राम उन्नयन’ या स्थानिक संस्थेचे अब्दुल मलिक यांच्यापर्यंत हे काम पोहोचले. त्यांनी जयनाल यांना फोन करून चिलखत तयार करण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांना चिलखताचे डिझाइन आणि रेखाचित्रे असलेली फाईल देण्यात आली. जयनाल यांनी आपल्या टीमसोबत त्यावर चर्चा केली आणि काम सुरू केले.

वेताच्या चिलखतात आली अडचण; रबरचा केला वापर

या चिलखताच्या निर्मितीतील सर्वात मोठे आव्हान म्हणजे ते दिसायला भव्य असण्यासोबतच कलाकाराला अॅक्शन दृश्यांमध्ये सहज हालचाल करता येईल असे बनवणे. सुरुवातीला कारागिरांनी केवळ वेताचा वापर करून चिलखताचा नमुना तयार केला. मात्र, मान आणि खांद्यांच्या भागात ते योग्य प्रकारे बसत नव्हते. चित्रपटाच्या टीमने त्यात बदल सुचवले.

त्यानंतर रणबीर कपूरवर चिलखताची चाचणी करण्यात आली. मात्र, केवळ वेतापासून बनवलेले चिलखत खूप कडक असल्याने रणबीरला हात-पाय हलवताना अडचणी येत होत्या. तसेच मान आणि खांद्यांवरही दाब येत होता. त्यामुळे चित्रपटाच्या टीमने जयनाल यांच्याकडे पर्यायी साहित्याबाबत सूचना मागितल्या.

यानंतर टीमने काळ्या आणि हिरव्या रंगाचे रबर पाठवले. मात्र, केवळ रबर वापरून विणकाम करणे सोपे नव्हते. त्यामुळे जयनाल यांनी कॉस्च्युम डिझायनर अजय यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अर्धे वेत आणि अर्धे रबर वापरण्याची कल्पना मांडली. ही कल्पना डिझायनरला पसंत पडली आणि त्यानुसार चिलखताचा नवा नमुना तयार करण्यात आला. अखेर या डिझाइनला मंजुरी मिळाल्यानंतर त्याच पद्धतीने चिलखत तयार करण्याचे काम सुरू झाले.

साडेतीन वर्षांत तयार केली ३० ते ३५ चिलखते

जयनाल यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या गरजेनुसार त्यांना कधी आठ, तर कधी दहा चिलखतांची मागणी केली जात असे. त्यामुळे अनेकदा कमी वेळेत काम पूर्ण करावे लागत होते. जवळपास साडेतीन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या टीमने ३० ते ३५ चिलखते तयार केली.

काही वेळा मुंबईतील चित्रीकरणासाठी चिलखताची तातडीने गरज भासत असे. अशा वेळी तयार चिलखते बारपेटाहून गुवाहाटी विमानतळावर पाठवली जात. तिथून चित्रपटाच्या टीमपर्यंत ती पोहोचवली जात असत. अवघ्या दोन ते तीन तासांत चिलखत मिळाल्याची पुष्टीही टीमकडून केली जात असे.

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजलं सत्य!

या संपूर्ण प्रकल्पादरम्यान कारागिरांना आपण नेमके कोणत्या चित्रपटासाठी काम करत आहोत, याची माहिती नव्हती. चित्रपटाच्या टीमने त्यांना केवळ एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चिलखते तयार केली जात असल्याचे सांगितले होते. तसेच या प्रकल्पाबाबतची माहिती गुप्त ठेवण्यास सांगितले होते.

विशेष म्हणजे, जयनाल यांनी तयार केलेली चिलखते ‘रामायण’ चित्रपटाचा भाग आहेत, हे त्यांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजले. पडद्यावर रणबीर कपूरच्या अंगावर दिसणाऱ्या चिलखतामागे आसाममधील एका छोट्या गावातील १५ कारागिरांची साडेतीन वर्षांची मेहनत दडलेली आहे. त्यामुळे या भव्य चित्रपटाच्या निर्मितीमागील या अनोख्या कथेची सध्या चर्चा होत आहे.

Yash Ravan Look: ३३ किलोचे कवच अन् १.८ किलोचा मुकुट; ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कठोर मेहनत

Web Title: Ranbir kapoor ramayana armour assam 15 artisans 3 5 years ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण
1

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण

Yash Ravan Look: ३३ किलोचे कवच अन् १.८ किलोचा मुकुट; ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कठोर मेहनत
2

Yash Ravan Look: ३३ किलोचे कवच अन् १.८ किलोचा मुकुट; ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कठोर मेहनत

Navrashtra Exclusive: निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्करचा लग्नानंतरचा पहिला पाडवा; पाहा नवदाम्पत्याचे सुंदर फोटो!
3

Navrashtra Exclusive: निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्करचा लग्नानंतरचा पहिला पाडवा; पाहा नवदाम्पत्याचे सुंदर फोटो!

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार
4

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.