Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamli-Tarini Serial: ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये रंगणार अन्यायाविरुद्धची लढाई; नायिकांसमोर उभी राहणार नवी आव्हानं

Kamli-Tarini Serial: झी मराठीवरील 'कमळी' आणि 'तारिणी' मालिकेत नवी वळणं येणार आहेत.अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि सत्यासाठी लढणाऱ्या या दोन्ही मालिकांमधील नायिका प्रेक्षकांना प्रेरणादायी संघर्षाचा अनुभव देणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 06, 2026 | 12:47 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kamli-Tarini Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या दोन्ही मालिकांमध्ये आता कथेला नवी वळणं मिळणार आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि सत्यासाठी लढणाऱ्या या दोन्ही मालिकांमधील नायिका प्रेक्षकांना प्रेरणादायी संघर्षाचा अनुभव देणार आहेत.

एका बाजूला कमळी स्वाभिमान, शिक्षण आणि महिलांच्या आत्मसन्मानासाठी ठामपणे उभी आहे, तर दुसरीकडे तारिणी सत्याचा शोध घेत न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक संकटाचा सामना करत आहे. दोघींचे मार्ग वेगळे असले तरी अन्यायाविरोधात लढण्याचा त्यांचा उद्देश समान आहे.

कमळीसमोर रितेश-अनिकाचं नवं आव्हान

‘कमळी’च्या आयुष्यात आता संघर्ष आणखी वाढणार आहे. रितेश आणि कमळी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. रितेशने दिलेला प्रस्ताव कमळी स्पष्ट शब्दांत नाकारते. आपल्या स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड न करण्याचा तिचा निर्णय रितेशच्या अहंकाराला धक्का देणार आहे.

दरम्यान, अनिका रितेशची साथ देत कमळीसमोर नवी संकटं उभी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता रितेश आणि अनिकाच्या डावपेचांना कमळी कशा पद्धतीने उत्तर देणार? तिचा आत्मविश्वास या संकटांवर मात करू शकेल का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Colors Marathi: ऑगस्टमध्ये कलर्स मराठीवर भक्ती आणि महानाट्याचा संगम; दोन लोकप्रिय मालिकांमध्ये मोठे ट्विस्ट

तारिणीच्या संशयाची सुई कुणाकडे?

‘तारिणी’ मालिकेतही थरारक वळण पाहायला मिळणार आहे. युवराजची सुटका होताच तो केदार आणि तारिणीवर त्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप करतो. युवराजच्या सुटकेची बातमी लाईव्ह करण्याची जबाबदारी केदारवर असते.

याचदरम्यान युवराजला एका अनोळखी व्यक्तीकडून नव्या डीलसंदर्भात फोन येतो. या फोनमुळे त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि गुलाबच्या मागे असलेल्या खऱ्या सूत्रधाराचा शोध घेण्याचा तो निर्णय घेतो.

दुसरीकडे, घरातील पूजेदरम्यान तारिणीला काही महत्त्वाचे संकेत मिळतात. या संकेतांमुळे संपूर्ण कटामागे घरातीलच कोणीतरी व्यक्ती असल्याचा संशय तिच्या मनात निर्माण होतो. आता तारिणीचं संशयाचं वर्तुळ कुणावर थांबणार? या कटामागचा खरा सूत्रधार कोण आहे? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Mrunal Dusanis: “लग्नाला १० वर्षे, पण ७ वर्षे नवऱ्यापासून दूर”; मृणाल दुसानिसनं लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल दिला महत्त्वाचा सल्ला

Web Title: Kamli tarini serial new twist big challenges zee marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.