Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Daayra Movie Review: मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’मध्ये करीना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत आहेत. जाणून घ्या कसा आहे सिनेमा.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 18, 2026 | 03:00 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Daayra Movie Review: क्राईम ड्रामा म्हटलं की गुन्हा कोणी केला, याचा शोध, तपास आणि आरोपीपर्यंत पोहोचण्याची कथा पाहायला मिळते. पण ‘दायरा’ इथेच थांबत नाही. हा चित्रपट गुन्ह्याच्या तपासापेक्षा पुढे जात ‘खरा न्याय म्हणजे नेमकं काय?’ हा प्रश्न प्रेक्षकांसमोर उभा करतो. मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत.

करीना कपूरची दमदार भूमिका

करीना कपूर खानने चित्रपटात DCP अजूनी कोहली यांची भूमिका साकारली आहे.  तिच्या व्यक्तिमत्त्वात अधिकाराची झलक दिसते; मात्र दिग्दर्शकांनी तिला पारंपरिक अॅक्शन हिरोच्या चौकटीत अडकवलेलं नाही.

अजूनीची खरी ताकद तिच्या तपासाच्या पद्धतीत आहे. ती प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकते, निरीक्षण करते आणि त्यानंतर हळूहळू प्रकरणातील वेगवेगळ्या कड्या जोडत जाते. करीना कपूरने ही भूमिका संयमाने आणि प्रभावीपणे साकारली आहे.

पृथ्वीराजच्या भूमिकेत वेगळीच तीव्रता

दुसरीकडे पृथ्वीराज सुकुमारन DCP रमन कुमार यांच्या भूमिकेत दिसतो. गुन्ह्यांची गंभीरता त्याच्यावर खोलवर परिणाम करते. काही गुन्ह्यांमध्ये कठोर आणि तातडीची शिक्षा झालीच पाहिजे, असा रमनचा दृष्टिकोन आहे.

पृथ्वीराजने रमनच्या या विचारसरणीला पूर्ण ताकदीने साकारलं आहे. मात्र त्याचवेळी या व्यक्तिरेखेला केवळ एका रंगात मर्यादित न ठेवता तिच्यातील वेगवेगळ्या छटा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कायदा, संस्थात्मक जबाबदारी आणि सामाजिक दबावाचा मुद्दा

चित्रपटाची कथा केवळ पोलिसांच्या तपासाभोवती फिरत नाही. कायदेशीर व्यवस्था, संस्थात्मक जबाबदारी, माध्यम आणि जनतेचा दबाव तसेच लैंगिक हिंसाचारानंतर महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक दृष्टिकोन अशा अनेक मुद्द्यांना चित्रपट हात घालतो.

लेखक मेघना गुलजार, सीमा अग्रवाल आणि यश केसवानी यांनी या मुद्द्यांना कथानकात गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ‘दायरा’ केवळ रहस्य उलगडणारा क्राईम ड्रामा न राहता न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मांडतो.

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

काही ठिकाणी संथ होते कथा

‘दायरा’ हा गंभीर विषय हाताळणारा क्राईम ड्रामा आहे. काही ठिकाणी चित्रपटाची गती थोडी संथ होते. मात्र, मुख्य संघर्षाची पकड कायम राहते. कलाकारांचा अभिनय आणि विषयावरील विश्वासाच्या जोरावर चित्रपट आपली कथा पुढे नेतो.

एकूणच, ‘दायरा’ हा केवळ गुन्हा कोणी केला याचा शोध घेणारा चित्रपट नसून, गुन्ह्यानंतर न्याय म्हणजे नेमकं काय आणि तो कसा मिळायला हवा, या प्रश्नांवर विचार करायला लावणारा क्राईम ड्रामा आहे.

१८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार ‘दायरा’

‘दायरा’ची निर्मिती Junglee Pictures आणि डॉ. जयंतीलाल गडा (Pen Studios) यांनी केली आहे. चित्रपटाचं वितरण Pen Marudhar करत आहे. हा चित्रपट १८ सप्टेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी

Web Title: Daayra movie review kareena kapoor cinema

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Kareena Kapoor

संबंधित बातम्या

Kareena Kapoor: ‘मी रस्त्यावर ओरडत होते…’; सैफवरील हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं? करीनाने ‘कॉफी विद करण’मध्ये सांगितला अनुभव
1

Kareena Kapoor: ‘मी रस्त्यावर ओरडत होते…’; सैफवरील हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं? करीनाने ‘कॉफी विद करण’मध्ये सांगितला अनुभव

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट
2

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.