Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devkhel Web Series: ‘देवखेळ’ वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणी, आमदार भास्कर जाधव आक्रमक; संकासूराच्या चित्रणावरून कोकणात रोष

या मालिकेत संकासूरला कूर आणि अंधश्रद्धा पसरवणारा म्हणून दाखवण्यात आल्याने कोकणातील लोकांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 02, 2026 | 12:52 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कोकणातील शिमगा उत्सवात साकारल्या जाणाऱ्या पारंपारिक आणि पौराणिक लोकनृत्य पात्र संकासूर याचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप झी ५ या मराठी ओटीटीवरील ‘देवखेळ’ या वेबसिरिजवर करण्यात आला आहे. या मालिकेत संकासूरला कूर आणि अंधश्रद्धा पसरवणारा म्हणून दाखवण्यात आल्याने कोकणातील लोकांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘देवखेळ’ वेबसिरिजवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात आमदार जाधव यांनी नमूद केले आहे की, संकासूर हे कोकणातील शिमगा उत्सवातील एक भक्तीमय, पौराणिक आणि पारंपारिक पात्र असून, त्याला शिवाचा अवतार मानले जाते. काळ्या रंगाचा पोशाख, मुखवटा आणि हातात वेत घेऊन गोमूसोबत गावागावात फिरणारा संकासूर गावकऱ्यांना आशीर्वाद देतो. ही केवळ करमणूक नसून, कोकणची शेकडो वर्षांची श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा आहे.

मात्र, ३० जानेवारी २०२६ पासून झी ५ वर सुरू झालेल्या ‘देवखेळ’ या वेबसिरिजमध्ये संकासूराला खूनी आणि कूर प्रवृत्तीचे पात्र म्हणून दाखविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मालिकेचे चित्रिकरण गुहागर तालुक्यातच झाले असून, संकासूरावर डॉक्युमेंटरी करत आहोत असे ग्रामस्थांना सांगून प्रत्यक्षात वेबसिरिजचे शूटिंग करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

या प्रकारामुळे गुहागर तालुक्यासह संपूर्ण कोकणात संतापाचे वातावरण पसरले असून, नमन मंडळे, भजन मंडळांतील कलाकार तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत गुहागर पोलीस ठाणे ते जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असेही आमदार जाधव यांनी नमूद केले आहे.

कपिल शर्मा शोमधील A.R. Rahman च्या उपस्थितीवर नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले- “हिंदुत्वाशी तडजोड….”

काळाच्या ओघात अनेक पारंपारिक कला लोप पावत असताना, कोकणातील कुणबी समाजाने नमन, भजन, संकासूरसारख्या कला जपून जगासमोर नेल्या आहेत. अशा कलांना बदनाम करण्याचा प्रयत्न या वेबसिरिजच्या माध्यमातून होत असल्याने जनभावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सिनेमास्टर्स प्रोडक्शन प्रा. लि. निर्मित ‘देवखेळ’ या वेबसिरिजवर तात्काळ बंदी घालावी, अशी ठाम मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

चार आठवड्यांत २४ कोटींचा टप्पा पार; ‘क्रांतिज्योती विद्यालय–मराठी माध्यम’ची खास ‘मराठी शाळा योजना’

Web Title: Mla bhaskar jadhav demands immediate ban on devkhel web series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Bhaskar Jadhav
  • Web Series

संबंधित बातम्या

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण
1

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
2

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.