Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”खरी गेम तिथून सुरू…”, महिला दिनानिमित्त सागरने आयुष्यातील ‘बिग बॉस’साठी लिहिलं खास पत्र; म्हणाला,”तीच माझी पहिली…”

Bigg Boss Marathi 6: महिला दिनानिमित्त ‘बिग बॉस’च्या घरात एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. या खास दिवशी सागर कारंडेने घरातील सर्व महिला आणि आपल्या आयुष्यातील स्त्रियांना उद्देशून एक खास पत्र लिहिलं.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 08, 2026 | 06:54 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

महिला दिनानिमित्त ‘बिग बॉस’च्या घरात भावनिक वातावरण पाहायला मिळालं. आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान केला जात आहे. अनेकजण त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्क करत आहेत. या खास दिवशी स्पर्धक सागर कारंडेने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीसाठी एक खास पत्र लिहिलं. सागरने या पत्रातून आपल्या भावना व्यक्त करत त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील “बिग बॉस” म्हटलं.

कलर्स मराठीने इन्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सागर कारंडेने एक पत्र वाचले. पत्राची सुरुवात करताना सागर म्हणाला, “प्रिय बिग बॉसच्या घरातील सगळ्या खऱ्या बॉसेस आणि माझ्या आयुष्यातील सगळ्या स्त्रिया…” त्याने सांगितलं की त्याच्या आयुष्यातील पहिला ‘बिग बॉस’ हा या घरात नाही, तर त्याच्या घरी होता.

सागरने आपल्या आईबद्दल बोलताना सांगितलं, “लहानपणी माझी आईच माझी पहिली बिग बॉस होती. ती मला रोज टास्क द्यायची—दूध संपव, अभ्यास कर. त्या सगळ्या टास्कमध्ये मी कधी पास व्हायचो, कधी नापास व्हायचो. पण तिने मला कधी घराबाहेर काढलं नाही, कारण प्रेमात एलिमिनेशन नसतं.”

सागर कारंडेने आपल्या पत्रात भावनिकपणे पुढे सांगितलं, “मग मोठी बहीण आयुष्यात आली. ती दुसरी बिग बॉस होती. माझ्या प्रत्येक चुकांवर तिने नेहमी ‘सागर, मी आधीच सांगितलं होतं’ असं म्हणायची.”

त्यानंतर सागर म्हणाला की, “माझ्या आयुष्यात माझी पत्नी आली आणि खरी गेम तिथून सुरू झाली. बिग बॉससारखे कॅमेरे घरात नसतात, पण तिच्याकडे अशी नजर आहे की माणूस मनात काय विचार करतो ते तिला कळतं.”

सागरने मुलीबद्दल बोलताना भावनिकपणे सांगितलं, “मग माझ्या आयुष्यात माझी मुलगी आली. त्या दिवशी मला कळलं की मी कोणाचा स्पर्धक राहिलो नाही, मी तिचा कायमचा कंटेस्टंट झालो.”


सनी देओल–आमिर खानच्या चित्रपटाचं टायटल बदललं; ‘Lahore 1947’ ‘या’ नवीन नावाने प्रदर्शित होणार

सागर कारंडेने महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या भावनांचा खुलासा करत पुढे सांगितलं, “तिच्या एका हसण्यात मला इम्युनिटी मिळते. तिच्या एका अश्रूत मी एलिमिनेट होतो आणि तिच्या ‘पप्पा’ या एका शब्दात मला ट्रॉफीपेक्षा मोठं बक्षीस मिळून जातं. तुम्ही नसता तर आमचं आयुष्य फक्त गेम राहिलं असतं. तुम्ही आहात म्हणून आयुष्याला एक घर मिळतं. माझ्या आयुष्यातील सगळ्या बिग बॉसना महिला दिनाच्या शुभेच्छा.”
अस म्हणत सागर कारंडेने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

“चाहत्यांनो! काळजी करू नका” External Affair आणि घटस्फोट मुद्द्यावरून चाहत्यांना दुःख, शेवटी विजय म्हणालाच…

सागर कारडेने वाचलेल्या या पात्रावर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ”खूप दिवसांनी तुम्हाला पत्र वाचताना पाहिलं”, ”खूप छान दादा” अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

Web Title: On womens day sagar wrote a special letter for the big boss in his life he said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • sagar karande
  • womens day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.