Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अगं आई अहो आई’मुळे पूर्ण झालं रेणुका शहाणे यांचं स्वप्न; आईच्या भूमिकेबद्दल व्यक्त केल्या भावना

झी ५ मराठीवरील आगामी वेब शो 'अगं आई अहो आई'मध्ये रेणुका शहाणे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मुलीच्या आईची भूमिका साकारण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 22, 2026 | 11:18 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Renuka Shahane: झी ५ मराठीवरील आगामी वेब सिरीज ‘अगं आई अहो आई’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांनी या प्रकल्पाविषयी आणि त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. पटकथा वाचल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया, व्यक्तिरेखेचं वैशिष्ट्य आणि आई-मुलीच्या नात्याविषयी त्यांनी खास भावना व्यक्त केल्या.

रेणुका शहाणे म्हणाल्या, “जेव्हा दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी मला या वेब शोची कथा सांगितली आणि संपूर्ण संकल्पना समजावून सांगितली, तेव्हाच ती मला खूप आवडली. लग्नानंतर मुलगी सासरी जाते, पण त्या वेळी आईच्या मनात सुरू असणारी भावनिक घालमेल या कथेत अतिशय संवेदनशीलपणे मांडली आहे. कल्याणीने पटकथेत त्याचं सुंदर रूपांतर केलं आहे.”

त्यांनी पुढे सांगितलं, “पडद्यावर एका मुलीची आई साकारण्याचं माझं खूप दिवसांचं स्वप्न होतं आणि ‘अगं आई अहो आई’मुळे ते पूर्ण झालं. माझे दोन मुलगे असल्यामुळे मुलगी आणि आईचं नातं साकारण्याची ही माझ्यासाठी वेगळी आणि खास संधी होती. जानकी ही व्यक्तिरेखा अतिशय शिस्तप्रिय आहे आणि माझी आईदेखील तशीच असल्याने ही भूमिका मला सहज करता आली.”

या प्रकल्पामागील टीमचंही त्यांनी कौतुक केलं. “वरुण नार्वेकरसोबत काम करण्याची माझी खूप इच्छा होती. तो अत्यंत संवेदनशील आणि नव्या पिढीचा दिग्दर्शक आहे. त्याचं आधीचं काम मला खूप आवडलं होतं. निर्मिती सावंत माझी जवळची मैत्रीण आहे, तर हृतासोबत पहिल्यांदाच काम करूनही तसं कधीच जाणवलं नाही. पटकथा, व्यक्तिरेखा आणि संपूर्ण कलाकारांची निवड अप्रतिम आहे,” असं त्या म्हणाल्या.

सासू आणि आईच्या नात्याविषयी बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “आजच्या आणि आधीच्या पिढीमध्ये मोठा फरक आहे. पूर्वी सासूबाईंनी सांगितलेलं न विचारता स्वीकारावं लागत असे. पण आजची पिढी प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारते, समजून घेते आणि मग निर्णय घेते. त्यामुळे नातेसंबंध अधिक समजूतदारपणे आणि समानतेने घडताना दिसतात.”

‘Frame’च्या शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं? तिसऱ्याच दिवशी दिग्दर्शक पटवर्धन झाले होते नर्व्हस, सांगितला BTS किस्सा

त्यांच्या मते, ‘अगं आई अहो आई’ ही मालिका याच बदलत्या नात्यांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते. पारंपरिक समजुतींना सूक्ष्मपणे छेद देत दोन पिढ्यांमधील संवाद आणि भावनिक नात्यांची सुंदर मांडणी या वेब शोमध्ये पाहायला मिळणार आहे.

Avengers Doomsday चं VFX गंडलं? ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर रंगली चर्चा; नेटकऱ्यांनी केलं ‘रामायण’चं कौतुक

ही मालिका एका मुली, तिची आई आणि तिची सासू यांच्यातील दुर्मिळ आणि सुंदर नात्याचा प्रवास साजरा करते. कुटुंब एकत्र आलं की प्रेम अधिक फुलतं, हे या कथेतून अधोरेखित होतं. ही ओरिजिनल मालिका २४ जुलै २०२६ पासून केवळ मराठी Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Renuka shahane shares her heartfelt thoughts on the web series aga aai aho aai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi web series
  • Web Series

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.