( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे ‘(Avengers Doomsday )हा MCU मधील सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटात रॉबर्ट डाउनी ज्युनियर, ख्रिस इव्हान्स, टॉम हिडलस्टन आणि ख्रिस हेम्सवर्थ यांसारखे लोकप्रिय कलाकार दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही प्रेक्षकांनी त्यातील काही CGI शॉट्स अपेक्षेइतके प्रभावी नसल्याची प्रतिक्रिया दिली.
विशेष म्हणजे, भारतीय सोशल मीडियावर अनेक युझर्सनी ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’च्या ट्रेलरची तुलना रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाशी केली. काहींच्या मते, ‘रामायण’च्या टीझरमधील व्हिज्युअल्स आणि VFX अधिक प्रभावी वाटत आहेत. त्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या VFX ची तुलना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
Unpopular opinion: 144p #Ramayana leak > 4K #Doomsday trailer. 💀 pic.twitter.com/mEt5e2wpuk — iamfunnier (@whyamifunnier) July 20, 2026
‘रामायण’चा पहिला टीझर प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील VFX वरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. चित्रपटाच्या भव्य बजेटवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आता काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे'(Avengers Doomsday )च्या ट्रेलरमधील काही दृश्यांवरही तितक्याच कठोरपणे चर्चा व्हायला हवी.
एक्स आणि रेडिटसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युझरने लिहिले, “रामायणच्या VFX वर टीका करणारे आता कुठे आहेत?” तर दुसऱ्याने “रामायणचा छोटासा टीझरही डूम्सडेच्या ट्रेलरपेक्षा अधिक प्रभावी वाटतो,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, या प्रतिक्रिया सोशल मीडियावरील वैयक्तिक मतांवर आधारित आहेत.
VFX Experts where are you, it’s your time The so called VFX expert who were finding flaws in Ramayana Assets and were calling it AI are now silent on Doomsday Trailer. The Obsession of calling Indian Products BAD and finding flaws in minor details is concerning as they… pic.twitter.com/tH2LAUKGZ3 — KBP Reviews🏹 (@KshitizCritic) July 20, 2026
दरम्यान, ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ (Avengers Doomsday ) हा मार्व्हलच्या सर्वाधिक खर्चिक चित्रपटांपैकी एक मानला जात असून, त्याचे अंदाजित बजेट सुमारे 400 दशलक्ष डॉलर्स असल्याची चर्चा आहे. मात्र, निर्मात्यांनी याबाबत अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. ट्रेलरनंतर VFX संदर्भातील चर्चा रंगली असली, तरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांचा अंतिम प्रतिसाद काय असेल, हे स्पष्ट होणार आहे.






