Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पठ्ठयाने Zee Marathi च्या मालिकेवरून नाव ठेवलं लेकीचं! निर्माती शर्मिष्ठा राऊत झाली खुश, म्हणाली ‘निर्माती म्हणून…’

Zee Marathi वरील 'तारिणी' मालिकेच्या एका चाहत्याने आपल्या नवजात मुलीचे नाव मालिकेतील मुख्य पात्रावरून 'तारिणी' ठेवले आहे. ही बाब समजताच मालिकेच्या निर्माती शर्मिष्ठा राऊत यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्या कुटुंबाचे आभार मानले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 07, 2026 | 06:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • खऱ्या आयुष्यातील ‘तारिणी’ ला शुभेच्छा दिल्या आहेत.
  • शर्मिष्ठा राऊतने पोस्टखाली कॅप्शन नमूद केले आहे.
  • ही बाब निर्माती शर्मिष्ठा राऊतला कळताच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Zee Marathi वाहिनेवर सुप्रसिद्ध असलेली मालिका ‘तारिणी’ पाहणाऱ्यांची संख्या अफाट आहे. परंतु, मुंबईत राहणाऱ्या एका चाहत्याने या मालिकेवर असलेले त्याचे प्रेम साध्य केले आहे. मालिकेत शिवानी सोनार साकारत असलेली भूमिका ‘तारिणी’ आणि तिचा बहुगुणी आणि निडर स्वभाव पाहून एका पित्याने त्याच्या लेकीचं नाव ‘तारिणी’ ठेवलं आहे. आपल्या मालिकेतील एका पात्रावरून एखादा पिता आपल्या लेकीचं नाव ठेवतो, ही बाब ‘तारिणी’ मालिकेची निर्माती शर्मिष्ठा राऊतला कळताच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने मालिकेला इतके प्रेम दिल्याबद्दल त्या चाहत्याचे आभार मानले आहे, तसेच खऱ्या आयुष्यातील ‘तारिणी’ ला शुभेच्छा दिल्या आहेत.

शर्मिष्ठा म्हणते “जेव्हा आपण एखादी मालिका करतो त्यामागे मालिकेतील कलाकारांपासून ते अगदी कॉस्ट्यूमपर्यंत अनेक कलाकारांची कलाकृतींचा स्पर्श झालेला असतो. एखादी मालिका खऱ्या अर्थाने तेव्हाच मोठी ठरते, जेव्हा त्यातील एखादा पात्र कुणाच्या तरी खऱ्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनतो.” शर्मिष्ठा सांगते “हेमंत पाटील आणि दीपाली पाटील यांनी आपल्या लेकीचं नाव ‘तारिणी’ असे ठेवले आहे. आमच्यासाठी ही भाग्याची बाब आहे की आमच्या मालिकेतील एखादं पात्र कुणाच्या तरी आयुष्यातील इतका महत्वाचा अविभाज्य भाग बनला आहे.” शर्मिष्ठाने नव्या बाळाला आशीर्वाद दिले आहेत. ‘आमच्या मालिकेतील ‘तारिणी’सारखी तुमची तारिणीही निडर, सामर्थ्यवान आणि प्रेमळ होवो’ असे त्या आईबापाला सांगणे केले आहे.

निर्माती शर्मिष्ठा राऊतने पोस्टखाली कॅप्शन नमूद केले आहे की, “प्रिय तारिणी, तू एक निर्माती म्हणून मला आज माझ्या कामाची पोचपावती दिलीस… कथेतील एखादं पात्र कुणाच्या आयुष्याचा, विचारांचा भाग झालंय हे पाहून गहिवरून आलंय गं. आज लक्ष्मीसोबत आपल्या घरी दुर्गाही यावी, अशी इच्छा बाळगणारे तुझ्या आईबाबांसारखे पालक पाहिले की मन खरंच भरून येतं. तु सुद्धा मालिकेतील तारिणीप्रमाणे निडर, धैर्यवान आणि स्वतःच्या ध्येयासाठी खंबीरपणे उभी राहणारी होवो हा आशीर्वाद आणि मनापासून शुभेच्छा! तुझीच शर्मिष्ठा मावशी. टीम मधील सर्व कलाकारांचे खूप खूप आभार आणि खूप कौतुक… तुमच्या मेहनती शिवाय हे अपूर्ण आहे.”

तारिणी मालिका!

‘तारिणी’ ही Zee Marathi वाहिनीवरील मराठी अॅक्शन-क्राईम ड्रामा मालिका आहे. या मालिकेत एका धाडसी तरुणीची कथा दाखवण्यात आली आहे. घरात साधी आणि शांत मुलगी म्हणून वावरणारी ही तरुणी प्रत्यक्षात गुप्त पोलीस अधिकारी (अंडरकव्हर कॉप) असते. आईच्या मृत्यूमागील सत्य शोधण्याचा तिचा संघर्ष आणि गुन्हेगारांविरुद्धची तिची लढाई ही मालिकेची मुख्य कथा आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेत झळकत असून, मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत यांनी केली आहे.

Web Title: Sharmishtha raut shared a post about fans naming their baby tarini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • baby names
  • Marathi celebrities
  • zee marathi

संबंधित बातम्या

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
1

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Sahal Marathi Movie:  शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित
2

Sahal Marathi Movie: शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Crime News: ‘लिव्ह-इन’मधून जन्मलेल्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार हातांतून तेलंगणापर्यंत प्रवास
4

Crime News: ‘लिव्ह-इन’मधून जन्मलेल्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार हातांतून तेलंगणापर्यंत प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.