Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vachan Dile Tu Mala : नवा लुक, नवा ट्विस्ट! सेटवरील लोकांनीही ओळखले नाही; शौर्य आणि ऊर्जा बनले धडाडीचे पत्रकार

स्टार प्रवाहवरील 'वचन दिले तू मला' मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पद्माचं लग्न थांबवण्यासाठी शौर्य आणि ऊर्जा पत्रकार व कॅमेरामनच्या वेषात थेट लग्नमंडपात पोहोचणार आहेत. या वेषांतरासाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली असून, सेटवरील अनेक जणांनाही पहिल्या नजरेत दोघांना ओळखता आलं नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 03, 2026 | 03:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • शौर्य व ऊर्जा एक धाडसी योजना आखताना दिसणार आहेत.
  • शूटिंगदरम्यान सेटवरील अनेक जणांनीही पहिल्या नजरेत दोघांना ओळखले नाही.
  • भावनिक घडामोडींचा संगम पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ मालिकेत आता कथानक अत्यंत रंजक वळणावर आले आहे. पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या या प्रवासात आता तिच्यावर हर्षवर्धनचा दबाव वाढला असून ती विक्रांतसोबत लग्न करण्यास तयार झाली आहे. मात्र, पद्माचे हे लग्न थांबवण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी शौर्य व ऊर्जा एक धाडसी योजना आखताना दिसणार आहेत. त्यांच्या या मिशनमुळे मालिकेतील पुढील भाग अधिक रोमांचक होणार आहेत.

Out Of Syllabus Movie: प्रदर्शनाआधीच ‘आऊट ऑफ सिलॅबस’ची हवा! भव्य प्रीमियरला मान्यवरांची मांदियाळी

या विशेष प्लॅनसाठी शौर्य आणि ऊर्जा वेषांतर करून थेट लग्नमंडपात पोहोचणार आहेत. पत्रकार आणि कॅमेरामनच्या रूपात दोघांची एंट्री होणार असून त्यांचा हा अनोखा लूक सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सत्य समोर आणण्यासाठी ते कोणती जोखीम पत्करतात आणि हर्षवर्धनच्या कारस्थानांना कसे आव्हान देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शौर्यची भूमिका साकारणारा अभिनेता इंद्रनील कामत आणि ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे या नव्या लूकबद्दल विशेष उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. या वेषांतरासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली असून मेकअप आर्टिस्ट सिद्धेश परब आणि सुनील पवार यांनी लूक वास्तवदर्शी दिसावा यासाठी बारकाईने काम केले. इतकेच नव्हे तर शूटिंगदरम्यान सेटवरील अनेक जणांनीही पहिल्या नजरेत दोघांना ओळखले नाही.

Sagar Karande Emotional Post For Anushri Mane: “स्त्रीनं ठरवलं तर जग जिंकू शकते!” अनुश्री मानेसाठी सागर कारंडेची भावुक पोस्ट

या नव्या ट्विस्टमुळे मालिकेतील उत्कंठा आणखी वाढली आहे. शौर्य आणि ऊर्जाचा हा प्लॅन यशस्वी होणार का, पद्माचे लग्न थांबणार का आणि हर्षवर्धनच्या कटकारस्थानांचा अखेर पर्दाफाश होणार का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

‘वचन दिले तू मला’ ही मालिका दररोज सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. आगामी भागांमध्ये थरार, नाट्य आणि भावनिक घडामोडींचा संगम पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

Web Title: Sharya and urja from vachan dile tu mala star pravah serial new journalist look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • marathi serial update
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना
1

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम
2

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार
3

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार

स्टार प्रवाहच्या नायिका उत्साहात साजरी करणार वटपौर्णिमा; परंपरेला आधुनिक विचारांची सुंदर जोड
4

स्टार प्रवाहच्या नायिका उत्साहात साजरी करणार वटपौर्णिमा; परंपरेला आधुनिक विचारांची सुंदर जोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.