
फोटो सौजन्य - Social Media
प्रदर्शित झाला प्रोमो!
‘मराठी मिडीयम’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत श्रद्धा पवार आणि अक्षय नलावडे झळकणार आहेत. मराठी शाळांच्या अस्मितेवर ही मालिका आधारित आहे. एकंदरीत, राज्यात गेल्या काही काळापासून अनेक ठिकाणी मराठी शाळांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही ठिकाणी तोडल्या जात आहेत तर काही ठिकाणी या शाळा अवैध स्वरूपात फसल्या किंवा फसवल्या गेल्या आहेत. अशामध्ये या मराठी शाळांचा जागर करणे महत्वाचे होते आणि ते करण्याचे कार्य Star Pravah वाहिनेने ‘मराठी मिडीयम’ या मालिकेच्या माध्यमातून करण्यास शुभारंभ केला आहे.
Promo पाहिले तर लक्षात येईल की अक्षयला असे पात्र देण्यात आले आहे जो मराठी शाळेच्या विरोधात आहे. त्याला मराठी शाळा पाडायची आहे पण शाळेच्या रक्षणाकरिता ठामपणे उभ्या असलेल्या शिक्षिकेचे पात्र श्रद्धा साकारणार असल्याचे Promo मध्ये दिसून आले आहे.
काय आहे मालिकाप्रेमींचे म्हणणे?
Star Pravah ने ‘मराठी मिडीयम’ या मालिकेचा प्रोमो त्यांच्या सर्व सोशल माध्यमांवर शेअर केला आहे. प्रत्येक ठिकाणी या मालिकेला भरभरून प्रतिसाद आला आहे. त्यापैकी महत्वाची कमेंट म्हणजे अनेकांनी Star Pravah ला त्यांच्या आवडत्या मालिकेचे नाव लिहत विनंती केली आहे की या-या मालिकेची वेळ कृपया करून बदलू नका. अखेर, बहुतेक चाहत्यांना ‘मराठी मीडियम’ या मालिकेचा विषय पटला आहे आणि या मालिकेची आता नितांत गरज असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे.