फोटो सौजन्य - Social Media
काल या सिनेमाची चाहूल देण्यात आली होती. त्या पोस्टमधून मराठी सिनेरसिकांना चित्रपटात कोण झळकणार असल्याची चाहूल तर नक्कीच लागली असेल. सिनेमात प्रसिद्ध रीलस्टार तसेच हल्लीच बिग बॉस मराठीमध्ये झळकलेले करण सोनावणे तसेच नील सालकर ( Just Neel Things ) आणि सिद्धांत सरफरेही तिगडी झळकणार आहे. त्याचबरोबर सिनेमात सौरभ घाडगे, शुभम जाधव तसेच पुष्कराज चिरपुटकर आणि अनेक प्रसिद्ध मराठी कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे सिनेमात मज्जा तर भरभरून असेल याची खात्री पटते.
‘या’ तारखेला प्रदर्शित होणार सिनेमा!
मराठी प्रेक्षकांसाठी आणखी एक भन्नाट Horror Comedy सिनेमा सज्ज झाला असून अखेर चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ‘भूतम भयम’ असे या सिनेमाचे नाव असून नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. पोस्टरसोबत दिलेल्या भन्नाट कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, “दोस्त दोस्ती, यार यारी, एकाला सात हे सबपे भारी! गल्लीत चर्चा, शहरात heat… २४ जुलैला बसणार beat! तयार रहा पब्लिक, राडा होणार आहे…” यासोबतच Zee Studios आणि Kyra Kumar Kreations यांच्या प्रस्तुतीखाली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
“हॉरर कॉमेडी विश्वातला गेमचेंजर” अशी टॅगलाईन असलेल्या ‘भूतम भयम’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरमध्ये रहस्य, विनोद आणि थरार यांचा हटके संगम पाहायला मिळत असून सोशल मीडियावर सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि तरुण कलाकारांचा तडका या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे युवा प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयी वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे.
‘भूतम भयम’ हा सिनेमा येत्या २४ जुलैपासून राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून Horror Comedy चाहत्यांसाठी ही एक भन्नाट मेजवानी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.






