Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Mhaswekar : 5 मिनिटांच्या भेटीसाठी केला 6 तासांचा प्रवास! चाहत्याचे प्रेम पाहून देवमाणूस फेम अभिनेत्री झाली भावुक

'देवमाणूस' मालिकेत लालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनम म्हसवेकर सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका चाहत्याने दिलेले गिफ्ट उघडताना दिसत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 07, 2026 | 05:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अनोख्या कृतीमुळे सोनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
  • तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला.
  • अनेकांनी लाली ही व्यक्तिरेखा इतकी प्रभावीपणे साकारल्याबद्दल सोनमचे अभिनंदनही केले.
मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनम म्हसवेकर सध्या ‘देवमाणूस’ मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली लाली ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेतील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून तिचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. आता एका चाहत्याने केलेल्या अनोख्या कृतीमुळे सोनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

‘तू ही रे माझा मितवा’ मध्ये ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, अर्णवसमोर उभे राहणार मोठे आव्हान; कथानकाला मिळणार वेगळं वळण

‘देवमाणूस’ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी छाप पडली असली तरी लाली या भूमिकेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. गोपाळवर निस्सीम प्रेम करणारी, त्याच्यासाठी कोणत्याही थराला जाणारी आणि कथानकात सतत नवे वळण आणणारी लाली प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही भूमिका अभिनेत्री सोनम म्हसवेकरने प्रभावीपणे साकारली आहे.

मालिकेतील लोकप्रियतेसोबतच सोनम सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती नियमितपणे तिच्या कामाशी संबंधित तसेच वैयक्तिक आयुष्यातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामागची कहाणी ऐकून अनेकजण भावूक झाले आहेत.

सोनमने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका चाहत्याने दिलेले गिफ्ट उघडताना दिसते. गिफ्ट उघडल्यानंतर त्यामध्ये श्री स्वामी समर्थांची सुंदर फोटोफ्रेम असल्याचे दिसून येते. मात्र या भेटवस्तूपेक्षा ती देणाऱ्या चाहत्याचे समर्पण आणि प्रेम अधिक खास असल्याचे सोनमने सांगितले.

पोस्टमध्ये तिने लिहिले की, एक चाहता तिला भेटण्यासाठी तब्बल तीन तास बाइक चालवत शूटिंगच्या ठिकाणी पोहोचला होता. त्याने फक्त पाच मिनिटे तिची भेट घेतली. त्या थोड्याशा वेळात त्याने सोनमच्या अभिनयाचे कौतुक केले, तिच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आणि तिला एक गिफ्ट दिले. त्यानंतर तो पुन्हा तीन तासांचा प्रवास करून आपल्या घरी परतला.

या अनुभवाबद्दल भावना व्यक्त करताना सोनम म्हणाली, “एक प्रेक्षक ३ तास बाइक चालवत मी जिथे शूट करत होते तिथे आले. अगदी ५ मिनिटे थांबले. आम्हाला तुम्ही आणि तुमचं काम खूप आवडतं असं सांगितलं आणि एक गिफ्ट दिलं. त्यानंतर पुन्हा ३ तासांचा प्रवास करून ते परत गेले. जाताना त्यांच्या चेहऱ्यावर फक्त आनंद होता.” ती पुढे म्हणाली, “एखाद्या व्यक्तीने केवळ पाच मिनिटांच्या भेटीसाठी सहा तासांचा प्रवास करावा, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं मला खूप कौतुक वाटलं. मी जेव्हा ते गिफ्ट उघडलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद मला माझ्याही चेहऱ्यावर जाणवला.”

सोनमच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले, तर काहींनी कलाकारांबद्दल असणारे चाहत्यांचे प्रेम किती निस्वार्थ असते याबद्दल भावना व्यक्त केल्या. अनेकांनी लाली ही व्यक्तिरेखा इतकी प्रभावीपणे साकारल्याबद्दल सोनमचे अभिनंदनही केले.

Sushma Murudkar : जेव्हा मराठी अभिनेत्रीला हिंदी क्षेत्रात भाषेवरून हिणवलं जातं; 200 लोकांसमोर केला अपमान,’तुझी गावठी मराठी…’

दरम्यान, ‘देवमाणूस’ मालिकेत सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. डिंपलच्या पुनरागमनामुळे कथानकाला नवे वळण मिळाले आहे. गोपाळ, लाली, डिंपल आणि नरू आजी यांच्या आयुष्यात पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये कोणते नवे ट्विस्ट पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sonam mhaswekar shared her fan moment on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Sushma Murudkar : जेव्हा मराठी अभिनेत्रीला हिंदी क्षेत्रात भाषेवरून हिणवलं जातं; 200 लोकांसमोर केला अपमान,’तुझी गावठी मराठी…’
1

Sushma Murudkar : जेव्हा मराठी अभिनेत्रीला हिंदी क्षेत्रात भाषेवरून हिणवलं जातं; 200 लोकांसमोर केला अपमान,’तुझी गावठी मराठी…’

एक दुःख आवरेना त्यात आणखीन भर! ‘Kamali’ मालिकेला भावनिक वळण, उघड होणार आजोबांच्या निधनाचे सत्य
2

एक दुःख आवरेना त्यात आणखीन भर! ‘Kamali’ मालिकेला भावनिक वळण, उघड होणार आजोबांच्या निधनाचे सत्य

“निवेदिता ताईंचं नाव ऐकताच…”, ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत रोहित परशुरामची एन्ट्री; नव्या भूमिकेबद्दल व्यक्त केल्या खास भावना
3

“निवेदिता ताईंचं नाव ऐकताच…”, ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत रोहित परशुरामची एन्ट्री; नव्या भूमिकेबद्दल व्यक्त केल्या खास भावना

Kamali Serial : कमळीने परीक्षेत मारली बाजी; मुंबई विद्यापीठात प्रथम, मिळाले तब्बल ‘इतके’ टक्के
4

Kamali Serial : कमळीने परीक्षेत मारली बाजी; मुंबई विद्यापीठात प्रथम, मिळाले तब्बल ‘इतके’ टक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.