Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘प्रत्येक अडचण ही आव्हान म्हणून घेते, त्यातूनच स्त्रीशक्ती कळते’, दीप्ती केतकरचा दुर्गाशक्तीवर पूर्ण विश्वास

Exclusive: सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ मधील सोशिक अनुप्रिया साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकरने नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गा, स्त्रीशक्ती आणि स्वानुभव यावर ‘नवराष्ट्र’ शी खास गप्पा मारल्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 13, 2026 | 07:34 AM
Exclusive: अभिनेत्री दीप्ती केतकरने स्त्री शक्तीची रुप केले व्यक्त

Exclusive: अभिनेत्री दीप्ती केतकरने स्त्री शक्तीची रुप केले व्यक्त

Follow Us
Follow Us:

Exclusive: सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर नेहमीच आपल्या अभिनयाने सर्वांना मोहीत करते. गेले अनेक वर्ष दीप्तीने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने राज्य केलं आहे. ‘माझ्यातील दुर्गा’ या सिरीजच्या निमित्ताने आम्ही दीप्तीशी खास गप्पा मारल्या आणि ‘नवराष्ट्र’शी बोलताना दीप्तीने अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिली आहेत.

सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ मध्ये मुख्य भूमिका अनुप्रिया साकारताना दीप्ती तुला काय वाटतं आणि तू ही भूमिका का स्वीकारलीस? यावर दीप्ती म्हणाली की, ‘पहिल्या दिवसापासून ही मालिका विचारली गेली तेव्हापासून ही भूमिका मला आवडली होती. मी स्वतः गृहीणी आहे. करिअर करायचं आहे आणि कुटुंबाच्या प्रेशरमुळे करता येत नाही. मानधन पुढे बघूया असं म्हणून मी होकार दिला होता. रोज प्रत्येक सीन झाल्यावर काम छान झालंय म्हणून रात्री झोप चांगली लागते. मालिका माझी आहे आणि काम करताना मजा नाही आली तर काम का करतोय असा प्रश्न पडतो. त्या सीनमधला प्रत्येक अनुभव हा इमोशनल आहे आणि खूप मज्जा येते. मी अनुप्रिया जगतेय असं म्हणते.’

आयुष्यात तू कोणती ‘लढाई’ लढली आहेस आणि जिंकलीस असं तुला वाटतं जिथे तुला वाटतं की तुला दुर्गेचं रुप घ्यावं लागलं?यावर अत्यंत शांतपणाने दीप्ती म्हणाली की, ‘वादळं येतात पण महाराजांच्या कृपेने किंवा देवीआईच शक्ती देते. लग्नाच्या आधी वा नंतर अशा गोष्टी होत असतात. पैशांवरून अडचण, बिझनेस वरून प्रॉब्लेम होतात. पण या सर्व अडचणी मी आजपर्यंत आयुष्यात आव्हान म्हणून घेत आले आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं मला वाटतं. शक्ती देवीच देते आणि मग त्या अडचणीवर मात करता येते. आयुष्यात चढउतार तर येतच असतात पण त्यात मी कायम सकारात्मक राहते आणि मार्ग निघतो.
मुळातच मी खूपच शांत आहे आणि कोणतीही परीक्षा आली की त्यात उत्तीर्ण होऊनच पुढे जायचं हा माझा स्वभाव आहे. बराचशा अडचणी येतात आणि त्यातून बाहेर पडता येते. मानसिकरित्या शांत राहिलात ना तर त्यातून सर्व नीट होणारच हा मला विश्वास असतो’

इथे ‘ग्रुपिझम’ असतो, अडचणी येतात त्यावर तू कशी मात करतेस? एक स्त्री म्हणून याकडे कसे पाहतेस? यावर दीप्तीने अगदी सडेतोडपणे सांगितले की, ‘माझा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे. तुम्ही स्वतःला कसे एखाद्यासमोर प्रेझेंट करता ते महत्त्वाचं आहे. आलेल्या कोणत्याही अडचणी मी संकट आहे या दृष्टीने पाहिलंचं नाही. आणि जर ग्रुपीझम आहे असं आपण मान्य केलं तर आहे, पण तुम्ही जर काम चांगलं करत असाल तर तुमच्यापर्यंत ते काम येणारच अशा मताची मी आहे. तुम्हाला तिथपर्यंत पोहचायचं आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही काम करताना प्रामाणिकपणे करा आणि त्यामुळे मला कधी कामाचा त्रास झाला नाही. मी कायम कामाचा विचार केला आणि त्यानुसार काम करत गेले. तुम्ही तुमच्या कामात इंप्रूव्ह करणं हा तुमचा संघर्ष असायला हवा असं मला वाटतं’

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

सोशल मीडियाकडे तुझा पाहण्याचा दृष्टीकोन काय आहे? यावर दीप्ती हसून म्हणाली की,  ‘आधी मला खूप बोअरिंग वाटायचं, पण ही काळाची गरज आहे. हे मला आता पटलंय. रील पोस्ट करा असं सांगितल्यावर मला आधी वाटायचं की, हे कशाला करा. पण आता कळतंय की प्रेक्षकांना BTS पहायला आवडतं. मला खरंतर पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ वेगळं ठेवायला आवडतं. पण काळानुसार आता थोडीशी अॅक्टिव्ह झाले आहे. ट्रोलिंग पण झालंय. पण Any publicity is good publicity. काही झालं तरी प्रेक्षकांपर्यंत पोहचतंय ते ठीक आहे. अभिनेत्री असल्यामुळे काही चुकीच्या गोष्टी छापल्या जातात. पण त्याकडे दुर्लक्ष करणं महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं.’

कलाकारांना चौकटीत बांधलं जातं तेव्हा राग येतो का? ‘आपण स्वतःला तसं बांधून घेतो. वेस्टर्न आऊटफिटमध्ये दाखवायचं आहे तर तुमचे शरीर तसं असायला हवं. फिटनेस तसा असायला हवा. पण हे माझं मत आहे. बरेचदा पात्रांसाठी चौकट असते, हे मला मान्य आहे. मला कलाकार म्हणून रिस्क घ्यायला आवडते. तुम्ही प्रयत्न करा ती चौकट मोडा. फिटनेस लेव्हलची काळजी घेणं गरजेचे आहे. तुम्हाला जर एक्सपरिमेंट करायचं असेल तर चांगल्या पद्धतीने करा असं मला वाटतं. 

आपल्याला जे आवडतं ते आपण केलंच पाहिजे. आयुष्य खूप लहान आहे असं वाटतंय. आपण स्वतःला जर आनंदी आणि समाधानी ठेवलं ना तर त्याचा पुढे त्रास नाही होत. हे मी केलं नाही ते मी केलं नाही हे मनात रहायला नको. प्रत्येकाला आपल्या मर्यादा माहीत असतात. रिग्रेट राहण्यापेक्षा ती गोष्ट करून घ्यायला पाहिजे.’

स्त्री म्हणजे अष्टभुजा असं म्हटलं जातं. पण सर्व पातळीवर काम करताना शारीरिक आणि मानसिक थकवा येतोच. तू हे कशा पद्धतीने हाताळतेस? यावर दीप्ती पटकन म्हणाली की, ‘मालिका संपल्यावर मला कदाचित दीड महिना झोप लागेल. पण यासगळ्यात मेडिटेशन नेहमी मदत होते. सध्या मी खूपच थकतेय. दुसरं म्हणजे थकवा जाण्यासाठी म्युझिक ऐकते. 

मी स्वतःला प्रिपेअर केलं आहे, माझं काम चालणारच आहे. मेंटली खूप स्ट्राँग केलंय आणि स्वतःला मी सांगते आणि ग्रेटफुल असणं खूप गरजेचे आहे. सासऱ्यांनी सांगितलं होतं की, ‘काम कधी सोडू नकोस. हे तुझं काम तुला आनंद देतं कारण ते तुझं पॅशन आहे’ त्यांना खूप अभिमान होता. माझं काम मला आवडतं, मला जर सीन चांगला नाही झाला तर रडू येतं. हे पॅशन मला मेंटली स्ट्राँग करतं. कधीकधी शरीर थकून जातं. पण आता मी काळजी घेतेय. सीनच्या मध्ये डोळे मिटून राहते. सुट्टी खूप गरजेची आहे आता मी ती मागायला लागले आहे.’

स्वतःत दुर्गा आहे हे प्रत्येक स्त्री ने कसे ओळखावे? यावर दीप्ती म्हणाली की, ‘कलाकार असणं हे एक ब्लेसिंग आहे. अभिनेत्री म्हणून प्रत्येक भूमिका करताना मला असं वाटतं की ही भूमिका करू शकते. अडचणी आल्या की कसं त्यातून बाहेर पडता येतं हे त्यातून कळतं. वयानुसार तुम्ही शिकत जाता. त्यातूनच आपल्याला आपल्यातील स्त्री शक्ती कळते आणि त्यानुसार ती शक्ती काम करवून घेते असं मला वाटतं’

Sun Marathi Serial: ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये शनायाच्या भूमिकेत ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री; अनुप्रियाच्या संसारात येणार मोठं वादळ

मुलींनी दुर्गेचं रुप घेणं किती महत्त्वाचं आहे असं तुला वाटतं? यावर दीप्तीने आपलं मत व्यक्त करत भावना स्पष्ट शब्दात व्यक्त केली, ‘सध्या मालिकेत जे चालू आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहचणं अत्यंत गरजेचे आहे. जे काही आपल्याला सोशल मीडियावर पहायला वा ऐकायला मिळतं तो राग आहेच आणि तो सर्व राग मी तो अॅक्शन सिक्विन्स करताना निघतो. गप्प बसणं योग्य नाही. एक स्त्री म्हणून हे करताना खूपच त्रास होतो. सीन करतानाही त्रास होतो. कुठल्याही स्त्री च्या बाबतीत हे घडूच नये. मला खूपच त्रास होतो कारण मी स्वतः एक मुलीची आई आहे. कुठेतरी हा संदेश जायला हवा. चुकीच्या गोष्टीबाबत जागरुकता येणं गरजेचे आहे. याविरुद्ध स्ट्रिक्ट कारवाई व्हायला हवी. कोणताही असा गुन्हा करताना माणसांना घाम फुटला पाहिजे, थरथली पाहिजेत.’ स्त्री शक्तीला त्रास देणाऱ्या अशा दुष्टांचा संहार आजही झालाच पाहिजे आणि त्यासाठी कायम दुर्गेच रुप घ्यावंच लागणार असं म्हणत दीप्तीने निरोप घेतला. 

Web Title: Sun marathi me sansar maza rekhite fame dipti ketar shared thoughts on serial and stri shakti exclusive dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 07:34 AM

Topics:  

  • entertainment
  • sun marathi

संबंधित बातम्या

Tumbbad: ‘तुंबाड’ला ८ वर्षे पूर्ण! सोहम शाहने हॅलोविनसाठी आणलं खास सरप्राइज; हस्तरच्या मर्चेंडाइजची चर्चा
1

Tumbbad: ‘तुंबाड’ला ८ वर्षे पूर्ण! सोहम शाहने हॅलोविनसाठी आणलं खास सरप्राइज; हस्तरच्या मर्चेंडाइजची चर्चा

Maha Devi AdiShakti: माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीची गाथा उलगडणार; ‘महा देवी आदिशक्ती’चा फर्स्ट लूक प्रदर्शित
2

Maha Devi AdiShakti: माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीची गाथा उलगडणार; ‘महा देवी आदिशक्ती’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Navratri Special: ‘स्त्रीशक्ती म्हणजे केवळ देवीची पूजा नव्हे’; अभिज्ञा भावेने सांगितला स्त्रीत्वाचा खरा अर्थ
3

Navratri Special: ‘स्त्रीशक्ती म्हणजे केवळ देवीची पूजा नव्हे’; अभिज्ञा भावेने सांगितला स्त्रीत्वाचा खरा अर्थ

Salman Khan: सलमान खान पुन्हा गाजवणार रुपेरी पडदा, ‘मॉन्स्टर’साठी ५० दिवसांची खास रणनीती
4

Salman Khan: सलमान खान पुन्हा गाजवणार रुपेरी पडदा, ‘मॉन्स्टर’साठी ५० दिवसांची खास रणनीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.