
apurva nemalelkar
अभिनेत्री म्हणते की, काही मुली लग्नानंतर कोणत्याही ऐशोआरामाची अपेक्षा करत नाहीत. त्या फक्त अशा घरासाठी प्रार्थना करतात जिथे त्यांना आदर मिळेल, त्यांच्या भावना समजून घेतल्या जातील आणि त्या भावनिकदृष्ट्या सुरक्षित असतील. आणि कदाचित, आता याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याची वेळ आली आहे. मुलींना हे शिकवा की तडजोड कधीही स्वतःची मनःशांती, स्वाभिमान किंवा स्वतःचा जीव पणाला लावून नसावी. त्यांना हे शिकवा की घरी परत येणं म्हणजे अपयश नाही. उलट, सगळं मुकाट्याने सहन करणं आणि त्यातच स्वतःला गमावणं हे खरं अपयश आहे.
Tumbadchi Manjula : तुंबाडची मंजुळा चा ट्रेलर रिलीज! रहस्य, भीती आणि भन्नाट कॉमेडीचा तडका
मी नशीबवान होते की माझ्या कठीण काळात माझे आई-वडील,माझा भाऊ आणि बहीण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज मला त्यांची खूप आठवण येतेय, पण त्यांच्या या पाठिंब्याने मला एक गोष्ट शिकवली – एक सुरक्षित जागा एखाद्याचा जीव वाचवू शकते.समाज नेहमीच काही ना काही बोलत राहील. जे लोक आज तुमच्या निर्णयांवरून तुम्हाला जज करत आहेत, तेच लोक जेव्हा तुम्ही आतून तुटत असता तेव्हा मौन बाळगून असतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला हे ठाऊक असायला हवं: स्वतःची निवड करणं हा कधीही स्वार्थीपणा नसतो. कधीकधी वाळलेल्या झाडाला पाणी देणं थांबवून नव्याने सुरुवात करणं, हेच सगळ्यात धाडसाचं पाऊल असतं. जर या पोस्टमुळे शांतपणे सगळं सहन करणाऱ्या एका जरी स्त्रीला स्वतःची निवड करण्याची, स्वतःला सावरण्याची किंवा कोणाकडे मदत मागण्याची प्रेरणा मिळाली… तर या पोस्टचा उद्देश यशस्वी झाला, असं अभिनेत्रीने सांगितलं आहे. अपुर्वा नेमळेकरने देखील पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतला आणि आता तिने पुन्हा एकदा नव्याने तिचं आयुष्य सुरु केलं. अपुर्वाच्या फ्रंटवर्कबाबत सांगायचं झालं तर, नुकतंच पद्मिनी ही तिची सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या सिरिजच्या निमित्ताने अपुर्वा निर्माती म्हणून देखील पुढे आली आहे.