Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mary Kom Statement : मैरी कॉमच्या ‘त्या’ कमेंटवरून वाद; सानिया मिर्झा-सायना नेहवालवर बोलणं पडलं महागात, टीमने मागितली माफी

Mary Kom Statement : ‘बिग बॉस 20’मध्ये सानिया मिर्झा आणि सायना नेहवाल यांच्यावरील वक्तव्यामुळे मैरी कॉम वादात सापडल्या आहेत. सोशल मीडियावर टीका वाढल्यानंतर त्यांच्या टीमने माफी मागत स्पष्टीकरण दिले.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 14, 2026 | 08:19 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Mary Kom Statement : सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या बॉक्सर मैरी कॉम सध्या ‘बिग बॉस 20’मधील सहभागामुळे चर्चेत आहेत. शोमध्ये काजी तौकीरसह झालेल्या संवादादरम्यान त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीतील कामगिरीबद्दल भाष्य केलं. मात्र, यावेळी केलेल्या एका कमेंटमुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसल्या.

क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या भारतीय महिला खेळाडूंबद्दल चर्चा सुरू होती. यावेळी काजी तौकीरने टेनिसपटू सानिया मिर्झा आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या कामगिरीचा उल्लेख केला. काजी म्हणाला, “आपल्याकडे किती मुलींनी खेळामध्ये कमाल केली आहे. सानिया मिर्झानेही खूप चांगली कामगिरी केली, सायना नेहवाल…”

काजी सानिया आणि सायना यांचं नाव घेत असतानाच मैरी कॉम यांनी त्यांना मध्येच थांबवत म्हटलं, “पण माझ्यासारखं कुणी काही मिळवलं नाही.” यानंतर त्यांनी आपण सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन असल्याचं सांगितलं.

मैरी कॉमच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांचा संताप

मैरी कॉम आपल्या विक्रमाबद्दल बोलत असताना काही प्रेक्षकांना मात्र त्यांची टिप्पणी इतर खेळाडूंना कमी लेखणारी वाटली. एपिसोड प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

काही युजर्सनी मैरी कॉम यांच्यावर इतर महिला खेळाडूंच्या कामगिरीचा अनादर केल्याचा आरोप केला.
काहींनी त्यांचा अंदाज ‘अहंकारी’ असल्याचं म्हटलं.
एका युजरने काजी महिला खेळाडूंचं कौतुक करत असताना त्यांना मध्येच थांबवण्याची गरज काय होती, असा सवाल केला.
काही नेटकऱ्यांनी मैरी कॉम यांच्या वक्तव्याला ‘सॉल्टी’ म्हणजेच नाराज किंवा चिडलेलं असल्याचं म्हटलं.वाद वाढल्यानंतर मैरी कॉमच्या टीमकडून स्पष्टीकरण

सोशल मीडियावर टीका वाढल्यानंतर मैरी कॉम यांच्या अधिकृत अकाउंटवरून त्यांच्या टीमने स्पष्टीकरण देत माफी मागितली. मैरी कॉम यांच्या वक्तव्याचा उद्देश कोणत्याही खेळाडूच्या कामगिरीला कमी लेखणे किंवा त्यांच्याशी स्वतःची तुलना करणे हा नव्हता, असं टीमने स्पष्ट केलं.

टीमने म्हटलं की, “जर मैरी यांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेतला गेला असेल, तर आम्ही माफी मागतो. कोणत्याही खेळाडूच्या प्रवासाला कमी लेखण्याचा किंवा त्यांची तुलना करण्याचा कोणताही हेतू नव्हता.”

मैरी कॉम भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि खेळासाठी सर्वस्व देणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा आदर करतात, असंही टीमने स्पष्ट केलं.

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

‘प्रत्येक पदक भारताचा मान वाढवतं’

टीमने पुढे सर्व खेळांमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आदर असल्याचं सांगितलं. “प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येक कामगिरी महत्त्वाची असते आणि प्रत्येक पदक भारताचा मान वाढवतं,” असं टीमकडून सांगण्यात आलं.

यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या मैरी कॉम

यावर्षी मैरी कॉम यांच्याभोवती निर्माण झालेला हा पहिला वाद नाही. फेब्रुवारीमध्ये माजी पतीसोबतच्या घटस्फोटाबाबत केलेल्या काही वक्तव्यांमुळेही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यांचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं सांगत नंतर माफी मागितली होती. त्यांनी व्हिडीओ शेअर करत कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

आता ‘बिग बॉस 20’मधील सानिया मिर्झा आणि सायना नेहवाल यांच्यावरील कमेंटमुळे मैरी कॉम पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या टीमने स्पष्टीकरण देत माफी मागितल्यानंतर हा वाद किती शांत होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

Web Title: Mary kom statement sania mirza saina nehwal comment team apology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Bigg Boss 20
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं
1

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
2

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
3

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं  खास नाव
4

Marathi Actress: गुड न्यूज! ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री झाली आई; मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करत जाहीर केलं लेकाचं खास नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.