Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meenakshi Seshadri : अभिनेत्री 37 वर्षांनी पुन्हा एकदा बनली नागीण! पुन्हा एकदा साकारला ‘नाचे नागिन गली गली’ चा लुक

1989 मध्ये 'नाचे नागिन गली गली' या चित्रपटातून इच्छाधारी नागीणीची भूमिका साकारून मीनाक्षी शेषाद्री यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तब्बल 37 वर्षांनंतर त्यांनी त्याच आयकॉनिक नागीण लूकची पुनरावृत्ती करत इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ शेअर केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 19, 2026 | 04:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाचे नागिन गली गली’ या चित्रपटात अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी इच्छाधारी नागीणीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नसले, तरी ग्रामीण भाग आणि छोट्या शहरांमध्ये त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. पुढे या चित्रपटाला कल्ट क्लासिक म्हणूनही ओळख मिळाली.

कडेकोट सुरक्षेनंतरही ‘रामायण’चा ट्रेलर लीक; रणबीर कपूरच्या दमदार एन्ट्रीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

आता तब्बल 37 वर्षांनंतर मीनाक्षी शेषाद्री पुन्हा एकदा त्याच आयकॉनिक नागीण अवतारात चाहत्यांसमोर आल्या आहेत. 62 वर्षीय अभिनेत्रीने तिचा प्रसिद्ध नागीण लूक पुन्हा साकारत त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या ‘नाचे नागिन गली गली’ या चित्रपटाच्या शीर्षक गीतावर नृत्य करताना दिसत असून, त्यांच्या या सादरीकरणाने 80 च्या दशकातील चाहत्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

व्हिडीओसोबतच्या पोस्टमध्ये मीनाक्षी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील रीना रॉय आणि श्रीदेवी यांच्या गाजलेल्या नागीण भूमिकांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, 1970 च्या दशकात रीना रॉय यांच्या ‘नागिन’ चित्रपटाने प्रचंड यश मिळवले, तर त्यानंतर 1980 च्या दशकात श्रीदेवी अभिनित ‘नगीना’नेही प्रेक्षकांवर मोहिनी घालत नागीण या संकल्पनेला नवी लोकप्रियता मिळवून दिली.

‘स्वतःला शक्य तितकं शुद्ध ठेवलं’, सीतेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीने केली ‘ही’ तयारी; स्वतःच सांगितला प्रवास

याच धर्तीवर आपणही ‘नाचे नागिन गली गली’ हा चित्रपट केला होता, असे सांगत मीनाक्षी यांनी त्या चित्रपटातील शीर्षक गीत पुन्हा सादर केल्याचे नमूद केले. इच्छाधारी नाग-नागीणीची संकल्पना हिंदू लोककथांमधील महत्त्वाचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता नितीश भारद्वाज मुख्य भूमिकेत झळकले होते. मीनाक्षी यांच्या मते, ‘नाचे नागिन गली गली’ हा चित्रपट आजही गावांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये आवडीने पाहिला जातो. अनेक चाहत्यांनी त्यांना पुन्हा एकदा नागीण लूकमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी हा खास व्हिडीओ तयार केला. तीन दशकांहून अधिक काळानंतर पुन्हा साकारलेला त्यांचा हा नागीण अवतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, चाहत्यांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Meenakshi seshadri nache nagin gali gali look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 04:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.