Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Miss Universe 2026: मिस युनिव्हर्स २०२६ मध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर! काजिया लिझला आव्हान देणार पाकिस्तानची मिस्बाह अरशद

Miss Universe 2026: मिस युनिव्हर्स २०२६ स्पर्धेत भारताकडून काझिया लिझ मेझो तर पाकिस्तानकडून मिस्बाह अर्शद सहभागी होणार आहे. ७५ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी काझिया पोर्तो रिकोला रवाना झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 05, 2026 | 03:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Miss Universe 2026: मिस युनिव्हर्स २०२६ स्पर्धेकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सुंदरी सहभागी होणार असल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. भारताकडून काझिया लिझ मेझो तर पाकिस्तानकडून मिस्बाह अर्शद या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदा मिस युनिव्हर्सच्या मंचावर भारत विरुद्ध पाकिस्तान अशी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

मिस युनिव्हर्स २०२६ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानची रंगणार स्पर्धा

भारताची प्रतिनिधी काझिया लिझ मेझो ७५ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पोर्तो रिकोला रवाना झाली आहे. मिस युनिव्हर्स इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे काही खास फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये काझिया विमानतळावर दिसत असून तिने सुंदर साडी नेसली आहे. तिच्या हातात भारताचा तिरंगा असून तिच्या चेहऱ्यावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान स्पष्टपणे दिसत आहे.

या फोटोंसोबत मिस युनिव्हर्स इंडियाने खास कॅप्शनही लिहिले आहे. “एक राणी केवळ मुकुटच नाही, तर राष्ट्राची स्वप्ने आणि आशाही घेऊन फिरते,” अशा शब्दांत तिच्या प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे. पुढे कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, परंपरेने नटलेली आणि अभिमानाने मुकुट परिधान केलेली मिस युनिव्हर्स इंडिया २०२६ काझिया लिझ मेझो ७५ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पोर्तो रिकोच्या प्रवासाला निघाली आहे. मोहकता, दृढनिश्चय आणि अब्जावधी स्वप्नांचा उत्साह घेऊन ती जागतिक स्तरावर चमकण्यासाठी सज्ज झाली आहे.

Salman Khan: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीज डेटबाबत महत्त्वाची माहिती समोर!

काझिया लिझ मेझोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

काझियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. भारताला यंदाचा मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळावा, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

दरम्यान, काझिया लिझ मेझोने मिस युनिव्हर्स इंडिया २०२६ चा किताब जिंकला होता. तिचे बालपण संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी येथे गेले आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ती सज्ज झाली असून तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानची मिस्बाह अर्शदही या स्पर्धेत सहभागी होत असल्याने दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Raghav Juyal: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये राघव जुयालची एन्ट्री! मेघनादच्या भूमिकेत अवघ्या ५ सेकंदांत जिंकली प्रेक्षकांची मनं

Web Title: Miss universe 2026 india vs pakistan kaziah liz misbah arshad ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • entertainment
  • Miss Universe

संबंधित बातम्या

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने उलगडलं ९० च्या दशकातील स्टारडमचं गुपित; आजच्या ट्रोलिंगबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
1

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने उलगडलं ९० च्या दशकातील स्टारडमचं गुपित; आजच्या ट्रोलिंगबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Salman Khan: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीज डेटबाबत महत्त्वाची माहिती समोर!
2

Salman Khan: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीज डेटबाबत महत्त्वाची माहिती समोर!

Raghav Juyal: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये राघव जुयालची एन्ट्री! मेघनादच्या भूमिकेत अवघ्या ५ सेकंदांत जिंकली प्रेक्षकांची मनं
3

Raghav Juyal: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये राघव जुयालची एन्ट्री! मेघनादच्या भूमिकेत अवघ्या ५ सेकंदांत जिंकली प्रेक्षकांची मनं

‘रामायण’चा जगभरात डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कमावले १५० कोटींहून अधिक; ओपनिंगकडे सर्वांचे लक्ष
4

‘रामायण’चा जगभरात डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कमावले १५० कोटींहून अधिक; ओपनिंगकडे सर्वांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.