Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raghav Juyal: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये राघव जुयालची एन्ट्री! मेघनादच्या भूमिकेत अवघ्या ५ सेकंदांत जिंकली प्रेक्षकांची मनं

Raghav Juyal: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये राघव जुयाल मेघनादच्या भूमिकेत दिसणार आहे. अवघ्या ५ सेकंदांच्या झलकने त्याने चाहत्यांचे लक्ष वेधले असून दुसऱ्या भागात त्याची संपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 05, 2026 | 01:04 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Raghav Juyal: रणबीर कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपट आज, ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘रामायण’च्या प्रदर्शनाने प्रेक्षकांना अनेक आश्चर्याचे धक्के दिले. ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटातील कलाकार, त्यांचे लूक आणि कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अशातच चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठं सरप्राइज दिलं आहे. रावणाचा मुलगा मेघनाद अर्थात इंद्रजितच्या भूमिकेत अभिनेता राघव जुयाल दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राघवच्या या भूमिकेबद्दल आधी कोणालाही माहिती नव्हती. चित्रपट पाहिल्यानंतरच त्याच्या भूमिकेचा उलगडा झाला.

मेघनादच्या भूमिकेत राघव जुयालचा दमदार लूक

‘रामायण’च्या निर्मात्यांनी दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाच्या तारखेसह सनी देओलची झलकही प्रेक्षकांसमोर आणली आहे. याचदरम्यान राघव जुयालच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटात राघवची अवघ्या पाच सेकंदांची झलक पाहायला मिळते. या दृश्यात तो पूर्णपणे राक्षसाच्या वेशात दिसत असून, त्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्याचा हा दमदार लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. राघवची संपूर्ण भूमिका आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांना दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.

He is coming #Raghavjuyal #ramayana #meghnad https://t.co/dcLs95H5gQ — Heena_love_Raghavjuyal (@Heena_Qureshi_) November 3, 2026

 

Kareena Kapoor: ‘मी रस्त्यावर ओरडत होते…’; सैफवरील हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं? करीनाने ‘कॉफी विद करण’मध्ये सांगितला अनुभव

कोण होता मेघनाद?

रामायणातील मेघनाद हा लंकेचा राजा रावणाचा मुलगा होता. त्याला इंद्रजित या नावानेही ओळखले जाते. तो अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली योद्धा होता. त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर स्वर्गावर स्वारी केली होती आणि देवांचा राजा इंद्रालाही पराभूत केले होते. त्यामुळे त्याला इंद्रजित हे नाव मिळाले. शौर्य, आक्रमकता आणि वडिलांप्रती असलेली निष्ठा ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. राम-रावण युद्धादरम्यान त्याने आपल्या मायावी शक्तींचा वापर करून लक्ष्मणाला बेशुद्ध केले होते. मात्र, अखेर लक्ष्मणानेच युद्धात मेघनादाचा वध केला.

Laxmikant Berde: लक्ष्याच्या निधनामागे कोणत्या दोन सवयी ठरल्या कारणीभूत? वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

डान्सर ते अभिनेता; राघव जुयालचा प्रवास

राघव जुयालचा अभिनय क्षेत्रातील प्रवासही तितकाच रंजक आहे. आपल्या अनोख्या स्लो मोशन डान्स स्टाइलमुळे तो सर्वप्रथम चर्चेत आला होता. नृत्याच्या मंचावरून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘एबीसीडी २’, ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. आता ‘रामायण’मधील मेघनादच्या भूमिकेतून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची ही छोटीशी झलक पाहिल्यानंतर दुसऱ्या भागात राघव काय कमाल करणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Web Title: Raghav juyal as meghnad in ranbir kapoor ramayana movie ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • entertainment
  • Hindi Movie
  • Raghav Juyal

संबंधित बातम्या

‘रामायण’चा जगभरात डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कमावले १५० कोटींहून अधिक; ओपनिंगकडे सर्वांचे लक्ष
1

‘रामायण’चा जगभरात डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कमावले १५० कोटींहून अधिक; ओपनिंगकडे सर्वांचे लक्ष

OTT Releases 6 November:ओटीटी प्रेक्षकांसाठी खुशखबर! ६ नोव्हेंबरला रिलीज होणार ५ नवे चित्रपट आणि सीरिज; पाहा संपूर्ण यादी!
2

OTT Releases 6 November:ओटीटी प्रेक्षकांसाठी खुशखबर! ६ नोव्हेंबरला रिलीज होणार ५ नवे चित्रपट आणि सीरिज; पाहा संपूर्ण यादी!

Aamir Khan: गौरी स्प्रॅटशी लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांतच आमिर खानवर घर सोडण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
3

Aamir Khan: गौरी स्प्रॅटशी लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांतच आमिर खानवर घर सोडण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

Laxmikant Berde: लक्ष्याच्या निधनामागे कोणत्या दोन सवयी ठरल्या कारणीभूत? वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
4

Laxmikant Berde: लक्ष्याच्या निधनामागे कोणत्या दोन सवयी ठरल्या कारणीभूत? वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.