Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Web Series Review : सस्पेन्स… थ्रिल… मनोरंजन! फक्त गुन्हेगार नाही, प्रेक्षकांचे लक्ष कैद करणारा ‘Detective Dhananjay’

Web Series Review : Detective Dhananjay: Rahasyajaal ही मराठी मिस्ट्री-थ्रिलर वेब सिरीज सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 14, 2026 | 02:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • बाबुराव अर्नाळकर यांच्या गाजलेल्या रहस्यकथांना आधुनिक तापशैलीची जोड!
  • दोन गूढ खून आणि त्यामागचा तपास!
  • रहस्यकथांचा गाभा कायम ठेवत त्याला डिजिटल युगाची झलक!
  • दर्जेदार मराठी सस्पेन्स आणि तपासकथांच्या चाहत्यांसाठी “डिटेक्टिव्ह धनंजय: रहस्यजाळ” हा एक उत्तम पर्याय!
Web Series Review : सध्या मराठी सिनेचाहत्यांना ‘Detective Dhananjay: Rahasyajaal’ या Web Series ने वेड लावले आहे. ही मालिका Marathi मिस्ट्री-थ्रिलर असून ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आली आहे. एकूण 7 भागांमध्ये ही मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. चंद्रकांत सखाराम चव्हाण म्हणजेच सुप्रसिद्ध लेखक बाबुराव अर्नाळकर यांच्या गाजलेल्या रहस्यकथांना आधुनिक तापशैलीची जोड या मालिकेत देण्यात आली आहे. या मालिकेत एक वेगळीच रोमांचक दुनिया उभारण्यात आली आहे. ही सिरीज पाहताना, एक मात्र लक्षात येते की कथानकाची गती थोडी मंदावते, मात्र अभिनेता आदिनाथ कोठारे याचा संयमी अभिनय आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. सस्पेन्स थ्रिलरमध्ये संगीताचं महत्त्व मोठं असतं आणि या सीरिजमध्ये BGM ने ते रहस्य टिकवून ठेवले.

चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार, पण ट्विस्ट अजून बाकी! ‘या’ १० जूनला हायकोर्ट काय निर्णय देणार?

‘Detective Dhananjay: Rahasyajaal’ या Web Series च्या सुरुवातीला झालेली दोन गूढ खून आणि त्यामागचा तपास दाखवला जातो. तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसा एका मोठ्या हिरे तस्करी रॅकेटचे धागेदोरे समोर येऊ लागतात. मग आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर गुन्हेगार कशा शोधला जातो? हे पाहणे फार महत्वाचे ठरते. एकंदरीत, ही संपूर्ण सिरीज गुन्ह्यांमागील गुन्हेगाराची मानसिकता, स्वार्थ आणि मानवी भावनांचा देखील अभ्यास करते.

‘Detective Dhananjay: Rahasyajaal’ या Web Series मध्ये दोन वेगळ्या मानवी स्वभावाचे मुख्य पात्र दाखवण्यात आले आहे. Adinath Kothare यांनी डिटेक्टिव्ह धनंजय हे पात्र साकारले आहे. या पत्राचा स्वभाव अगदी शांत आणि बारकाईने निरीक्षण करणारा तसेच बुद्धिमान दाखवण्यात आले आहे. तर अभिनेता Pushkaraj Chirputkar ने ‘छोटू’ नावाचे पात्र साकारले आहे. Chhotu ला आधुनिक तंत्रज्ञान आणि सायबर तपासात पारंगत दाखवण्यात आले आहे. त्याने डिटेक्टिव्ह धनंजयला दिलेली सोबत या कथेला आधुनिक रंग देते.

“चाळीत कैरी चोरण्याची मज्जा वेगळीच होती” योगिता चव्हाणने दिला उन्हाळाच्या आठवणींना उजाळा

लेखक Girish Joshi आणि दिग्दर्शक Shrirang Godbole यांनी पारंपरिक रहस्यकथांचा गाभा कायम ठेवत त्याला डिजिटल युगाची झलक दिली आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या पिढीतील प्रेक्षकांना ही मालिका सहज जोडून घेते. ७ भागांच्या या मालिकेत काही ट्विस्ट आधीच ओळखू येतात आणि काही प्रसंगांमध्ये संथपणा जाणवतो. तरीसुद्धा दर्जेदार मराठी सस्पेन्स आणि तपासकथांच्या चाहत्यांसाठी “डिटेक्टिव्ह धनंजय: रहस्यजाळ” हा एक उत्तम पर्याय ठरतो.

टीप – कथेची मांडणी थोडी विस्कळीत वाटते. सुरुवातीचे काही भाग खूप लांबलेले वाटतात आणि शेवटचा भाग सगळी माहिती एकत्र कोंबल्यासारखा वाटतो. हे Balance राखले असते तर सीरिजचा प्रभाव वाढला असता. 

Web Title: Detective dhananjay rahasyajaal marathi web series review

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • adinath kothare
  • Marathi web series
  • Web Series

संबंधित बातम्या

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
1

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
2

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.