Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाच्या ‘मायसा’चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. रफ-टफ अवतारातील रश्मिका अॅक्शन करताना दिसणार असून वडील-मुलीची अनोखी कथा पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 21, 2026 | 08:25 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

 

Mysaa Teaser: पॅन-इंडिया स्टार रश्मिका मंदाना हिच्या आगामी ‘मायसा’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा दमदार टीझर आता रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये रश्मिका एका आक्रमक, रफ-टफ आणि संतप्त अवतारात दिसत असून, तिचा हा अंदाज याआधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ‘मायसा’ हा २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

‘मायसा’च्या टीझरमध्ये रश्मिकाचा नवा अवतार

रश्मिका मंदाना आपल्या अभिनयासोबतच दमदार स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखली जाते. ‘मायसा’मध्ये मात्र तिचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये ती आक्रमक आणि धाडसी अंदाजात दिसते. हाय-ऑक्टेन अॅक्शन सीन्ससोबत तिच्या व्यक्तिरेखेतील राग आणि भावनांचीही झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

वडील-मुलीच्या नात्याची भावनिक कथा

‘मायसा’ची कथा केवळ अॅक्शनपुरती मर्यादित नसून, वडील आणि मुलीच्या अनोख्या नात्याभोवती फिरणारी भावनिक कथा असल्याची झलक टीझरमधून मिळते. या नात्याला अॅक्शन आणि थ्रिलरच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे.

भावना, अॅक्शन आणि भव्य दृश्यांचा मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या महिला-केंद्रित अॅक्शन चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी रश्मिकाची व्यक्तिरेखा आहे.

रविंद्र पुल्ले यांचं दिग्दर्शन

‘सीता रामम’मधील कामासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रविंद्र पुल्ले यांनी ‘मायसा’चं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अॅक्शन, भावना आणि भव्यता यांचा मेळ साधण्यात आला आहे. टीझरमधून मोठ्या स्तरावर उभ्या करण्यात आलेल्या पॅन-इंडिया सिनेमॅटिक जगाची झलक पाहायला मिळते.

जेक्स बेजॉय यांच्या संगीताने वाढवली टीझरची रंगत

प्रसिद्ध संगीतकार जेक्स बेजॉय यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. टीझरमधील इंटेन्स म्युझिक स्कोअरमुळे अॅक्शन आणि ड्रामाची तीव्रता आणखी वाढताना दिसते.

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

‘मायसा’ कधी होणार रिलीज?

अनफॉर्मुला फिल्म्स निर्मित आणि रविंद्र पुल्ले दिग्दर्शित ‘मायसा’ हा आदिवासी प्रदेशांच्या पार्श्वभूमीवर आधारित भावनिक अॅक्शन थ्रिलर आहे. भव्य व्हिज्युअल्स, अॅक्शन, भावनिक कथा आणि रश्मिका मंदानाचा नवा अवतार यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

‘मायसा’ २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता रश्मिकाचा हा रफ-टफ अंदाज मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना किती भावतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Web Title: Mysaa teaser rashmika mandanna action movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.