(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Ranu Mondal New Home: सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्धी मिळवणारी रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रानू मंडलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिने स्वतःचं घर घेतल्याची माहिती या व्हिडीओमधून समोर आली आहे. आपल्या स्वप्नातील घराचं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात रानू मंडल गाणं गाताना दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर एका सोशल मीडिया युजरने रानू मंडलचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. लोकांच्या आशीर्वादामुळे रानू मंडलने स्वतःचं घर घेतलं, असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
घर मिळाल्याच्या आनंदात रानू मंडलने ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील ‘दीदी तेरा देवर दीवाना’ हे लोकप्रिय गाणं गायलं. बराच काळानंतर रानू मंडलचा आवाज ऐकायला मिळाल्याने सोशल मीडिया युजर्सनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या.
रानू मंडलचा आवाज ऐकल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिची तुलना लता मंगेशकर यांच्याशी केली. एका युजरने रानू मंडलच्या आवाजाचं कौतुक करत तो कमाल असल्याचं म्हटलं. तर आणखी एका युजरने ‘आपण कलेची कदर केली पाहिजे, कलाकाराची पार्श्वभूमी काहीही असो’, अशी प्रतिक्रिया दिली.
रानू मंडलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे.
‘दीदी तेरा देवर दीवाना’ हे ‘हम आपके हैं कौन’ या १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील लोकप्रिय गाणं आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.
या गाण्याला लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता, तर संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं. चित्रपटातील सलमान आणि माधुरीची केमिस्ट्री, माधुरीचा जांभळ्या रंगाचा लेहेंगा आणि तिचा खट्याळ अंदाज आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
तीन दशकांहून अधिक काळ उलटला तरी या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमध्ये आजही हे गाणं आवर्जून ऐकायला मिळतं. त्यामुळे रानू मंडलने हेच गाणं गातानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा या सदाबहार गाण्याच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
View this post on Instagram
Bigg Boss 20 First Eviction: पहिल्याच आठवड्यात धक्का! ‘या’ स्पर्धकाचा घरातील प्रवास संपला






