Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nusrat Bharucha Bali Accident: ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत पोहोचली नुसरत! अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

Nusrat Bharucha Bali Accident: अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा बालीमध्ये अपघात झाला असून तिच्या मणक्याला गंभीर फ्रॅक्चर झाल्याची माहिती वृत्तात देण्यात आली आहे. बालीतील रुग्णालयात उपचार सुरू असताना पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी तिला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 03, 2026 | 11:25 AM
Nusrat Bharucha Bali Accident: (फोटो- सोशलमीडिया)

Nusrat Bharucha Bali Accident: (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा Nusrat Bharucha Accident बालीमध्ये मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. पुढील उपचारासाठी तिला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं. मुंबईत आणल्यावर तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशलमीडिलवर व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये ती स्ट्रेचरवर आहे तसेच तिला ऑक्सिजन लावलेला दिसतोय. तिचे असे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. Nusrat Bharucha Bali Accident:

नेमकं काय घडलं बालीमध्ये?

मिळालेल्या माहितीनुसार नुसरत काही दिवसांपूर्वी बालीला कामांसाठी तसेच सुट्टीसाठी ती गेली होती. तिथेच तिचा अपघात झाला. अपघात कसा झाला त्याबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतू या अपघातामध्ये तिच्या मणक्याला गंभीर फ्रॅक्चर झालं. अपघातानंतर तिला लगेच बालीमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी झेप; पहिल्याच दिवशी विक्रम मोडणार?

तिथे नुसरतवर उपचार सुरु होते. परंतू मणक्याला मोठी दुखापत झाल्याने बालीमध्ये शस्त्र क्रिया करण योग्य नव्हतं म्हणून तिला मुंबईत आणले. नुसरतला एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं. मुंबई एअरपोर्टवर उतरल्यानंतर तिला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथला व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात नुसरत शुद्धीत आहे, आजूबाजूच्या लोकांशी बोलत पण आहे, पण तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवलं आहे. स्ट्रेचरवरून तिला आत नेलं जात आहे.

टीमने काय सांगितलं?

नुसरतच्या टीमने याआधीच तिच्या दुखापतीबद्दल थोडी माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की तिला बरं व्हायला बराच वेळ लागेल. दुखापत आणि शस्त्रक्रियेमुळे तिला पूर्ण आराम करावा लागणार आहे. काही महिने तिला बेड रेस्ट करावा लागू शकतो. याचा परिणाम तिच्या पुढच्या कामांवर होईल. तिचे काही प्रोजेक्ट सुरु आहे ते थांबतील. मणक्याची शस्त्रक्रिया मुंबईत होणार आहे, मात्र ती कधी हे सांगण्यात आले नाही. डॉक्टर आधी तिचे सगळे रिपोर्ट बघतील आणि मग सर्जरीचा निर्णय घेतील.

Pehla Pyaar Doosri Baar: ‘तेरा यार हूं मैं’च्या आठवणी पुन्हा ताज्या; ‘पुराने दिन’ गाण्याने जिंकली चाहत्यांची मनं!

टायगर सोबतच्या सिनेमाचं काय?

नुसरतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच टायगर श्रॉफ सोबत एका सिनेमात दिसणार होती. रिपोर्ट्सनुसार दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार होते. सिनेमाचं नाव अजून बाहेर आलं नव्हतं, शूटिंग सुरू व्हायचं होतं आणि त्याआधीच हा अपघात झाला. नुसरत शेवटची ‘उफ्फ ये सियापा’ या सिनेमात दिसली होती.

हा एक कॉमेडी-ड्रामा सिनेमा होता. तो 5 सप्टेंबर 2025 ला रिलीज झाला होता. त्या सिनेमात तिच्या कामाचं कौतुक पण झालं होतं.आता या अपघातामुळे तिच्या पुढच्या सगळ्या प्लॅनला ब्रेक लागला आहे. चाहते तिच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियावर सगळे तिला Get Well Soon म्हणत आहेत.दरम्यान, डॉक्टरांचं म्हणणं आहे की मणक्याची दुखापत ही गंभीर असते, त्यामुळे घाई न करता पूर्ण उपचार करावे लागतील. शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी पण करावी लागेल.

 

Web Title: Nusrat bharucha bali accident spine fracture air ambulance mumbai rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Entertainmenmt
  • Hindi Movie
  • Nushrratt Bharuccha
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार
1

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

Adinath Kothare: ‘रामायण’नंतर आदिनाथ कोठारेचा आणखी एक बॉलिवूड चित्रपट; यामी गौतमसोबत ‘नई नवेली’मध्ये दिसणार
2

Adinath Kothare: ‘रामायण’नंतर आदिनाथ कोठारेचा आणखी एक बॉलिवूड चित्रपट; यामी गौतमसोबत ‘नई नवेली’मध्ये दिसणार

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
3

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…
4

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.