Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tuljabhavani: आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात उर्वीचे मालिकेत पदार्पण

Aai Tuljabhavani: कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत उर्वीचे हृदयस्पर्शी पदार्पण झाले आहे. आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीच्या दैवीशक्तीचा नवा अवतार पाहायला मिळणार आहे. सेटवर 'आई राजा उदो उदो'च्या गजरात उर्वीची पहिली एंट्री झाली. या खास क्षणी कलाकार आणि उपस्थितांचे डोळेही पाणावले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2026 | 04:59 PM
आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! 'आई राजा उदो उदो'च्या गजरात उर्वीचे मालिकेत हृदयस्पर्शी पदार्पण

आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! 'आई राजा उदो उदो'च्या गजरात उर्वीचे मालिकेत हृदयस्पर्शी पदार्पण

Follow Us
Follow Us:
  • तुळजाईच्या दैवीशक्तीचा नवा आविष्कार!
  • ‘आई तुळजाभवानी’मध्ये उर्वीच्या पदार्पणाचा भावुक क्षण चर्चेत
  • ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत उर्वीची दमदार एंट्री
मुंबई : कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत आता एक अत्यंत नाट्यमय वळण पाहायला मिळत आहे. ज्यात चातुर्मासाची पोथी कपटाने हस्तगत करणारा महिषासुर आणि त्याची पत्नी शुंभा यांनी धर्माचे राज्य संपवण्यासाठी रचलेल्या नव्या कटाची गोष्ट उलगडते आहे. लोकांच्या मनातील भक्ती संपवण्यासाठी चातुर्मास संपल्याची खोटी आवई उठवली जात असून, महिषासुराच्या अंशातून जन्माला आलेल्या मल्लासुराने सृष्टीत हाहाकार माजवला आहे. महिषासुर आणि दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी रचलेला हा मल्लासुररूपी कपटी डाव आता अश्या वळणावर येऊन ठेपला आहे जिथे धर्माच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष आदिशक्तीना दैवी तत्वाला बळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला आहे.(Aai Tuljabhavani)

बालरुपातली तुळजा सोबतच्या युद्धादरम्यान मल्लासुर दैवी सामर्थ्य संपल्याचा दावा करत विजयाचा उन्माद व्यक्त करतो. मात्र, याच क्षणी आदिशक्तीच्या मार्गदर्शनानुसार महादेव, विष्णू आणि ब्रह्मदेव आपापले दिव्य अंश बालरूपातील तुळजाईला प्रदान करतात. त्रिदेवांच्या दिव्य शक्तींचा संगम होताच अग्नीच्या प्रचंड उग्र वादळामधून अष्टभुजा महाशक्तीच्या रूपात देवी तुळजाभवानीचा भव्य असा मूळ दैवी अवतार प्रकट होतो. सुवर्ण अग्निज्वाळांच्या पार्श्वभूमीवर साकारलेले हे आई तुळजाभवानीचे भव्यरूप प्रेक्षकांसाठी एक अद्भुत दृश्यानुभव ठरणार आहे. विशेष म्हणजे दीपावलीच्या शुभमुहूर्तावर येत्या रविवारी ८ नोव्हेंबरच्या भागात या दिव्यरूपाची प्रचिती मिळणार आहे.

Ladaku Movie Release Date : Kartik Aaryan आणि Kabir Khan ची जोडी पुन्हा एकदा सज्ज! ‘लडाकू’ चित्रपट 18 जून 2027 रोजी होणार रिलीज

आदिशक्तींनी स्वत: पुढाकार घडवून आणलेली ही महाशक्ती स्वरूपिणी दैवीलीला, आसुरी प्रवृत्तीच्या संहाराचा निर्णायक टप्पा सुरू करणारी असून येणारा प्रत्येक भाग चुकवू नये असा आहे, देवी भक्तांसाठी हे दररोज अनुभवावेत असे दैवी अनुभूतीचे अनमोल क्षण आहेत, पौराणिक भव्यतेशी आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा अनोखा संगम यामुळे सध्या ही मालिका विशेष लोकप्रिय ठरली आहे.

या नव्या दैवी रूपाविषयी आणि भूमिकेविषयी बोलताना अभिनेत्री उर्वी पाध्ये म्हणाली, “प्रत्येक कलाकाराचे मुख्य भूमिका साकारण्याचे स्वप्न असते आणि माझ्या पहिल्याच मालिकेत मला आई तुळजाभवानीची भूमिका साकारायला मिळणे ही मी देवीची सर्वात मोठी कृपा समजते. ही एक पौराणिक मालिका असल्याने भाषेचा भारदस्तपणा, आवाजातील ठामपणा जपण्यासाठी विशेष सराव, स्क्रिप्ट वाचन आणि दिग्दर्शकांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. भूमिकेसाठी पौराणिक अभ्यास, युद्धप्रसंगांसाठी शारीरिक व मानसिक तयारी करताना सुरुवातीला दडपण आले होते; पण त्यावर मात करत मी शिकत गेले. सेटवर माझी पहिली एंट्री शूट होताना आजूबाजूला ‘आई राजा उदो उदो’चा गजर आणि अंगावर पडणाऱ्या फुलांच्या पाकळ्यांचा तो क्षण अत्यंत भावुक करणारा होता, ज्याने मला एका अद्भुत सकारात्मक ऊर्जेची प्रचिती दिली.”

उर्वी पुढे म्हणाली, “तुळजाभवानीचे ममत्व आणि अन्यायाविरुद्ध लढणारे रौद्र रूप हे दोन्ही पैलू मला खूप भावले. माझा स्वभाव मूळचा शांत असल्याने तिचे रौद्र रूप साकारणे माझ्यासाठी वेगळे आव्हान होते. मॉनिटरवर स्वतःला देवीच्या रूपात पाहिले तेव्हा माझे डोळे पाणावले होते आणि देवी पाठीशी असल्याची तीव्र जाणीव झाली. कोल्हापूरची महालक्ष्मी ही आमची कुलस्वामिनी आहे. आई महालक्ष्मी आणि आई तुळजाभवानी यांच्याबद्दल माझ्या मनात अपार श्रद्धा आहे. देवीच्या आशीर्वादानेच मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. अजून मला तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याची संधी मिळालेली नाही; पण लवकरच हा योग यावा, अशी मनापासून इच्छा आहे. शूटिंगच्या सुरुवातीलाच आलेल्या दिव्य अनुभवांमुळे माझी श्रद्धा आणि भक्ती अधिकच दृढ झाली आहे.”

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र

💡

Frequently Asked Questions

  • Que: उर्वीने कोणत्या मालिकेत पदार्पण केले आहे?

    Ans: उर्वीने कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत पदार्पण केले आहे.

  • Que: उर्वीची मालिकेतील पहिली एंट्री कशी झाली?

    Ans: सेटवर 'आई राजा उदो उदो'च्या गजरात उर्वीची पहिली एंट्री झाली. हा क्षण उपस्थितांसाठी भावुक ठरला.

  • Que: 'आई तुळजाभवानी' ही मालिका किती वाजता पाहता येईल?

    Ans: ही मालिका दररोज रात्री ८.५० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते. तसेच JioHotstar वरही पाहता येते.

Web Title: Urvi emotional debut aai tuljabhavani serial colors marathi sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • colors marathi
  • entertainment
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Saawan Aaya Hai Song: आयुष्मान खुराना-शर्वरीची पावसात रंगली प्रेमकहाणी; सूरज बडजात्यांचं नवं रोमँटिक गाणं
1

Saawan Aaya Hai Song: आयुष्मान खुराना-शर्वरीची पावसात रंगली प्रेमकहाणी; सूरज बडजात्यांचं नवं रोमँटिक गाणं

Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
2

Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Zee Marathi New Serial: उषा नाडकर्णी झी मराठीवर कमबॅक करणार; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत पूजा बिरारीची मुख्य भूमिका
3

Zee Marathi New Serial: उषा नाडकर्णी झी मराठीवर कमबॅक करणार; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत पूजा बिरारीची मुख्य भूमिका

Dia Mirza: दिया मिर्झाच्या दिवाळीच्या व्हिडिओवरून वाद; मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला दिले महत्त्वाचे निर्देश!
4

Dia Mirza: दिया मिर्झाच्या दिवाळीच्या व्हिडिओवरून वाद; मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला दिले महत्त्वाचे निर्देश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.