Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laxmikant Berde: लक्ष्याच्या निधनामागे कोणत्या दोन सवयी ठरल्या कारणीभूत? वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Laxmikant Berde: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचं वयाच्या ५०व्या वर्षी निधन झालं. किडनीचा आजार, दारू आणि सिगारेटच्या सवयी तसेच त्यांच्या संघर्षमय कारकिर्दीविषयी जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 05, 2026 | 09:48 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Laxmikant Berde: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. ‘लक्ष्या’ या नावाने घराघरांत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. इतकंच नाही, तर एका वर्षात त्यांनी तब्बल ११ चित्रपट साइन केले होते. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला होता.

अत्यंत गरिबीतून उभं केलं स्वतःचं विश्व

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अत्यंत गरिबीतून आपल्या आयुष्याची सुरुवात केली होती. शिक्षण घेत असतानाच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. अभिनयाच्या वेडापायी त्यांनी साहित्य संघात नोकरी स्वीकारली. तिथे पडदे लावण्यापासून मिळेल ते काम ते करायचे. याच काळात गणेशोत्सवातील नाटकांमध्येही ते सहभागी व्हायचे. मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं.

‘मैने प्यार किया’मधून हिंदीत मिळाली ओळख

मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी संधी मिळाली. सूरज बडजात्या यांच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात त्यांनी मनोहरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमान खान आणि भाग्यश्री मुख्य भूमिकेत होते. लक्ष्मीकांत यांची भूमिका सहाय्यक स्वरूपाची असली, तरी ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आपली लोकप्रियता वाढवली.

दोन विवाह; प्रिया बेर्डे यांच्यासोबतही केलं काम

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचं १९९६ मध्ये निधन झालं. त्यानंतर १९९८ मध्ये त्यांनी अभिनेत्री प्रिया अर्जुन यांच्याशी विवाह केला. लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांनी ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातही एकत्र काम केलं होतं.

Ladaku Movie Release Date : Kartik Aaryan आणि Kabir Khan ची जोडी पुन्हा एकदा सज्ज! ‘लडाकू’ चित्रपट 18 जून 2027 रोजी होणार रिलीज

दारू आणि सिगारेटच्या सवयींचा प्रकृतीवर परिणाम?

लक्ष्मीकांत बेर्डे यांना किडनीशी संबंधित आजार होता. त्यांना दारू आणि सिगारेटचं व्यसन असल्याचं सांगितलं जातं. तणाव दूर करण्यासाठी ते दारूचं सेवन करत असल्याचाही उल्लेख केला जातो. या सवयींचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचं म्हटलं जातं. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर त्यांच्यावर बराच काळ उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना अपेक्षित यश मिळालं नाही.

अखेर १६ डिसेंबर २००४ रोजी किडनीच्या आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी त्यांची जीवनयात्रा संपली. आजही त्यांचे चित्रपट, त्यांचा सहजसुंदर अभिनय आणि विनोदाची अनोखी शैली प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या अकाली निधनाने मराठी मनोरंजनविश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली.

Aai Tuljabhavani: आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात उर्वीचे मालिकेत पदार्पण

Web Title: Laxmikant berde death reason kidney disease life story ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • entertainment
  • Laxmikant Berde
  • marathi movie

संबंधित बातम्या

Kareena Kapoor: ‘मी रस्त्यावर ओरडत होते…’; सैफवरील हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं? करीनाने ‘कॉफी विद करण’मध्ये सांगितला अनुभव
1

Kareena Kapoor: ‘मी रस्त्यावर ओरडत होते…’; सैफवरील हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं? करीनाने ‘कॉफी विद करण’मध्ये सांगितला अनुभव

Aai Tuljabhavani: आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात उर्वीचे मालिकेत पदार्पण
2

Aai Tuljabhavani: आसुरी शक्तींच्या संहारासाठी तुळजाभवानीचा नवा अवतार! ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात उर्वीचे मालिकेत पदार्पण

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र
3

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र

‘अबीर’ चित्रपटातील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ गाण्यात मानसी शिंदेच्या लावणीचा ठसकेबाज ठेका!
4

‘अबीर’ चित्रपटातील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ गाण्यात मानसी शिंदेच्या लावणीचा ठसकेबाज ठेका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.