Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Padwa 2026: पती-पत्नीच्या नात्यासाठी खास असतो दिवाळी पाडवा; जाणून घ्या औक्षण करण्यामागचे कारण आणि महत्त्व

Diwali Padwa 2026: दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा हा सण पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना करते. पण ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली आणि त्यामागे कोणती पौराणिक कथा आहे? जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 10, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा हा सण पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो
  • औक्षण करताना निरांजन, हळद-कुंकू, अक्षता आणि फुलांचा वापर केला जातो.
  • दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो
 

 

दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) हा सण पती-पत्नीच्या नात्यासाठी अत्यंत प्रेमाचा, आदराचा आणि आपुलकीचा मानला जातो. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि प्रगतीची कामना करते..

पती-पत्नीसाठी दिवाळी पाडवा खास का असतो?

पाडवा हा सण केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर पती-पत्नीमधील प्रेमाची, विश्वासाची आणि सोबतची उजळणी करण्याचा दिवस आहे. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते, तर पती आपल्या पत्नीला प्रेमाची निशानी म्हणून एखादी भेटवस्तू (ओवाळणी) देतो. यातून दोघांमधील समजूतदारपणा आणि आदर वाढतो.

साडेतीन मुहूर्त पैकी एक

दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो, त्यामुळे या दिवशी नवीन आयुष्याची किंवा चांगल्या कार्याची सुरुवात केली जाते.

Diwali Padwa 2026: दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदा का म्हणतात? जाणून घ्या राजा बली आणि वामन अवताराची कथा

नव्या आयुष्याची सुरुवात

महाराष्ट्रात नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी (किंवा सासरी) विशेष पद्धतीने ‘दिवाळसण’ म्हणून साजरी केली जाते, जिथे जावयाचा मान-पाण केला जातो.

पतीचं औक्षण करण्यामागचं कारण काय?

निरांजन, हळद-कुंकू, अक्षता आणि फुलांच्या सहाय्याने पतीचे औक्षण केले जाते. याद्वारे पतीच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत, त्याला दीर्घायुष्य लाभावे आणि आरोग्य उत्तम राहावे ही भावना असते. औक्षण करण्याच्या प्रक्रियेमुळे घरात आणि नात्यामध्ये सकारात्मक ऊर्जा व मांगल्याचे वातावरण निर्माण होते.

सहचारी म्हणून सन्मान

पत्नी ही पतीची सहचारी आहे, ती त्याच्या सुख-दुखात खंबीरपणे उभी असते. या कृतज्ञतेपोटी पत्नी पतीचे औक्षण करून त्याच्या रक्षणासाठी आणि उन्नतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करते.

धार्मिक महत्त्व आणि परंपरा

वामन अवतार आणि बली राजाची कथा

पौराणिक कथेनुसार, दानशूर आणि प्रजावत्सल राजा बली भोगी आणि विलासी जीवन लोकांना जगायला लावले होते.. कर्मकांड वाढले अशावेळी त्याच्या वाढत्या प्रभावामुळे देवांनी विष्णूला साकडे घातले. भगवान विष्णूने ‘वामन’ अल्पवयीन ब्राह्मणाचे रूप घेऊन बली राजाकडे तीन पावले जमीन मागितली. बली राजाने ती मान्य केली. वामनाने पहिल्या दोन पाव्यात स्वर्ग आणि पृथ्वी मोजली, आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारल्यावर बलीने स्वतःचे मस्तक पुढे केले. वामनाने बलीला पाताळात पाठवले. परंतु बलीच्या दानशूरपणावर प्रसन्न होऊन विष्णूने त्याला वर दिला की, कार्तिक शुद्ध प्रतिपदेची तिथी ‘बलिप्रतिपदा’ म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी तुझी पूजा होईल.

Hindu Religion: मंदिरासमोर दीपमाळ का उभारली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व, इतिहास आणि स्थापत्यकलेचे रहस्य

माता लक्ष्मी आणि विष्णूची कथा

जेव्हा भगवान विष्णूने राजा बलीला पाताळात पाठवले, तेव्हा माता लक्ष्मीने बली राजाकडे रक्षण करण्याचे वचन मागितले आणि ती स्वतः काही काळ तिथे राहिली. या प्रसंगाची आठवण म्हणून आणि पती-पत्नीच्या पवित्र नात्याचा व आदराचा प्रतीक म्हणून या दिवशी पत्नीकडून पतीच्या औक्षण करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते..

व्यापाऱ्यांचे नवे वर्ष

या दिवशी व्यापारी वर्ग आपले नवीन हिशोबाचे बहीखाते (चोपडीपूजन) सुरू करतात। हे नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात मानली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळी पाडवा कधी साजरा केला जाणार आहे

    Ans: दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे

  • Que: दिवाळी पाडव्याला पत्नी पतीचे औक्षण का करते?

    Ans: धार्मिक परंपरेनुसार, पत्नी पतीच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि प्रगतीची कामना करून त्याचे औक्षण करते

  • Que: दिवाळी पाडव्याला पती पत्नीला भेटवस्तू का देतो?

    Ans: औक्षणानंतर पती पत्नीला भेटवस्तू किंवा ओवाळणी देतो. ही परंपरा प्रेम, आदर आणि आपुलकी व्यक्त करण्याचे प्रतीक मानली जाते.

Web Title: Diwali padwa 2026 husband wife relationship aaukshan significance pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Diwali 2026 : सुख, समृद्धी आणि भरभराटीची नवी सुरुवात! दिवाळी पाडाव्यानिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यात वाढेल प्रेम
1

Diwali 2026 : सुख, समृद्धी आणि भरभराटीची नवी सुरुवात! दिवाळी पाडाव्यानिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यात वाढेल प्रेम

Pune: ऐन दिवाळीत पुण्याचा श्वास कोंडला! फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या हवेच्या प्रदूषणाचा AQI थेट…
2

Pune: ऐन दिवाळीत पुण्याचा श्वास कोंडला! फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या हवेच्या प्रदूषणाचा AQI थेट…

Dharashiv News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंभार गल्लीत भीषण आग! गरीब कुटुंबाचा संसार खाक; तरुणांच्या धाडसामुळे शेकडो घरे बचावली
3

Dharashiv News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंभार गल्लीत भीषण आग! गरीब कुटुंबाचा संसार खाक; तरुणांच्या धाडसामुळे शेकडो घरे बचावली

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी
4

Jaykumar Gore Diwali Celebration : ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलवला दिवाळीचा आनंद; जयकुमार गोरेंनी जपली माणुसकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.