Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pawan Kalyan: १३ वर्षांचा संसार मोडला! साऊथ सुपरस्टार पवन कल्याण आणि पत्नी अण्णा कोनिडेला विभक्त होणार

Pawan Kalyan Divorce: आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेता पवन कल्याण यांनी पत्नी अण्णा लेझनेवा यांच्यापासून विभक्त होण्याची घोषणा केली आहे. संयुक्त निवेदनातून १३ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट केल्याचे स्पष्ट केले.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 10, 2026 | 09:20 AM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Pawan Kalyan Divorce: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पवन कल्याण आणि त्यांच्या पत्नी अण्णा कोनिडेला यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी संयुक्त निवेदन जारी करत १३ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट करत असल्याची घोषणा केली. परस्पर सामंजस्य आणि आदराने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. या बातमीमुळे पवन कल्याण यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

संयुक्त निवेदन जारी करत केली घोषणा

पवन कल्याण आणि अण्णा यांनी आपल्या जवळच्या मित्रांना आणि हितचिंतकांना उद्देशून संयुक्त निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आयुष्यातील महत्त्वपूर्ण काळ एकत्र घालवल्यानंतर त्यांनी परस्पर सामंजस्य आणि आदराने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

लग्न संपुष्टात येत असले तरी एकमेकांशी चांगले मित्र म्हणून संबंध कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुलांचे समर्पित पालक म्हणून दोघेही आपली जबाबदारी पार पाडतील. मुलांचा आनंद आणि त्यांचे हित हेच दोघांचे समान प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वैयक्तिक परिस्थितीत त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन त्यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना केले आहे. आतापर्यंत साथ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

विभक्त होण्याच्या घोषणेनंतर अण्णाने डिलीट केले इन्स्टाग्राम अकाउंट?

विभक्त होण्याची घोषणा समोर आल्यानंतर अण्णा कोनिडेलाने आपले इन्स्टाग्राम अकाउंट हटवल्याचे वृत्त आहे. यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. यापूर्वी पवन कल्याणने सोशल मीडियावर अण्णाचे स्वागत केल्याचेही वृत्त समोर आले होते.

२०१३ मध्ये झाले होते लग्न

पवन कल्याण आणि अण्णा लेझनेवा यांचा विवाह सप्टेंबर २०१३ मध्ये झाला होता. रशियन नागरिक असलेल्या अण्णा यांच्याशी पवन कल्याण यांनी हैदराबादमधील उपनोंदणी कार्यालयात विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलीचे नाव पोलेना अंजना पवनोवा, तर मुलाचे नाव मार्क शंकर पवनोविच आहे.

Patri Sarkar 1942 Trailer Launched: तो संवाद ऐकलात? अंगावर शहारे आणणारा ‘पत्री सरकार’चा ट्रेलर व्हायरल चर्चेत

पवन कल्याण यांचे तिसरे लग्न

पवन कल्याण यांचे हे तिसरे लग्न होते. त्यांनी १९९७ मध्ये नंदिनी यांच्याशी पहिले लग्न केले होते. मात्र, दोन वर्षांच्या आत दोघे विभक्त झाले आणि २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००९ मध्ये पवन कल्याण यांनी अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी लग्न केले. मात्र, २०११ मध्ये ते वेगळे झाले आणि २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी अण्णा लेझनेवा यांच्याशी तिसरे लग्न केले होते.

वाढदिवशी अण्णाने शेअर केली होती खास पोस्ट

विशेष म्हणजे, याच वर्षी २ सप्टेंबर रोजी पवन कल्याण यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त अण्णाने सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये तिने पवन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ते अनेकांच्या मनात, विचारांत आणि प्रार्थनांमध्ये असल्याचे म्हटले होते. तसेच लोकांच्या आयुष्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला होता.

त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच एकमेकांसोबतचे खास क्षण शेअर करणाऱ्या या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची बातमी चाहत्यांसाठी अनपेक्षित ठरली आहे. दरम्यान, दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली असली तरी कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती निवेदनात देण्यात आलेली नाही.

Sankarshan Karhade Daughter: लेकीला 102 ताप, रात्रभर जागरण अन् सकाळी शूटिंग! संकर्षणच्या आयुष्यातला तो कठीण क्षण

Web Title: Pawan kalyan anna lezhneva separation divorce announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • Divorce
  • entertainment
  • pawan kalyan

संबंधित बातम्या

Raveena Tandon: ‘या’ गाण्यासाठी रवीना टंडनने १२ तास थंड पाण्यात केलं शूटिंग; सांगितला धक्कादायक किस्सा
1

Raveena Tandon: ‘या’ गाण्यासाठी रवीना टंडनने १२ तास थंड पाण्यात केलं शूटिंग; सांगितला धक्कादायक किस्सा

Alia Bhatt-Ranbir Kapoor: नव्या बंगल्यात आलिया-रणबीरची पहिली दिवाळी! चिमुकल्या राहासोबत केली लक्ष्मीपूजा, पाहा घरातील सुंदर फोटो
2

Alia Bhatt-Ranbir Kapoor: नव्या बंगल्यात आलिया-रणबीरची पहिली दिवाळी! चिमुकल्या राहासोबत केली लक्ष्मीपूजा, पाहा घरातील सुंदर फोटो

OTT Releases This Week: घरबसल्या मनोरंजनासाठी सज्ज व्हा! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ५ जबरदस्त चित्रपट आणि सीरिज
3

OTT Releases This Week: घरबसल्या मनोरंजनासाठी सज्ज व्हा! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ५ जबरदस्त चित्रपट आणि सीरिज

दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्याने विकल्या फुलांच्या माळा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
4

दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्याने विकल्या फुलांच्या माळा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.