Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OTT Releases This Week: घरबसल्या मनोरंजनासाठी सज्ज व्हा! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ५ जबरदस्त चित्रपट आणि सीरिज

OTT Releases This Week: नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ आणि जिओहॉटस्टारवर ५ नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. रणबली, द रिंग्स ऑफ पॉवर सीझन ३ यांसह जाणून घ्या संपूर्ण यादी.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 09, 2026 | 03:20 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

OTT Releases This Week:  ओटीटीप्रेमींसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा मनोरंजनाची खास मेजवानी घेऊन येणार आहे. ९ ते १५ नोव्हेंबरदरम्यान नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ आणि जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाच नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये सस्पेन्स, क्राईम, कॉमेडी, अॅक्शन आणि थ्रिलर अशा विविध जॉनरचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे, काही चित्रपट आणि मालिकांमध्ये अनपेक्षित वळणं आणि रोमांचक घटना पाहायला मिळणार आहेत.

या आठवड्यात ओटीटीवर काय पाहायचं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही यादी नक्की पाहा.

१. रणबली (Ranabaali)

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रणबली’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर दाखल होणार आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १३ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये तो उपलब्ध होणार आहे.

२. द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्स ऑफ पॉवर सीझन ३ (The Lord of the Rings: The Rings of Power Season 3)

‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्स ऑफ पॉवर’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या नव्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ११ नोव्हेंबरपासून ही मालिका प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे. सुरुवातीला मालिकेचे चार भाग एकाच वेळी प्रदर्शित केले जातील. त्यानंतर उर्वरित भाग १८ आणि २५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

३. एलान (Eleven)

अॅक्शन, सायन्स फिक्शन आणि कॉमेडीचा मिलाफ असलेला ‘एलान’ हा चित्रपटही या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ११ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येईल. अॅक्शनसोबतच थरार आणि सस्पेन्सने भरलेली दृश्यं पाहण्याची इच्छा असलेल्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो. कुटुंबासोबत मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठीही हा चित्रपट पाहता येईल.

४. स्टुडंट ऑफ द इयर: आफ्टर डार्क (Student of the Year: After Dark)

शनाया कपूरची आगामी मालिका ‘स्टुडंट ऑफ द इयर: आफ्टर डार्क’ देखील या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. १३ नोव्हेंबरपासून ही मालिका जिओहॉटस्टारवर पाहता येईल. या मालिकेत शनाया कपूरसोबत दिविक शर्मा, मान्या ग्रोव्हर, शीबा चड्ढा आणि विवेक गोम्बर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. करण जोहरने या मालिकेची निर्मिती केली असून रीमा माया यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Sania Mirza Dating: सानिया मिर्झा पुन्हा प्रेमात पडलीय? दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण; डेटिंगबाबत दिलं मोठं संकेत

५. द चोझन सीझन ६ (The Chosen Season 6)

‘द चोझन’ या लोकप्रिय मालिकेच्या सहाव्या सीझनचाही या आठवड्यातील ओटीटी रिलीजच्या यादीत समावेश आहे. या मालिकेचे पहिले तीन भाग १५ नोव्हेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतर ६ डिसेंबरपर्यंत दर आठवड्याच्या शेवटी मालिकेचा एक नवीन भाग प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या नव्या सीझनची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांना लवकरच तो पाहता येणार आहे.

एकूणच, ९ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे पाच चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात घरबसल्या मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील.

Abhijeet Kelkar: ‘बिल्डरच्या गावगुंडांनी…’ अभिजीत केळकरने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Web Title: Ott releases this week 9 to 15 november 2026 movies web series ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • entertainment
  • movie
  • OTT

संबंधित बातम्या

दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्याने विकल्या फुलांच्या माळा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
1

दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्याने विकल्या फुलांच्या माळा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Prathamesh Parab: प्रथमेश परबची चौथ्या घरात गुंतवणूक; मुंबईत आणखी एका ठिकाणी साकारलं हक्काच्या घराचं स्वप्न
2

Prathamesh Parab: प्रथमेश परबची चौथ्या घरात गुंतवणूक; मुंबईत आणखी एका ठिकाणी साकारलं हक्काच्या घराचं स्वप्न

Abhijeet Kelkar: ‘बिल्डरच्या गावगुंडांनी…’ अभिजीत केळकरने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
3

Abhijeet Kelkar: ‘बिल्डरच्या गावगुंडांनी…’ अभिजीत केळकरने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Mirzapur The Movie OTT:  सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू झाला खूनी खेळ; साडेतीन तासांचा चित्रपट ओटीटीवर ठरतोय प्रेक्षकांची पहिली पसंती
4

Mirzapur The Movie OTT: सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू झाला खूनी खेळ; साडेतीन तासांचा चित्रपट ओटीटीवर ठरतोय प्रेक्षकांची पहिली पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.