Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alia Bhatt-Ranbir Kapoor: नव्या बंगल्यात आलिया-रणबीरची पहिली दिवाळी! चिमुकल्या राहासोबत केली लक्ष्मीपूजा, पाहा घरातील सुंदर फोटो

Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने मुलगी राहासोबत नव्या ‘कृष्णा राज’ बंगल्यात पहिली दिवाळी साजरी केली. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी सेलिब्रेशनचे खास फोटो आलियाने शेअर केले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 09, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Alia Bhatt-Ranbir Kapoor: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट. या दोघांची मुलगी राहा कपूरदेखील आपल्या क्यूट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच रणबीर आणि आलियाने राहाचा चौथा वाढदिवस साजरा केला होता. या सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केल्यानंतर आता आलियाने त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यंदा कपूर कुटुंबाने त्यांच्या नव्या ‘कृष्णा राज’ बंगल्यात पहिली दिवाळी साजरी केली. या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

नव्या बंगल्यातील पहिल्या दिवाळीचे फोटो व्हायरल

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल परिसरात असलेल्या त्यांच्या नव्या सहा मजली ‘कृष्णा राज’ बंगल्यात राहायला गेले. या घरात ते मुलगी राहा आणि रणबीरची आई नीतू कपूर यांच्यासोबत राहतात. यंदाची दिवाळी या घरातील त्यांची पहिली दिवाळी असल्याने हे सेलिब्रेशन त्यांच्यासाठी खास ठरले. आलियाने सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

राहाने आई-बाबांवर केला प्रेमाचा वर्षाव

आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये राहा आपल्या आई-वडिलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये राहा आलिया आणि रणबीरचे गोड पापे घेताना दिसते. हा फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये राहा वडील रणबीरच्या मांडीवर बसून पूजा करताना दिसत आहे. रणबीरच्या हातात पवित्र धागा बांधला जात असताना आलिया हसताना दिसते. या खास क्षणांमधून कपूर कुटुंबातील आनंद आणि जिव्हाळा पाहायला मिळतो.

आलियाने दिवाळी पूजेची झलकही या फोटोंमधून दाखवली आहे. फोटो समोर येताच चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. राहाचे आई-वडिलांसोबतचे गोड क्षण पाहून अनेकांनी कमेंट्समधून तिचे कौतुक केले आहे.

दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्याने विकल्या फुलांच्या माळा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

आलिया, रणबीर आणि राहाचा दिवाळी लूक

या खास सेलिब्रेशनसाठी आलियाने पिस्ता हिरव्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. त्यासोबत राजस्थानी आंगी ब्लाउज, लांब श्रग आणि जुळणारा दुपट्टा असा तिचा पारंपरिक लूक होता. माथा पट्टी आणि मोठ्या आकाराच्या कानातल्यांनी तिने आपला लूक पूर्ण केला होता.

तर रणबीर कपूर आयव्हरी रंगाच्या सिल्क कुर्त्यामध्ये देखणा दिसत होता. राहानेही वडिलांच्या लूकला मॅच करणारा लेहेंगा परिधान केला होता. तिघांचे हे पारंपरिक लूकमधील फोटो चाहत्यांना विशेष आवडले आहेत. आलिया-रणबीरच्या नव्या घरातील पहिल्या दिवाळीचे हे खास क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Prathamesh Parab: प्रथमेश परबची चौथ्या घरात गुंतवणूक; मुंबईत आणखी एका ठिकाणी साकारलं हक्काच्या घराचं स्वप्न

Web Title: Alia bhatt ranbir kapoor first diwali krishna raj bungalow raha photos ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

OTT Releases This Week: घरबसल्या मनोरंजनासाठी सज्ज व्हा! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ५ जबरदस्त चित्रपट आणि सीरिज
1

OTT Releases This Week: घरबसल्या मनोरंजनासाठी सज्ज व्हा! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ५ जबरदस्त चित्रपट आणि सीरिज

दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्याने विकल्या फुलांच्या माळा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
2

दिवाळीत रस्त्याच्या कडेला बसून अभिनेत्याने विकल्या फुलांच्या माळा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Prathamesh Parab: प्रथमेश परबची चौथ्या घरात गुंतवणूक; मुंबईत आणखी एका ठिकाणी साकारलं हक्काच्या घराचं स्वप्न
3

Prathamesh Parab: प्रथमेश परबची चौथ्या घरात गुंतवणूक; मुंबईत आणखी एका ठिकाणी साकारलं हक्काच्या घराचं स्वप्न

Abhijeet Kelkar: ‘बिल्डरच्या गावगुंडांनी…’ अभिजीत केळकरने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
4

Abhijeet Kelkar: ‘बिल्डरच्या गावगुंडांनी…’ अभिजीत केळकरने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.